Google ads

Ads Area

संत तुकाराम महाराज मराठीत माहिती | sant tukaram information in marathi

 संत तुकाराम महाराज मराठीत माहिती | sant tukaram maharaj information in marathi

तुकाराम महाराज माहिती
तुकाराम महाराज माहिती


संत तुकाराम (toc)

संत तुकाराम महाराज म्हणजे एक श्रेष्ठ कवी ,संसार करुन भक्तीचा मार्ग दाखविणारे महान संत म्हणून नावारुपास आलेले असे सगळ्यांना माहीत असलेले एक सांसारिक लोकांना आदर्श असलेले संत तुकाराम होय .त्यांनी आपल्या भक्तिमार्गाने आपला उत्कर्ष कसा साधावा यासाठी स्वतःचा आदर्श घालून दिलेला आहे .

तुकाराम महाराज यांचे जीवन |tukaram maharaj jivan

तुकाराम तुकाराम महाराज हे देहू गावी या ठिकाणी जन्माला आले त्यांचे घराणे वारकरी संप्रदायातील होते त्यांचे अनेक पिढ्या वारी करणाऱ्या होत म्हणजेच विठ्ठलाची भक्ती करणारे त्यांचे पूर्वज होते .म्हणून त्यांना हा जो वारसा लाभला होता तो त्यांच्या विठ्ठल भक्ती करणाऱ्या पूर्वांजमुळे मिळाला होता वडीला - बोलोबा 

आई : कनकाई 

यांच्या पोटी तुकाराम महाराज यांनी जन्म घेतला तुकाराम महाराज हे नामदेवांचे अवतार समजले जातात त्यांचे मोठे भाऊ सावजी ,कानोबा होते .तुकाराम महाराज यांचा जन्म माघ महिन्यातील शुद्ध प्रतिपदेला शके 1528 म्हणजेच 22 जानेवारी 1608 रोजी झाला त्यांच्या वडिलांचा व्यवसाय सावकारी होता पण तुकाराम महाराज यांना सावकारी पेशा आवडत नव्हता  उलट लोकांनी कर्ज घेऊन आपल्या घरातील सुखाचा चालणाऱ्या संसार कर्जामुळे दुःखाची जीवन येते हे त्यांना आवडत नव्हते संसार व्यवस्थित चालत नाही म्हणून लोकांना कर्ज घेऊ नका सांगत होते .दुष्काळातील परिस्थिती पाहून तुकाराम महाराज व्यथीत होत होते . त्यांनी आपल्या घरातील जी संपत्ती होती ती सगळ्या लोकांना वाटून दिली. त्यांच्या पत्नीचे जिजाई (आवली) तुकाराम महाराज त्यांना आवडीने आवली या नावाने बोलत होते त्यांची पत्नी  देवीची भक्ती करत होत्या त्यामुळे तुकाराम महाराज यांनी विठ्ठलाची भत्ती करत हे त्यांना आवडत नव्हते तरीही त्यांचे एकमेकांशी सलोख्याचे नाते होते तुकाराम महाराज यांना चार अपत्य होत एक दोन मुली होत्या एक काशी भागीरथी . मुलगे नारायण आणि महादेव असे होते .

असे म्हटले जाते की त्यांची मुलगी भागीरथी हिच्यासाठी तुकाराम महाराज वैकुंठातून पुन्हा तिच्यासाठी आले होते. तर संत निळोबा राय यांच्यासाठीही तुकाराम महाराज हे आले होते असे सांगितले होते म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतानाही या दोन व्यक्तींसाठी पुन्हा  आलेले होते.

तुका आकाशा एवढा | tuka aakasha evadha 

अणू रेणू थोकडा| तुका आकाशा एवढा

यानुसार संत तुकाराम हे अणू रेणू पेक्षा लहान असून ते आकाशाएवढे झाले त्यांचे एवढे महान कार्य आहे संसारात राहूनही त्यांनी मोहमाया दूर ठेवून विठ्ठलाच्या भक्तीचा महिमा लोकांसमोर ठेवला .जरी त्यांनी लोकांसमोर भक्तीचा महिमा ठेवला असला तरी ते महत्व संसारिक लोकांना दिले आहे.

तुकाराम महाराजांची कथा | story of tukaram maharaj

अशी कथा सांगितले जाते नामदेव महाराज यांनी भरपूर प्रमाणात अभंग लिहिले होते त्यांचा संकल्प शतकोटी अभंग लिहिण्याचा होता त्यांनी 14 माणसे कामाला लावून अभंग रचना करण्याचे ठरवले एवढ्या लोकांनी अभंग लिहिण्यास मदत केली. स्वतः पांडुरंग सुद्धा नामदेव यांना अभंग लिहू लागले. त्यांचे 96 कोटी अभंग पूर्ण झाले त्यानंतर तुकाराम महाराज हे संत नामदेव यांचे अवतार मानले जातात त्यांचा जो संकल्प होता तो त्यांनी तुकाराम महाराज यांच्या अवतारकार्यात पूर्ण केला. राहिलेले चार कोटी अभंग तुकाराम महाराज महाराजांकडे पूर्ण केले आहे ,अशी कथा सांगितली जाते.

तुका झाला कळस|tuka jhala kalas

वारकरी संप्रदायाची पताका पंजाबपर्यंत नेण्याचे काम नामदेवांनी केले या वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. त्यात या वारकरी संप्रदायाचची इमारत उभी राहण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज हे पाया बनले .नामदेव महाराज  प्रसार केला म्हणजेच विस्तार केला ,तर इमारतीचा आधारस्तंभ तो म्हणजे खांब होय म्हणजे संत एकनाथ महाराज. तर इमारत उभी राहिल्यानंतर त्याचा जो महत्त्वाचा भाग जो असतो तो म्हणजे कळस तो कळस म्हणजेच संत तुकाराम महाराज म्हणजेच वारकरी संप्रदायात भव्य अशी इमारत उभी राहिली त्या इमारतीचा कळस बनण्याचा मान संत तुकाराम महाराज यांना जातो. या कळसावर जी पताका फडकविली जाते ते फडकवण्याचे काम संत तुकाराम महाराज यांच्या शिष्या संत बहिणाबाई यांनी फडकवला एवढे महान कार्य तुकाराम महाराज यांना जाते.

तुकाराम महाराज यांचे अभंग |  tukaram maharaj abhang

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले

लोक दुःख दैन्य गरिबी दारिद्र्य या सगळ्यानी व्यथित झाले होते या सगळ्या व त्यातून बाहेर काढावे यासाठी तुकाराम महाराज यांनी प्रयत्न केले त्यांना अशा व्यथीतातून आपली सुटका करावी म्हणून मोहामाया चा त्याग करून भक्तिमार्गाची कास धरावी यासाठी त्यांनी लोकांना उपदेश केले. संत तुकाराम महाराज हे एक द्रष्टे संत होते त्यांची डोळस भक्ती  लोकांना उपयोगी पडत होती, त्यानुसार लोकही त्यांच्या विचारानुसार चालत होते आपल्याला जे दुःख मिळत आहे ते आपली असणारे मोहमायात अडकलेली इच्छा होय आणि अशा या दयनीय अवस्थेतून सुटका होण्यासाठी त्यांनी भक्तीची कास धरावी यासाठी लोकांना प्रबोधन केले जे लोक कर्जात होते त्यांनी कर्जमुक्त व्हावे यासाठी ते सल्ला देत होते तर तुकाराम महाराज हे सावकारी पेशातून आलेले होते तरीही त्यांनी या पेशाला हाताशी न धरता आपली संपत्ती सर्व लोकांना दुष्काळामध्ये वाटून दिली लोकांचे गाऱ्हाणे ऐकून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम संत तुकाराम करत होते.

वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे

 या अभंगात संत तुकाराम महाराज यांनी निसर्गाचे वर्णन करीत असताना निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा जो अनुभव आहे तो अनुभव आपल्या अभंग रूपातून व्यक्त केला आहे संत तुकाराम महाराज संसार करीत असताना नामस्मरणाची जोड त्यांना होती म्हणून ते आपल्या पांडुरंगाचे म्हणजेच विठ्ठलाचे नाम घेण्यासाठी जवळच असलेल्या देहू गावाजवळ भंडारा डोंगरावर जाऊन नाम साधना म्हणजेच उपासना करत होते. या उपासना करताना रमत होते.नाम घेत असताना त्यात मग्न होत होते त्यांच्या जवळ असणारे पशू ,पक्षी ,झाडे, गवत आणि सगळा परिसर हा जणू काही त्यांच्याशी बोलत आहे म्हणून आपल्या अभंगात त्यांनी निसर्गातील घटनांचा उल्लेख आपल्या अभंगात केला आहे आपण भूतमात्रांवर जर प्रेम केले तर ते सुद्धा आपल्याला लळा लावत असतात हे या अभंगातून आपल्याला स्पष्ट होत आहे

नामसंकीर्तन साधन पै सोपे  जळतील पापे जन्मांतरीचे

 या अभंगात तुकाराम महाराज यांनी भक्तीचा महिमा सांगत असताना नामस्मरण माणसांना संसार रुपी सागरातून तरून जाण्यासाठी सांगितले आहे. या नामातून आपला उद्धार होत असतो केवळ आपलाच होतो असे नाही तर त्याबरोबर त्या व्यक्तीच्या सानिध्यात जे जे कोणी त्याला त्या नामाचा म्हणजेच भक्तीचा गोडवा लागलेला दिसून येतो. नाम घेणे म्हणजेच त्या आपल्या आराध्य दैवताचे मनापासून नामस्मरण करणे त्याचे चिंतन करणे त्याचा गोडवा गाणे आणि त्याच्याविषयी असणारी आपली श्रद्धा वाढीस लावून त्याचे स्मरण करणे म्हणजेच नामस्मरण म्हणून तर कर्मकांडाला विरोध  केला तर देवकते भगवंताला अधिक जवळची वाटते संसारात राहून जर भगवत प्राप्ती करून घ्यायचे असेल किंवा आपला भक्तीचा जो मार्ग अनुसरला आहे तो वाढला पाहिजे यासाठी नामस्मरण खूप महत्वाचे आहे म्हणून या भागात नामस्मरण हे खूप महत्त्वाचे आहेत त्याने आपले जन्मोजन्मीचे जे पाप आहे ते पाप जळून जाईल असे या अभंगात तुकाराम महाराज यांनी सांगितले आहे.

तुकाराम महाराज पालखी प्रस्थान मार्ग


1 ) देहू
2 ) आकुर्डी
3) पुणे
4) पुणे
5 ) पुणे
6 ) लोणी काळभोर
7 )यवत
8) वरवंड
9 )उंडवडी
10) बारामती
11)सणसर
12)आंथुरने
13) निमगाव
14 )इंदापूर
15) सराटी
16 ) अकलूज
17 )बोरगाव
18 ) पिराची
19 वाखरी
20 ) पंढरपूर

हे ही वाचा 



संत नामदेव महाराज निवडक अभंग अर्थासहित

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area