संत एकनाथ महाराज यांची मराठीत माहिती |sant eknath maharaj marathit mahiti
संत एकनाथ महाराज यांनी जातीपातीचा विचार न करता येणाऱ्या प्रत्येक माणसात ईश्वराचा अंश आहे असे समजून राहत .आपल्या प्रत्येक कृतीमागे भगवंत आहे त्यानुसार आपल्या जीवनात भगवंताचे महत्त्व आहे .
संत एकनाथ हे दत्ताचे भक्त होते तसेच त्यांचे गुरु जनार्धन स्वामी होते त्यांनी 6 वर्षे कठोर तपश्चर्या केली स्वामींच्या आग्रहाने त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला असे हे स्वामी गुरु केले त्यांनी आपली अभंगात स्वामी जनार्धन यांचा उल्लेख करत केलेला आहे.अशा महान संतांची माहिती बघूया.
संत एकनाथ महाराज यांचे जीवन | sant eknaths life in marathi
बालपण
संत एकनाथ महाराज यांचा जन्म 1833 मध्ये पैठण या ठिकाणी झाला .संत भानुदास महाराज यांचे पणतू होते वडिलांचे नाव सूर्यनारायण होते तर आईचे नाव रुक्मिणी होते .त्यांना आपल्या आईवडिलांचा जास्त सहवास लाभला नाही .
बसंत एकनाथ हे वारकरी संप्रदायातील एक महत्त्वाचे संत होते त्यांचे जरी गुरु दत्तसंप्रदायातील जनार्दन स्वामी असले तरीसुद्धा त्यांनी पांडुरंगाच्या चरणी आपले बरेचसे जीवन समर्पित केले त्यांनी वारकरी संप्रदाय हा पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी अनेक गवळणी भारुड अभंग रचना केली ते एक उत्तम कीर्तनकार होते दत्ताचे जसे भक्ती करत होते तसेच पांडुरंगाची सुद्धा ते भक्ती करत होते
एकनाथ महाराजांची गुरु परंपरा
एकनाथ यांना बालपणापासूनच चांगले विचार जाणून घेण्याची म्हणजेच अध्यात्मची गोडी होती चांगले कीर्तन, वाचन करण्याचे ते समजून घेण्याची त्यांना आवड होती. लहानपणीच त्यांनी त्यांचे आई-वडील गेले असल्यामुळे त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. पण त्यांना अध्यात्माची गोड असल्यामुळे त्यांनी देवगिरी याठिकाणी जनार्दन स्वामी यांची भेट घेतली. जनार्दन स्वामी हे चाळीसगावचे होते. त्यांचेही आडनाव देशपांडे असून ते दत्ताचे चांगले भक्त होते. त्यामुळे एकनाथ हे दत्ताची भक्ती करू लागले .म्हणजेच सुरुवातीला दत्तसंप्रदायातील दत्ताची भक्ती करायला सुरुवात त्यांनी केली होती. संत एकनाथ यांनी त्यांचे शिष्य म्हणून स्वतः गुरुचरणी वाहून घेतले होते .गुरूंची सेवा करणे हाच त्यांचा ध्यास होता आणि म्हणून ते आपल्या गुरूंशी एकनिष्ठ राहिले म्हणजेच गुरुंची सेवा करत असताना प्रत्यक्ष दत्तात्रेयांचे दर्शन झाले असे त्यांना मनोमन वाटत होते .
त्यांची गुरु -परंपरा
एकनाथ महाराजांची गुरुपरंपरा अशी होती
नारायण विष्णू
ब्रह्मदेव
अत्रीऋषी
दत्तात्रेय
जनार्दन स्वामी
एकनाथ
अशी त्यांची गुरु परंपरा असलेली दिसून येते
एकनाथ महाराज यांचे कुटुंब विस्तार
एकनाथ महाराज यांचे पंजोबा संत भानुदास महाराज तर त्यांचे आजोबा चक्रपाणी .चक्रपाणी हे सूर्याची उपासना करत होते म्हणून त्यांच्या मुलाचे नाव सूर्यनारायण ठेवले. म्हणजेच एकनाथ यांचे वडील सूर्यनारायण होते व वडील वारल्यानंतर त्यांचा सांभाळ चक्रपाणी यांनी केला. त्यांचा विवाह पैठण जवळ वैजापूर ठिकाणची गिरीजा नावाच्या मुलीसोबत लग्न झाले .त्यांना तीन अपत्य होते एक मुलगा त्याचे नाव हरी असून त्यांना दोन मुली होत्या एकीचे नाव गोदावरी व दुसरीचे गंगा असे होते. त्यांचा मुलगा मोठा झाल्यावर हरिपंडित झाला. हरीपंडित हा त्यांचा मुलगा जरी असला तरी तो आपल्या वडिलांना गुरूच्या भूमिकेत बघत होता ज्यावेळेस एकनाथांनी समाधी घेतली त्यावेळेस त्यांच्या ज्या पादुका आहेत त्या पादुका प्रत्येक वर्षी आषाढी वारीला पंढरपूरला घेऊन जाण्याची प्रथा त्यांनी सुरू केली,अजूनही तशीच आहे.
संत एकनाथ यांचे दत्त दर्शन
एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत म्हणून ओळख जरी असली तरी ते एक दत्त संप्रदायाची निगडित असलेले महान संत होते. दत्तात्रेयांनी एकनाथांना दर्शन दिले असे वरदान एकनाथ महाराज यांनी दत्ताची आरती लिहिली आहे त्या आरतीमध्ये दत्ताचे अप्रतिम असे वर्णन केले आहे.
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
समाधी द्या ना हरली भवचिंता ..
म्हणजेच दत्तात्रेय हे एक महान त्रिगुनात्मक असून या दत्तात्रयाचे वर्ण करत असताना उत्पत्ती, स्थिती ,लय या तीन तत्वांचा मिलन दत्तात्रय असलेले दिसते .म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे या दत्तात्रेय एकवटलेले आहेत दत्तात्रेय चे वर्णन करत असताना जे वेदांनाही ,ऋषीनाही समजले नाही .असा हा त्रैलोक्याचा राणा दत्तात्रेय आहे अशा या दत्तात्रयांनी त्यांना साक्षात दर्शन दिले असे या भावात त्यांनी दत्तात्रेयांची आरती मध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे.
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान
हरपले मन झाले उन्मन
म्हणजे दत्ताच्या ठिकाणी त्यांची भक्ती एवढी वाढली होती की दत्ता शिवाय त्यांना कोणतीच गोष्ट प्रिय वाटत नव्हती. म्हणजे दत्त दत्त म्हणतच त्यांचा जीवन क्रम चालला होता दत्तामध्ये ते पूर्णपणे समरस झाले होते .नाथांना दत्तात्रयांनी दर्धनाचा साक्षात अनुभव दिला होता.
संत एकनाथ यांचे वैराग्य
जनार्दन स्वामींच्या आज्ञेनुसार त्यांनी संसार करावा अशी त्यांची इच्छा होती त्यानुसार ते आपल्या पैठण या गावी माघारी आल्यानंतर आजी आणि आजोबा यांना खूप आनंद झाला. त्यांनी विजापूर या ठिकाणचे देशस्थ ब्राह्मण जे होते त्यांच्या मुलीशी म्हणजेच गिरजाबाईंशी लग्न लावल्यानंतर ते आता संसारात रममाण होतील अशी त्यांची इच्छा होती. संत एकनाथ यांचा जसा शांत स्वभाव होता तशाच प्रकारचा त्यांची पत्नी गिरजाबाई यांचाही स्वभाव होता. त्यासुद्धा त्यांच्यासारख्या परोपकारी वृत्तीच्या होत्या जरी ते संसारामध्ये असले तरी ते ईश्वर मग्न होते त्यांचा परमार्थिक अध्यात्मविषय जे नियम होते जे तत्व होते ते त्यांनी कायम तसेच ठेवले. सूर्य उगवण्याच्या अगोदर त्यांचा स्नानसंध्या भगवतचिंतन हे चालू असे, गोदावरी मध्ये पहाटे आंघोळ करून घरामध्ये ग्रंथ वाचन करत होते. ्यामध्ये गीतेचे पारायण करणे, ज्ञानेश्वरीचे वाचन करणे , त्यावर प्रवचन सांगणे आणि रात्रीचे लोकांसमोर कीर्तन सांगणे असा हा त्यांचा दिनक्रम होता म्हणजेच त्यांचे एक संसारामध्ये जरी ते रममाण असले तरी त्यांनी आपली भक्ती भगवंताच्या समोर ठेवली होती .आपला जीवनक्रम असा हा नित्याचा ठेवला असल्यामुळे ते एक महान संत म्हणून नावारूपास आले.
एकनाथ महाराज यांची असलेली गुरूंवर श्रद्धा
एकनाथ महाराज यांचा असा विचार होता की आपण लोकांना काहीतरी दिले पाहिजे लोकांचे प्रबोधन केले पाहिजे, आपण समाजाचे देणे लागत आहोत, या विचाराचे ते होते ,म्हणून समाजाला प्रबोधन करायचे मार्गदर्शन करायचे असेल तर म्हणजेच मार्गदर्शकाला ईश्वराची प्रचिती असायला हवी नाहीतर नुसतंच बाथा मारून पोपटासारखे बोलून लोकांना फसवणे हा त्याचा धंदा होईल म्हणून लोकांना जर उपदेश करायचा असेल तर स्वतः उपदेशकार म्हणून भगवंताची प्राप्ती, प्रचिती, अनुभव आलेला असावा. तरच आपण लोकांसमोर उपदेश करू या मताचे संत एकनाथ महाराज होते .म्हणून ते भगवत चींतना मध्येच रममान होत होते. एकदा एका ठिकाणी मंदिरात चिंतन करत बसले असताना त्याठिकाणी एक वयस्कर व्यक्ती त्या ठिकाणी येऊन असे म्हणाले की "हे चिंतन जे करतो ते खूप चांगले आहे तुला जर खरच आत्मज्ञान व्हावे असे वाटत असेल तर तू देवगिरी या ठिकाणी जे किल्लेदार आहेत ते म्हणजे जनार्दन स्वामी यांच्याकडे जाऊन आत्मज्ञान वाढवू शकतो "असे त्यांनी सांगितले. एकनाथ महाराज हे त्या ठिकाणी गेले आणि जनार्दन स्वामी यांचे शिष्य बनले.
गुरु- शिष्य नाते
जनार्दन स्वामी यांनी एकनाथ महाराज यांचे शिष्यत्व पत्करले. आणि एकनाथ महाराज यांनी गुरु म्हणून जनार्दन स्वामींचा मनोमन स्वीकार केला जनार्दन स्वामी यांनाही एकनाथ महाराज हे शिष्य म्हणून चांगले व्यक्ती मिळाले त्यांनी ह्या एकनाथांवर पितृ मायाने जवळ घेतले. " चित्ताला अनुताप झाला असल्याने हा मार्ग स्वीकारला असे नाथ म्हणत " मी हा मार्ग स्वीकारला हे त्यांचे बोलणे ऐकून जनार्दन स्वामी यांना एकनाथ महाराजांविषयी एक प्रकारची आपुलकी निर्माण झाली. जनार्दन स्वामी दत्तभक्त होते त्यांना देवगिरीच्या परगण्याची जहागिरी त्यांच्याकडे होती. तरीही सत्ता आणि संपत्ती त्यांच्या हातात असूनही जीवनाचे आपले ध्येय काय आहे त्या ध्येयाकडे पूर्ण लक्ष ठेवूनच आपला जीवनक्रम त्यांचा चालू होता असे हे जनार्दन स्वामी म्हणजेच त्यांचे भगवत भक्ती किती उच्च स्थानावर होती हे आपणाला समजून येते .असा अधिकार असलेला गुरू आणि त्याच प्रकारचा तयार असलेला शिष्य यांची भेट झाल्यावर भगवतभक्तीचा आनंद जो आहे तो प्रत्यक्ष मिळाल्याचा आनंद त्यांना झाला. शिष्य म्हणून एकनाथ महाराज यांच्याकडे सर्वगुणसंपन्न असे त्यांचे व्यक्तित्व असल्यामुळे त्यांनी एकनाथांना शिष्य म्हणून स्वीकारले.
गुरूंचे आचरण खूप चांगले आहे त्यांच्या सेवेतच आपण रममान राहिले पाहिजे असा एकनाथ महाराजांचा ध्यास होता. सद्गुरूंच्या कृपेशिवाय त्यांच्या सेवेशिवाय त्यांना काहीही सुचत नव्हते. गुरुंच्या दिनकर्माप्रमाणे स्वतःचा दिनक्रम अनुसरला. गुरुंच्या अगोदर उठून साफसफाई करण्याचे काम एकनाथ महाराज करत होते, देवपूजेची तयार करणे ,कपडे धुवून ठेवणे, गंध उघळणे, त्यांचे बाहेर जाण्याच्या अगोदर जोडे काढून ठेवणे, जेवण वाढणे, कपड्यांची घडी घालणे, त्यांच्या जवळच झोपी जाणे असा हा दिनक्रम त्यांनी चालू ठेवला म्हणजे रोजच्या रोज जीवनामध्ये त्यांनी आपले हे दिनक्रमाचे व्रत आपल्या गुरूंच्या सानिध्यात घालवले त्यांच्या मोठ्या जबाबदाऱ्या सुद्धा ते चांगल्या प्रकारे स्वीकारत होते.
एकनाथ महाराजांचे वाङ्मय कार्य
एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे महान संत होते त्यांनी
एकनाथी भागवत हा ग्रंथ लिहिला
चतुश्लोकी भागवत
एकनाथी अभंग गाथा
संत एकनाथ महाराज कृत हरिपाठ यात पंचवीस अभंग
आनंदलहरी
चिरंजीवपद
मुद्राविलास
लघुगीता
अभंग गवळणी, भारुडे, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थरामायण 40000 ओव्या
ज्ञानेश्वरी चे शुद्धीकरण करण्याचे काम त्यांनी केले
एकनाथ महाराज यांचे सामर्थ्य
एकनाथ महाराज यांचे एक शिष्य पैठण मध्ये राहत होते.याचे वैशिष्ट्य असे होते की यांना सगळीकडे परमेश्वर दिसत असल्याने ते सगळ्यांना नमस्कार करत असे, म्हणून लोकांना हा त्यांचा नमस्काराचा प्रसंग तो चेष्टेचा वाटत असल्यामुळे त्यांना 'दंडवत स्वामी 'असे नाव पडले लोकांनी त्या स्वामी कडून गाढवाला नमस्कार करायला भाग पाडले.
एकनाथ महाराज यांना पातक लागले म्हणून देहांताची शिक्षा सांगितली पैठणमध्ये ज्ञानेश्वरांनी रेड्या मुखी वेद बोलावले त्याचप्रमाणे पाषाणाचे नंदी याला गवताचा घास खायला लावला तसे नाही झाले तर प्रायचित्त भोगावे लागणार होते एकनाथ महाराजांनी गवताची पेंडी म्हणजेच घास दगडाच्या नंदी समोर धरली आणि आता देवा घास खा म्हणून त्यांनी नंदी समोर झाला नंदिने तो खाल्ला आणि एकनाथ महाराज नंदीला म्हणाले की आता आपण येथे राहायचे नाही लोकांचा साक्षात्कारी नंदी म्हणून त्रास होईल म्हणून पाषाणाचा नंदी उठून नदीमध्ये जाऊन जलसमाधी घेतली .त्याच वेळेस एकनाथ महाराज यांनीही आपला देह ठेवला तो दिवस फाल्गुन वद्य षष्ठी या दिवशी एकनाथ षष्ठी म्हणूनही ओळखला जातो.
संत एकनाथ हे संत परंपरेतील शिरोमणी आहेत.
उत्तर द्याहटवात्यांच्याविषयी विस्तृत माहिती या लेखामार्फत अवगत झाली,
धन्यवाद सर 💐💐💐
Khup chhan sir👌👌
उत्तर द्याहटवा