Google ads

Ads Area

मराठी बोलीतील दुर्मीळ शब्द |marathi bolitil shabd

मराठी बोलीतील दुर्मीळ शब्द |marathi bolitil shabd

मराठी बोलीतील दुर्मीळ शब्द
मराठी बोलीतील दुर्मीळ शब्द
मराठी दुर्मीळ बोली(toc)

मराठी ग्रामीण बोलीतील असे शब्द असतात की ते सध्या वापरात नाहीत पण हे शब्द ज्या त्या लोकांच्या स्वभावानुसार बदलत गेले आहेत या शब्दांचा परिचय करुन घ्यायचा आहे

माणसांच्या स्वभावानुसार माणसाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. तर काही दिवसांनी हेच नाव सगळ्यांच्या अंगवळणी पडले जाते .यामागे अनेकांचा तर्कसंगत विचार, निरीक्षण ते कामी पडत असते,  तसा अनुभव इतरांनाही येत असतो. त्यामुळे अशी नावे पडली जातात आणि त्यानुसार त्याला त्या नावानुसार ओळखले जाते. हे नाव पडत असताना सुरुवातीचे नाव कोणी पाडले हे महत्त्वाचे नाही, पण नाव प्रचलित झाले हे महत्त्वाचे .म्हणून सर्वांची नावे जाणून घेणे महत्वाचे असते.आपले नाव ठेवले म्हणून त्यालाही वेगळ्या नावाने बोलावे म्हणूनही नावे ठेवली जातात . सध्याअशी नावे प्रचलित होण्यास तशी परिस्थिती नसते , कारण पालक एवढे जागृत झालेले आहेत की ते कुणालाच असले शब्द बोललेले आवडत नाही.

     आपल्याला कोणी नाव दिलेले आहे,  का दिलेले आहे त्या नावाशी आणि आपले गुण खरंच जुळतात का ? जे नाव देतो तो असाच न देता त्याचाही अभ्यास असतो म्हणून तो अशी नावे देत असतो. कारण अशी कोणतीही व्यक्ती नसणार आहे की त्याला आपल्या स्वभाव ,वर्तन ,शरीररचना ,व्यवसाय ,यानुसारच त्यांची नावे पाडली नाहीत ? .घरातील नाव ,लहानपणीचे नाव ,प्राथमिक शाळा ,माध्यमिक शाळा ,कॉलेजची नावे ,काम करत असताना त्यावेळी ठेवलेले नाव यातून आपल्याला असे लक्षात येईल की ही नावे ज्या त्या क्षेत्रापुरती मर्यादित असतात तर काही नावे ही सगळ्यांच्या परिचयाची असतात .याच नावांनी त्याची ओळख होत असते मग ही नावे कशी असतात त्याची ओळख करुन घेऊया .

       ही नावे वाचून काहींना आपल्याला ठेवलेल्या नावाची आठवण येईल काहींना माझा राग येईल तर काहींना आपले जीवन कसे होते याचा उजाळा होईल ,पण कोणाचेही मन दुखविण्याचा मुळीच हेतू नाही .वाचकांच्या बाबतीत या नावाशी योगायोग आला तरी ही पात्रे काल्पनिक आहेत असे समजून अशा नावात कशा पद्धतीने बोलले जाते ते पाहूया .

   कृपया कोणीही वाईट वाटून घेऊ नये .


व्यक्तीची नावे पडलेली 

1) स्वभावानुसार पडलेली नावे

१) कुचका पावटा

 हा  शब्द बऱ्याचदा तोंडावर न बोलता त्याच्या पाठीमागे बोलला जातो .आपण जे बोलतो त्याच्या नेमका वेगळ्याच हेतूने तो बघत असतो.

२) चांडा

 हा शब्द यासाठी वापरला जातो की त्याच्या मनात ,पोटात काही राहत नाही .कोणी काही कुठे बोलले तर लगेच कोणाला तरी सांगितल्याशिवाय जमतच नाही. लावालावी करण्याचे काम शक्यतो करतात.

३) वार्ताहार 

हा सुद्धा शब्द यासाठी वापरला जातो की,  गावात कुठे काही घडले की त्याचा  report हा लगेच सगळीकडे पोहचविणे आणि  हा विषय सगळ्या गावभर करणे. reporter  हे गावात पोहच करणे एवढे करायला पुढे असतात .

४ ) मारवाडी 

हा शब्द राजस्थानी लोकांना असला तरी आपल्याकडे हा  शब्द जो जास्त कंजूष असतो त्यासाठी वापरला जातो .

५) झापा 

 हा शब्द यासाठी वापरला जातो की ,गप्प बसून बसून वेगळेच, करणार, कोणाला वाटणार सुद्धा नाही असा असेल म्हणून ,सोंगाड्याचे सोंग घेऊन तीर मारायला चाललेला असतो .

अशी माणसे घातक असतात .केसाने गळा कापत असतात.

६) गोगलगाय

 हा शब्द गोगलगाय ही जशी असते तशीच काही लोकांची प्रवृत्ती असते .गोगलगाय ही पुढे काही अडथळा आला की आपली शिंगे आत घेते आणि अडथळा गेला की पुन्हा काढते तसेच काही लोक असतात म्हणून काहींना या नावाने बोलले जाते .

७) रावण 

 हा शब्द रामायणातील असून त्याच्या मनात चांगले काही नसून वाईट वृत्तीच असते म्हणून त्यास रावण म्हणले जाते. अशी माणसे भरपूर असतात .


८) आपलपोटी

याचा अर्थ फक्त आपल्याच फायद्याचा विचार करणे,दुसऱ्याचा कधीच विचार करत नाही .जगातील सगळ्या सुविधा मिळतात त्यापैकी मलाच अगोदर आणि अधिक मिळाल्या पाहिजेत .यावृत्तीची लोक  असतात.

 ९)बालीश 

हा शब्द यासाठी वापरला जातो की कुठं कोणता शब्द कसा वापरायचे याचे तारतम्य नसणे .उगाच काहीपण बडबड करत राहणे .लहान मुलांसारखे वागणे

१०) उधळ्या

 ज्याच्याकडे पैसा असो अगर नसो पण खर्चाचे तारतम्य नसते म्हणजे,कुठेही विनाकारण पैशाची उधळण करणे. 

११) बकासुर

 हा महाभारतात होऊन गेलेला एक राक्षस आहे . तो खूप खात असतो .काही लोक सुद्धा भरपूर खातात दुसर्यांना म्हणावं लागत असते की बास करा खायचं तरी पोट भरत नाहीत.

१२) आतल्या गाठीचा

आत एक आणि बाहेर वेगळेच असते ,बाहेर दाखवतात चांगला स्वभावआणिमनातून त्याचे वेगळेच शिजत असते . हा शब्द कोणास वापरला ततर त्याला खूप राग येत असतो .लोकांमध्ये बोलल्यावर तर जास्तच .

१३) बगळा

हा बगळा दिसायला पांढराशुभ्र पण शिकार करत असताना एखाद्या सज्जन माणसाचे सोंग घेत शांत ,नि:स्तब्ध असा पाण्यात राहून माशाला गिळंकृत करत असतो .तशीच काही माणसे असे असतात की त्यांना बगळाच म्हणतात .


2 ) वर्तनावरुन पडलेली नावे


१) टिंबा

 असा शब्द जो व्यक्ती ठेंगणा असतो म्हणजेच उंचीने लहान असतो तेव्हा हा असा शब्द त्यास वापरतात

२) लंबाट्या 

हा शब्द त्याच्या उंचीनुसार वापरला जातो व्यक्ती जर खूप उंच असेल तर त्याला हा शब्द वापरतात.

३) काकडी

हा सुद्धा शब्द नुसता उंचच झाला असेल पण त्याची तब्येत कमी असेल नुसता उंच फोकारा झाला असे म्हटले जाते म्हणून त्यास काकडी नावाने ओळखले जाते .

४) बाकाळ

हा शब्द खूप बोलण्यात पटाईत असून सगळे खोटेच बोलत असतं असं अनेकांचा अनुभव असतं त्यामुळे त्याला ह्या शब्दाचा ठपका पडलेला असतो . या व्यक्तीवर कोणीच विश्वास ठेवत नाही

५) दुलदुला /गांडूळ

हा शब्दही अनेक वेळा फसवत असतो, आता एक बोलतो तर दुसऱ्या वेळेस दुसऱ्याच बोलतो त्यामुळे याचा स्वभाव असा असतो की कालचा दिवस माहीत नसतो, आज जे बोलतोय तेच त्याला माहीत असते म्हणून यास दुलदुला असा शब्द वापरतात. तर कधी कधी या शब्दाला जोडशब्द म्हणजेच गांडूळ हा शब्द सुद्धा त्याला वापरला जातो म्हणजेच गांडूळाला दोन तोंड असतात .जसा प्रसंग येईल तशा पद्धतीने गांडूळ आपले तोंड फिरवत असतो अशाच स्वभावाचे काही लोक असत प्रसंग कसा असेल तर अशा पद्धतीने आपले विचार बदलतात.

६) मुक्या माजेचा

हा शब्द यासाठी वापरतात की मनात असते ,एक पण दाखवत मात्र काही नाही. गाय माजावर आली तर काही गाई ओरडत नाहीत अशाच प्रकारचे काही लोक असतात त्यानुसार त्यांना असे दूषण लावले जाते. म्हणजेच त्याला असे शब्द लावून त्याची टिंगल टवाळी केली जाते.


७) घुम्या

बोलता येत असूनही   सगळ्यांचे कान टवकारुन  ऐकून त्यावर आपली प्रतिक्रिया काहीच न देणे. फक्त शांत राहणे लोकांनी बोला असं जरी बोलले तरी एक- दुसरा शब्द बोलत असतो काही ठिकाणी मात्र बोलण्याला लगाम नसतो. पण काही ठिकाणी मुक्याचे सोंग घेऊन गप्प राहतात. सगळ्यांचे ऐकणे एवढंच त्यांचं काम असते .


८) कामचुकार

अंगात काम करण्याची ताकद दिली असतानाही जास्त काम करण्याची वृत्ती नसणे .आपलं कर्तव्य करत असतानाही याचा विचार करुन रहात असतात .

९) आखूड हाताचा

हा शब्द ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे पण देण्याची दानत नसली तर त्याला हा शब्द वापरतात .मदत म्हणून काही करत नाही.

१० ) रड्या

हा शब्द सारखा विव्हळत असतो त्यासाठी वापरला जातो .चांगला असतानासुद्धा सतत वाकडं तोंड करत राहतो 

अशी नावे आपण एकमेकांना ठेवत असतो .


3 ) शरीयष्टीवरुन पडलेली नावे 

या ठिकाणी सांगावेसे वाटते की कोणाला नाव ठेवणे ठेवणे हा उद्देश नसून जे समाजात बोलले जाते ते मांडत आहे असं तर आपण एकमेकांना बोलत असतो,ऐकत असतो त्यामुळे कोणीही मनाला लावून घेऊ नये.


१) बोंबील 

हाशब्द  एखादा कडकडीत व्यक्तीअसेल तर त्याच्या अंगावर चिमटा घ्यायला मांस नसेल तर घरातीलच जास्त वाळका/ बोंबील म्हणतात .


२ ) उंट /,जिराफ /बच्चन 

जास्त उंचीचा माणूस असला की त्याला हे संबोधन वापरले जाते.


३) बटक्या/खुजा/छोट्या/

उंचीला बारीक असेल तर या शब्दांचा मारा त्याला होत असतो .

एखादा मोठा जाडजूड व्यक्ती असला तर त्याला ह्या नावाने चिडवले जाते .यावर असेही गाणं म्हणलं जाते ."ढब्बू ढोल पैसा गोल पैसा पडला पत्र्याव ढब्बू बसला कुत्र्याव ."

4) किडकं रताळ

हा शब्द एखाद्या व्यक्तीला सारखे आजारी असल्यावर बोलले जाते ,

असे अनेक प्रकारे एकमेकांना बोलले जाते .

4 ) व्यवसायवरून पडलेली नावे

ही नावे जसा व्यवसाय किंवा आपल्या कामावरून नावे घेतली जातात .कुंभार,सुतार,माळी,भिकारी,उचल्या,मेंढका,शिरडुक्या,बैलक्या,,वाग्या,गारुडी,मिस्त्री,टेलर,ड्रायव्हर,गवळी,ज्योतिष इ.

 5 ) वाईट गुणावरुन बोलले जाते 

लबाड लांडगा

गरीब गाय

लपंगा

भामटा 

चौचाल

लंपट

हरामी

भिकारी 

कपाळ करंटा

पालथ्या हाताचा

मनकवडा

खवीस

साधू

अपिशा

6 ) चांगल्या गुणावरून

देवमाणूस

कर्ण

हरिश्चंद्र

देवदूत

माऊली

गुरु

वरील शब्दावरुन असे लक्षात येते की चांगले शब्द कोणी जास्त कोणाला वापरत नाहीत ,पण वाईट शब्द भरपूर आहेत .म्हणजेच लोक एकमेकांना वेगळ्या नावाने बोलाविण्यात अधिक धन्यता मानतात आणि त्याच नावाने त्याला बोलवत असतात. त्यात प्रेमाने सुद्धा बोलले जातात .तसेच त्याला नाव हे पडत असते .

      आपणास कळकळीची विनंती आहे की कोणाच्या भावना दुखावण्याचा उद्देश नाही,जे बोलले जाते त्यावर फक्त प्रकाश टाकला आहे .

   हे सगळे शब्द ग्रामीण भागात वापरले जातात कोणाकडे वेगळेच वापरत असतील तर काहींकडे वेगळे असतील , प्रादेशिक विभागानुसार आपल्या भाषेत मांडले आहेत ,जेणेकरुन हे शब्द कोणाला अजून 20 वर्षाने ऐकायला मिळणार नाहीत .

      याचे कारण की आताचे पालक सुज्ञ झाले आहेत.

समजा त्यांच्या मुलाचं नाव महेश असेल , आणि इतर मुलं त्याला  मह्या म्हणत असतील .

 यावर पालक ओरडून सांगतात की नीट बोल त्याचं नाव महेश आहे .

तसेच एखाद्याचे नाव मल्हारी असेल तर त्याला कोणी मल्या नावाने बोलले तर आताच्या पालकांना आवडत नाही, मग वरील शब्द जर कोणी बोलले तर त्याची खरडपट्टी होते.  .पूर्वीच्या काळी घरातील मल्या नावाने बोलत होते.त्यामुळे कोणी कोणाला काहीही बोलले तरी त्यावर प्रतिक्रिया पालक देत नव्हते .

आताचे पालक जे नाव आहे तेच घेतले पाहिजे असा अट्टाहास  धरतात .  

    समजा मुलाचे नाव ओम आहे तर त्याला ओम हेच नाव दिले पाहिजे.ओमड्या,ओमा,ओम्या असे नाव कोणी बोलू नये सांगतात, येडेवाकडे बोलू नका तशीच सगळे बोलतील या भीतीने मुलांना बजावून ठेवतात मग इतर मुलेही यास घाबरुन ओम असेच बोलतात. 

      हळूहळू हे शब्द काही काळाने ऐकायला सुद्धा मिळणार नाहीत ,त्यामुळे असे शब्द आपल्या मराठीत वेगळ्या अर्थाने नवीन आलेले दिसत आहेत,पण  नंतरच्या काळात मात्र अशा शब्दांचे (वापर ) प्रमाण कमी होत जाणार आहे .हे वास्तव चित्र आहे .

पुढील घटक अभ्यासा

समास आणि त्याचे प्रकार


टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area