Google ads

Ads Area

गुढीपाडवा मराठी माहिती | gudipadava marathi mahiti

 गुढीपाडवा मराठी माहिती | gudipadava marathi mahiti

गुढीपाडवा माहिती
गुढीपाडवा माहिती


गुढी पाडवा माहिती (toc)

गुढीपाडवा हा भारतातील एक महत्वाचा सण आहे .हा  चैत्र महिन्यातील प्रतिपदेला हा सण साजरा केला जातो, त्यानुसार या शेतीला महत्त्व आले महाराष्ट्रात नववर्ष म्हणून  गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो. या दिवशी अनेक आख्यायिका असल्या, तरीही एक विजयाचं प्रतीक म्हणून समृद्धीचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो असे म्हटले जातो .


गुढीपाडवा सणाचे महत्व | gudipadava sananache mhattva

         या सणाला नव वर्ष प्रारंभ होत असल्याने नव्या  रंगाचा सण म्हणून ओळखले जाते म्हणून हा सण शिमग्यानंतर येणारा पहिला सण आहे आणि गुढीपाडवा हा सण असल्याने घरातील सगळे अंगण स्वच्छ केले जाते. मातीचे घर असेल तर ते मातीने सारवतात ,शेणाचे  असेल तर शेणाने सारवून आणि कपडे जुनी-नवी सगळी  धुतली  जातात. 

      या नववर्षाचे नव्या दिमाखात,उत्साहात  हा सण साजरा केला जात असतो.   एक समृद्धी आणि विजय उत्सव म्हणून या सणाकडे पाहिले जाते या सणाचे महत्त्व अनेक असले तरी सुद्धा शिखर शिंगणापूर या ठिकाणी गुढीपाडव्यानंतर श्री शंभू महादेवाची यात्रा या गुढीपाडव्यानंतर सुरू होत असते असे म्हणतात. 

       या गुढीपाडव्याला महादेवाची कावड असते ती  कावड उभी करतात आणि यात्रेपर्यंतच्या काळात म्हणजेच काठीला  कावडीची कापडे गुंडाळण्याचा  मान असतो आणि त्या कावडीवर  काठी उभी करतात असेही म्हटले जाते तर हा सण म्हणजे सगळ्यांच्या उत्साहाचा, चैत्र प्रतिपदेला सुरुवात होणारा  सण म्हणून  या सणाला अधिक महत्त्व आहे.


गुढीपाडवा असा साजरा करतात| gudipadava asa kartat

 सकाळी  स्नान करुन गुढी उभारण्यासाठी लहान मुलांची लगबग सुरू झालेले असते. घरातील पुरुष मंडळी  गुढी करण्यासाठी त्याचे काठी किंवा मोठी शेवरीची उंच काठी घेऊन काठीला स्वच्छ धुतले जाते आणि घराच्या समोर दरवाजाच्या बाजूला उभी केली जाते आणि त्याला त्याला लिंबाचा पाला  त्या गूळ एकत्र केलेले  मिश्रण करून जो पदार्थ तयार होतो तो प्रसाद म्हणून सगळ्यांना खायला दिला जातो 

    .यामध्ये सगळेजण प्रसाद आवडीने  घेतात .कडुलिंबाचा पाला आणि गूळ सोबत ग्रहण करत असतात पण यात लहान मुलांना हा प्रसाद खाण्यात जास्त रस नसतो गुढी उभारण्यासाठी या मुलांना खूप आनंद वाटत असतो.वडिलांच्या पुढे हे करू का ते करू का पुढे पुढे करण्याचा प्रयत्न केला जातो तेच आहेत आणि त्यांना खूप आनंद वाटत असतो


गुढीपाडव्याची आणखी एका कथा|gudipadvyachi katha

 अशी सांगितली जाते श्रीरामाने रावणाचा वध करुन या विजयाचा उत्सव माणूस सगळ्यांच्या घरी उभारली जाते अशी एक कथा सांगितलली जाते.


गुढीपाडवा म्हणजे शुभ मुहूर्त| gudipadava shubh muhurta

 या शुभ मुहूर्तला पण तिथी,मुहूर्त बघण्याची गरज पडत नाही. गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असा मानला जातो. त्यापैकी दसरा. दिवाळीचा पाडवा, अक्षय तृतीया आणि गुढीपाडवा  हे सण आहेत त्यातील गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात आनंदाने उत्साहात धामधुमीत साजरा केला जातो.

 मराठी माणसांचा हा वर्षातील पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रात आणि इतरही राज्यात हा सण साजरा करत असल्यामुळे आणि नवीन वर्षाच्या स्वागताची सुरुवात असल्यामुळे या सणाकडे खूप उत्सुकतेने पाहिले जाते. या सणापासून म्हणजेच या दिवसापासून वसंत ऋतुचे आगमन झाल्यामुळे शालिवाहन शक या दिवसापासून खर्‍या अर्थाने सुरुवात झाली असे मानतात.

       या सणादिवशी अनेकांच्या वेगवेगळ्या श्रद्धा असतात व्यक्ती तितक्या प्रकृती नुसार प्रत्येक जण या सणाला महत्त्व देत असतो. नवीन काही खरेदी करायचा असेल तर गुढीपाडव्याचा मुहूर्त बघितला जातो सोने खरेदी, एखादी गाडी असेल, घर असेल, वास्तुशांती मुहूर्त, गृहप्रवेश, घर बांधण्यासाठी पाया पूजा असेल अशा अनेक गोष्टीसाठी गुढीपाडवा म्हणजेच यात साडेतीन मुहूर्तापैकी कोणत्याही सणाची निवड करत असतात.


गुढीपाडव्या विषयी आख्यायिका | gudhipadava aakhyayika

 १ ) पहिली  अख्यायिका 

     प्रभू रामचंद्र हे 14 वर्षे वनवासात होते त्या ठिकाणी राक्षसांचा वध करून म्हणजेच रावणाचा वध करून आयोध्यामध्ये निघाले असताना भगवान रामचंद्र हे अयोध्येत येणार असल्याची खबर लोकांना द्यावी म्हणून राम भक्त हनुमान हे आयोध्या नगरीत लवकर जाऊन तेथील लोकांना प्रभुरामचंद्र यांचे आगमन होणार आहे असे लोकांना सांगितले. 

     प्रभू रामचंद्र हे 14 वर्षातून आयोध्या नगरीत प्रवेश करणार म्हणून सगळ्यांना अत्यानंद झाला आणि हा अत्यानंद म्हणजेच त्यांनी एका राक्षसाचा पराभव करून सत्याचे राज्य निर्माण केले ,विजयाचे प्रतीक ,समृद्धीचे प्रतीक म्हणून लोकांनी आपल्या घरासमोर गुढी उभारली आणि तेव्हापासून गुढीपाडव्याचा मुहूर्त सण उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडव्यापासूनच रामनवमी म्हणजे रामाचा जन्म साजरा केला जातो. 

२ ) दुसरी आख्यायिका अशी आहे 

  प्राचीन काळी असे सांगितले जाते की शालिवाहन नावाचा जो राजा आहे त्या राजाचा कुंभर नावाचा पत्र होता त्याने शकांचा पराभव केला पण हे पराभव करण्यासाठी 6000 त्यांनी मातीचे पुतळे म्हणजे सैनिक बनवले त्यात त्या मातीच्या पुतळ्यामध्ये प्राण ओतले गेले .याच पुतळ्यांच्या म्हणजे सैनिकांच्या साह्याने शकांचा पराभव केला तेव्हापासून शालिवाहन राजा त्या नावे नवीन कालगणना सुरू झाली आहे ,ते याच काळापासून झाली आहे असे म्हटले जाते .

३ ) तिसरी आख्यायिका

  देवी पार्वती चा आणि भगवान शंकराचा विवाह जो ठरला तो गुढीपाडव्याचा दिवस होता या गुढीपाडव्यापासून तृतीया पर्यंत हे चालू होते आणि तृतीय आला त्यांचा विवाह झाला म्हणून या सणाला खूप महत्त्व आहे या सणात देवी पार्वती मातेची म्हणजेच आदिशक्तीची पूजा केली जाते, म्हणून या देवीला, सणाला देवी चैत्र नवरात्र असेही म्हटले जाते अजुनी पुढे असे सांगितले जाते की पार्वती माता ही गुढीपाडवा झाल्यावर एक महिन्यासाठी माहेरी जातात आणि अक्षय तृतीया या सणाला आपल्या सासरी जातात अशी आख्यायिका सांगितली  आहे.

 गुढीपाडवा सणात होणारे कार्यक्रम| gudipadavyat honare karyakram

 हा सण मराठी माणसांसाठी खूप महत्त्वाचा सण म्हणून साजरा करतात या सणादिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात . आपले घर स्वच्छ ठेवून रांगोळी काढून भोवतालचा परिसर आनंदमय वातावरणात कसा राहील याचा विचार करतात तर गावपातळीवर किंवा शहरांमध्ये एखाद्या चांगल्या गोष्टी, कामाचे मुहूर्तमेढ, कार्यक्रम ठरविले जातात. या कार्यक्रमाला मोठे मान्यवर उपस्थित राहतात ढोल, ताशा, झांज लेझीम, झांजपताका अशा अनेक विविध वाद्यांनी हा सण उत्साहात साजरा केला जातो .

स्त्री-पुरुष या सणात अगदी नटून थटून आपला उत्साह सण साजरा करत असतात. बरेच पुरुष मंडळी हे सलवार कुर्ता आणि डोक्याला फेटा बांधून असतात तर स्त्रिया सुद्धा शालू पैठणी नेसून फेटा बांधत असतात, शिवाजी महाराजांसारखा  पेहराव लहान मुलं करत असतात त्यामुळे अवतीभवतीचा परिसर या गुढीपाडव्याच्या सणात आणि ढोल-ताशांच्या गजरात दणाणून जात असतो .

गुढीपाडव्यानंतर होणारे निसर्गातील बदल  | gudipadavyanantar honare badal

गुढीपाडव्यानंतर निसर्गात अनेक चांगले बदल होत असतात चैत्रपालवी ही सगळीकडे फुटली , नवीन पाने भरलेली असतात. त्यामुळे निसर्ग हा हिरवागार असा दिसत असतो. शिमग्यानंतर या सणाला अति उत्साहाचे वातावरण तयार झालेले असते. 

       सुगीचे दिवस संपून निवांतपणा थोडासा आलेला असतो , शिमग्याच्या महिन्यात कोणतेही मुहूर्त नसल्याने चैत्र महिना झाल्यानंतर गावाकडच्या यात्रा सुरू होतात,  तर काहीची लग्न समारंभ उरकून घेण्यासाठी धावपळ चालू असते. चैत्र महिना संपताच मुलांच्या परीक्षा काहींच्या संपत आलेल्या असतात .काहींच्या सुरू होणार असतात त्याच्यामुळे गावाकडे जाऊन मामांच्या घरी राहायला मिळेल या आशेने मुलांची ओढ शिगेला लागलेली असते. तर सुगीचे दिवस संपल्यामुळे शेतातील काम असल्याने  स्त्रियांना घरी बसून शेवाळ्या, कुरडया, पापड,  लोणचे आणि इतर कामे करण्यासाठी  हे गुढीपाडव्यानंतरचे दिवस महत्त्वाचे असतात. 

        उन्हाळ्याचे दिवस असल्याने जेवण खान हे घरात बसून न करता बाहेरच्या ओट्यावर करून जेवणाचा मनमुराद आनंद घेत असतात. गप्पागोष्टी ह्या चालत असतात बहुतेक घरात लोक झोपण्याची बाहेरच्या शांत अशा वातावरणात रात्रीची झोप घेत असतात आजूबाजूला सगळे लोक बाहेरच झोपलेले असल्याने रात्रीचे लोक गप्पागोष्टी करायला आपले घर सोडून चौकात फिरत असतात. 

       झाडांना नवीन पालवी फुटलेली असते आंब्याचा मोहोर येऊन आंबे लागलेले असतात तर लिंबाच्या झाडांनाही मोहोर येऊन बारीक लिंबोळ्या येऊ लागलेल्या असतात करवंदाचे छोटेसे फळ वर्षातून एकदा येत असते ते याच दिवसात, जांभळांना मोहोर येऊन त्यांना जांभळे येऊ लागतात.

         असा हा चैत्र महिना निसर्गरम्य अशा वातावरणात अनेक जण या चैत्र महिन्यातील उत्साहाचे वातावरण निर्माण करून देणारा आणि आनंदी वातावरण निर्माण करून देणारा असा हा महिना असून या महिन्यातील गुढीपाडवा या सणानंतर अनेक लोकांना उत्साहाचे वातावरण निर्माण होत असते. या सणाला वर्षातील पहिला सण म्हणून पाहिले जाते आणि त्याचा उत्साहाने तो साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area