Google ads

Ads Area

महिला दिन मराठी माहिती | mahila din marathi mahiti

     महिला दिन मराठी माहिती | mahila din marathi mahiti 

महिला दिन म्हटलं की आपल्या लक्षात येते की महिलांसाठी हा  महत्वाचा दिवस आहे. त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला प्रतिकार करणे आणि आपले समाजातील स्थान उच्च ठेवले आहे म्हणूनच आज स्त्री ही सशक्त म्हणून वावरत आहे. कोणीही आज स्त्री ही दुबळी आहे असं म्हणू शकत नाही स्त्रियांनी लढा दिला म्हणून त्यांचे हक्क त्यांना मिळाले म्हणून आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.

       तरीही काही भागात स्त्रीला दुय्यम स्थान दिले जाते, स्त्री म्हणजे शक्ती आणि हे शक्ती आले तर कोणत्याही कठीण प्रसगी ती त्याला तोंड देत असते. अशा या महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीस अभिवादन ! 

महिला दिन माहिती
महिला दिन माहिती


महिला दिन (toc)

महिला दिन का साजरा केला जातो | mahila din ka sajara kela jato


       याचा इतिहास आपण बघणार आहोत महिला दिनाविषयी दोन दिवस ठरवलेले होते ते कोणते तर 28 फेब्रुवारी 1909 रोजी पहिला न्यूयॉर्क पहिला महिला दिन म्हणून साजरा केला होता. त्यानंतर 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मानलेली जी सूचना आहे या सूचनेनुसार 8 मार्च महिला दिन म्हणून घोषित केले. त्यानुसारच आज 8 मार्च या दिवशी महिला दिन म्हणून साजरा केला जातो.त्याच्या पाठीमागे खूप मोठा इतिहास आहे त्यामुळेच हा आज 8 मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो.

महिला दिन इतिहास | mahila din itihas


      अमेरिका आणि युरोपमध्ये महिलांना मतदानाचा हक्क नाकारलेला होता, फक्त पुरुषांनाच मतदान करण्याचा अधिकार होता यातूनच आपल्याला हे सांगता येऊ शकते की पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात होती म्हणजेच स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात होते . अनेक ठिकाणी अनेक वेळा स्त्री आपल्यावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी झटत होत्या. 

     1890 मध्ये अमेरिकेमध्ये स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून " द नॅशनल अमेरिकन सप्रे असोसिएट" ही संस्था स्थापन करण्यात आली या संस्थेमध्ये सुद्धा विषमता होती त्या ठिकाणी काळे गोरे असा वर्णद्वेष बघायला मिळत होता , इतर देशाकडून आलेले जे लोक स्थलांतरित आहेत त्या स्थलांतरित लोकांविषयी त्यांच्या मनामध्ये पूर्वग्रह होता.

         म्हणून तेथे जास्त वेळा त्या स्त्रियांनी मतदानाचा हक्क मिळावा म्हणून संघर्ष करायला सुरुवात केली. म्हणून ज्या स्त्रियांना मतदानापासून वंचित ठेवले होते तसेच  जे स्थलांतरीत होते अशा स्त्रियांना मतदान करण्याचा  किंवा  मिळवण्याचा हक्क यासाठी देशात जोरदार निदर्शने करु लागली. मार्क्सवादी विचारसरणी या विचारसरणीनुसार मतदान हक्काची जी मागणी आहे त्या मागणीला पाठिंबा दिला यामुळेच 1907 साली स्टुटगार्ट येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. 

स्त्रियांचे कर्तव्य काय आहे हे क्लारा झेटकिन ह्यांनी  स्त्रियांच्या बाजूने असलेली स्त्रियांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी, मतदानाचा हक्क मिळण्यासाठी हे समाजवादी स्त्रीयांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. अशा कम्युनिस्ट कार्यकर्त्या यांनी अशी घोषणा केली.. त्यांच्या रेल्वेने 8 मार्च 1908 रोजी  न्यूयॉर्कमध्ये कापड उद्योगातील स्त्रिया संघटित होऊन  हजारो स्त्रीयांचा जमाव निर्माण झाला आणि त्यांनी निदर्शने कारायला सुरुवात केली हा त्यांचा जमाव ऐतिहासिक होता .याअगोदर असा जमाव स्त्रियांचा कधीही नव्हता.

  महिलांची मागणी 

 स्त्रियांच्या मागण्या ह्या होत्या की

 1)  दहा तासांचा दिवस असावा.

2 )  कामाच्या ठिकाणी सुरक्षितता असावी.

 अशी त्यांची मागणी होती तसेच त्यांना सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा .अशी मागणी त्यांनी केली होती त्यांना अमेरिकेमध्ये अशा या स्त्रियांचे प्रश्न मांडून त्यांनी जे सगळ्यांना प्रभावित केले त्यामुळे त्या अतिशय प्रेरणादायी ठरल्या. 

      दुसऱ्या जागतिक महिला परिषद 1910 साली कोपनहेगन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1998 रोजी इंग्लंड येतील स्त्री कामगारांनी जी  ऐतिहासिक  कामगिरी केली त्या काम केलेस अनुसरून 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून क्लारा झेटकीन यांनी सुचित केले त्यांच्या या मताचा प्रभाव सगळीकडे पडला आणि तो मान्य झाला त्यांच्या या विचारांना  इतर देशांमध्ये युरोप, अमेरिका मतदानाच्या हक्कासाठी अनेक ठिकाणी महिलांनी मोहिमा उघडल्या.

     या प्रचंड स्त्री समूहास यश येऊ लागले 1918 वैशाली तर 1919 साली अमेरिकेत या मागण्याना भरपूर यश मिळाले.

 भारतात महिला दिन | Bhartatil mahila din

मुंबई या ठिकाणी 8 मार्च 1943 रोजी महिला दिन साजरा केलेला आहे .त्यानंतर पुणे या ठिकाणी 8 मार्च 1971 रोजी स्त्रियांचा खूप मोठा मोर्चा निघाला होता  . नंतर 1975  युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले  त्यांच्या या विचारामुळे महिलांवर होणारे अन्याय आपोआप कमी होत गेले.

      त्यांच्या समस्या समाजासमोर येऊ लागल्या स्त्री बोलू लागली त्यांना सर्व क्षेत्रात म्हणजेच, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक कार्यालयमध्ये 8 मार्च हा दिवस महिला दिवस म्हणून सगळीकडेच साजरा केला जात आहे. 1975 रोजी संयुक्त राष्ट्राने 8 मार्च 1975 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करावा ठरवले तसेच 1977 कार्य संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्य आहेत त्या सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करण्यासाठी आवाहन केले आणि त्याच्या पद्धतीची अंमलबजावणी आजही केली जात आहे .


 महिला दिन असा करतात साजरा| mahila din asa kartat sajara


 या दिवशी प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला जातो या स्त्रियामुळे घरातील प्रगती उत्तरोत्तर वाढत आहे यामुळे प्रत्येक स्त्रीला शुभेच्छा दिल्या जातात. महिलांनाही आपला दिवस आहे म्हणून त्यांना या दिवसाचे खूप महत्त्व वाटत असते . या दिवशी मात्र इटलीमध्ये महिलांना पिवळ्या सुसर ची फुले भेट घेऊन शुभेच्छा देतात. स्त्रियांनाही आपला स्त्रीत्वाचा काहीतरी करुन दाखविण्याची स्फूर्ती दिसत असते . 


स्त्रियांच्या समस्या | striyanchya samsya

    आज ही स्त्री शिक्षित असलेल्या दिसतात तरीही समाजामध्ये अनेक ठिकाणी अत्याचाराला, अन्यायाला बळी पडलेल्या दिसतात .या गोष्टीला आळा बसण्यासाठी महिला संघटना आणि कायद्याचा अधिकार असल्याने स्त्रियांना सुरक्षिततेची हमी देणारे कायदे आल्याने स्त्रियांना त्यांचे कार्यकर्तव्य करण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत .चूल आणि मूल एवढेच क्षेत्र मर्यादित न राहता आता त्या कार्य करण्यासाठी उंच भरारी मारीत आहेत .

  म्हणून आजची स्त्री हे सगळ्यांना अबला नसून सबला आहे हे सिद्ध होत आहे अनेक कर्तृत्ववान स्त्रिया यांचा आजच्या महिला दिन गौरव आणि आज कष्ट करून उभ्या राहणाऱ्या संसारामध्ये पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आपले कार्यकर्तृत्व करणाऱ्या स्त्रियांना अभिवादन!

काही कर्तृत्ववान स्त्रियांना अभिवादन देण्यासाठी खालील स्त्रियांची माहिती वाचा .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area