Google ads

Ads Area

सुख कसे असते | sukh kse aste

          सुख कसे असते | sukh kse aste

सुख कसे असते
सुख कसे असते


सुख म्हणजे काय ( toc )

माणूस जन्माला आला की त्या
ला प्रत्येक जीवाला आपण सुखी असावे असे वाटत असते. हे सुख काय असते हे सांगून समजणार नाही. सुखाचा मार्ग पत्करण्यासाठी अनेकांनी अनेक गोष्टींचा त्याग केला , तरीही माणसाला सुख भेटत नाही. ह्या सुखासाठी माणूस वणवण भटकत असतो त्याचे सगळे आयुष्य पणास लावतो ह्या सुखासाठी वाटेल ते करत असतो पण तरीही सुख हे मात्र मिळतच नाही. सुख करता करता आपलं जीवन दुःखी करत असतो, हे आपण जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक साधू संतांनी परमार्थ साधला देवाची भक्ती केली त्यात त्यांना सुख प्राप्त झाले .

     प्रत्येक माणूस हा सुखाकरता धास्तावलेला असतो. जगात कोणताच मनुष्य असा नाही की त्याला सुख नको आहे ,फक्त दुःखच द्या असं कोणीच म्हणत नाही. दुःख जरी मागत असले तरी त्याच्या पाठीमागे सुखाची अपेक्षा राहणार असते. 

उदा. संत एकनाथ महाराज म्हणतात

 " मज लागी दुःख व्हावे| ऐसी कोणी भाविना जीवे |न वांच्छिता दुःख पावे| येणे संभवे स्वतंत्रतता||" महाभारतामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे सांगितले आहे दुःख हे सगळ्यांना नको असते. सुखासाठी लोक बऱ्याच गोष्टींचा आपल्या जीवनात त्याग करत असतात. तुकाराम महाराज याविषयी म्हणतात

         देव धर्म सांदी पडिले सकळ | विषयी गोंधळ गाजतसे||

 माझे सुख मात्र सगळ्यांनाच हवे असते महाभारतामध्ये  कुंतीचे पात्र सगळ्यांना माहीत आहेच. म्हणजे दुःखाचे प्रसंग मला येऊ दे या म्हणण्याच्या पाठीमागे एक कारण आहे ,की त्यातही सुखाचा अंतर्भाव दिसतो कारण  संकटात श्रीकृष्ण धावून येणार म्हणजे त्याचे दर्शन होणार म्हणजे त्या त्यागात सुद्धा सुखाचाच अंतर्भाव असतो हे आपण गृहीत धरले पाहिजे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा विचार केला तर आपल्याला सुखासाठी सगळं कष्ट सोसावे लागत असते किंवा सुख देण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी करत असतो मग त्या भौतिक सुखाचा असू द्या किंवा परमार्थ सुखाचा पण त्याच्यामध्ये सुख हे लपले आहेच.

            सुख हे एकच आहे पण सुखाचे विषय अनेक आहेत. संसारात प्रत्येकाचा सुखाचा विषय हा वेगळा असतो परमार्थात मात्र साधुसंतांना भगवंताशी ईश्वर प्राप्ति किंवा ईश्वराची भक्ती करण्यातच सुख असते अशा या सुखाचा आपल्याला संदर्भ लक्षात घ्यायचा आहे .


सांसारिक सुख | sansarik sukh

संसारिक सुखामध्ये  अनेकजण सुखी असतात असे वाटते पण त्याला विचारले तर कसले सुख म्हणून हळहळ करत असतात.

1 ) सात्विक सुख |satvik sukh

 या सुखा मध्ये प्रथमता संकट, अडचणी, कठीण काळ असतो  त्यानंतर चांगले दिवस येत असतात त्याला सात्विक सुखाचा आनंद म्हणतात.

 ज्ञानेश्वर महाराज यांनी म्हटले आहे

 आता चंदनाचे बुड|सर्पि जैसे दुवाड|

 का निधानाचे तोंड| वीवसियाजेवी|| 

असे सांगितले की चंदन मिळवण्याकरता सर्प बाजूस करावा लागतो तसेच हेच आपल्याला धनाचा साठा, संपत्ती पाहिजे असेल तर त्या मार्गात येणाऱ्या भुतांना बाजूला करावे लागते. म्हणजे अगोदर संकटाचा सामना करूनच चांगले दिवस येतात.  सात्त्विक सुख अनेकांच्या वाट्याला येत असते ज्यांनी लहानपणापासून अपार कष्ट केलेले असते त्यांना नंतर चांगले फळ मिळत असते. हे सात्विक सुख .


2) राजस सुख | rajas sukh

या सुखामध्ये क्षणिक सुखाचा आनंद मिळत असतो .मनुष्य हा क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागलेला असतो आणि आपला घात करत असतो. विषय व इंद्रिय यांच्या आधीन जातो. या क्षणभर सुखासाठी आपल्या आयुष्याची राखरांगोळी करत असतो याचे परिणाम वाईट होत असतात हे माहीत असूनही या क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागलेले असतात .आणि त्याचा परिणाम मात्र नंतर भोगावा लागतो.

         आपण असेच म्हणू की आपल्याला सण-उत्सव करायचा आहे हे त्यासाठी पैसा पाहिजे पण पैसा हा घरात नसल्याने सावकाराकडून कर्ज घेऊन आपण तो खर्च करतो. पण ,सण-उत्सव एका दिवसाचा असतो किंवा लग्नकार्य म्हणा पण त्यासाठी घेतलेले कर्ज हे आयुष्यभर फेडावे  लागत असते म्हणजे एक क्षणाच्या सुखासाठी केलेले कृत्य आयुष्यभर त्याचा आपल्याला परिणाम भोगावा वाटत असतो.


3 ) तामस सुख | tamas sukh

           या सुखामध्ये फक्त सुखाचा आभास होत असतो पण असते मात्र पूर्ण दुःखच .एखाद्या माणसाला कोणतेही व्यसन लागले मग ते दारूचे असू द्या किंवा विषय वासनेचे  किंवा जुगार खेळण्याचे असुद्या त्याला त्यात सुख वाटत असते. यातून बाहेर पडता येत नाही त्याला ते सुख वाटत असले तरीसुद्धा  दुःखच असते या सुखा मध्ये अनेक जण कामसुखाच्या चक्रामध्ये अडकलेले दिसतात . 

तुकाराम महाराज म्हणतात .

ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी|

 तेथे चित्त झणी जडो देसी||

             म्हणजेच ब्रह्मदेवास पण आहे त्याच्यामध्ये पूर्ण सुख हे  कोणालाच मिळत नाही म्हणजे त्या वासनेत अडकलेला जो मनुष्य प्राणी आहे तो यातून सुटू शकत नाही जरी तो सुख म्हणत असला तरी ते पूर्ण सुख नाही तर ते दुःखच आहे.


सुखाचे प्रकार पडतात | sukhache prakar (उत्तरोत्तर श्रेष्ठ असेल

1)  विषयसुख | vishaysukh

या सुखासाठी अनेक जण स्वर्गसुख मानत असतात पण हे सुख मिळाल्यानंतर ते हळूहळू कमी कमी होत जात असते. म्हणजेच सुखाची घट होत जाते.

 उदा. सुरुवातीला नवरा बायकोचे प्रेम खूप असते एक वर्षाने त्यांच्यामध्ये खूप अंतर पडलेले असते दहा वर्षांमध्ये तर एकमेकाचा तिरस्कार करण्यात मशगुल असतात हे सांसारिक सुख आहे.


2 ) ब्रम्हसुख | brahmasukh

        हे सुख मिळवण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे यातून कोणताही प्रकारचा दुःखाचा लवलेश नाही सुख वाढतही नाही म्हणजे मधली अवस्था आहे ते म्हणजे ब्रम्हसुख असते म्हणजे स्थिर भावनेनं अशा ब्रह्मसुखाकडे पाहिले जाते.म्हणजेच घटतही नाही वाढतही नाही.


3) प्रेमसुख | premsukh

हे सुख सतत वाढत असते म्हणजे उत्तरोत्तर वाढण्याच्या मार्गावरील रस्ते यास भक्तीसुख असे म्हणतात .नारद या सुखाला प्रतिष्टन वर्धमान असे म्हणतात तर तुकाराम महाराज म्हणतात अंगी प्रेमाचे भरते नेकी उतार चढते मी स्वतः जे आहे  प्रेमसुख सतत वाढत जाते याला भक्ती सुख असे म्हटले आहे. म्हणजे ते सतत उत्तरोत्तर वाढ होण्याच्या मार्गावर असते .

      एखाद्या देवाची भक्ती करायला लागला तर त्यातून मिळणारे प्रेमसुख आहे ते सतत वाढत जाते म्हणजे फक्त ती करायला गेलात तर ती भक्ती अधिक अधिक वाढत जाते आणि त्यातून आनंद मिळत असतो म्हणजे सुख मिळत असते.


परमार्थिक सुख | parmarthik sukh

 या सुखा मध्ये तीन प्रकार पडत असताना जेव्हा भगवंताच्या लीला पाहून एखादा भक्त भगवंताच्या लीला मध्येच तल्लीन होतो मग्न होतो. ते सुख परमार्थिक सुख आहे

 उदा. गोकुळात प्रगट झाले त्यावेळेस गोकुळात राहणाऱ्या लोकांना तीन प्रकारचे सुख मिळाले .

1 )  आधिभौतिक सुख | aadhibhautik sukh

 हे सुख म्हणजे देवाने घरात येणे असा अर्थ होतो त्याचे सुख वेगळेच असते . देवघरात येणे असे म्हटले जाते 

2) आधिदैविक सुख | aadhidaivik sukh

    देव अंतरात येणे म्हणजे भक्ती करून आपण त्या देवाला आपल्या अंतकरणात ठेवू शकतो त्याला देव अंतरात येणे म्हणतात 
3 ) आध्यात्मिक सुख | aadhyatmik sukh

   देव अनुभवात येणे म्हणजे प्रत्यक्ष देवच होऊन जाणे. 

उदा. तुकाराम महाराज म्हणतात 

देव पहावया गेलो आणि ते देवच होऊन गेलो 

म्हणजे ती नसताना देवाचा होऊन गेलो तर ती अनुभवास येत असते.

           अशाप्रकारे सुखाचे नऊ प्रकार सांगता येतात. या सुखांच्या नऊ प्रकारांपैकी माणसाला सुखाचे उत्तरोत्तर वाढणारे सुख आणि परमार्थिक सुख या सर्व प्रकारांमध्ये हे परमार्थिक सुख हे देव प्राप्तीसाठी भगवंताच्या प्राप्तीसाठी असते .आता ह्या सुखाच्या बाजू सुख म्हणजेच काय हे आपण जाणून घेण्यासाठी गरजेवर सुख अवलंबून असते. जेवढी गरज जास्त तेवढे सुख आपल्याला मिळतअसते.


सुखाचा व्यवहार | sukhacha vyavahar

 सुखाचा व्यवहार हा चार प्रकारे केला जातो .

1 ) व्यवहार दुःखाचा फळेही दुःखाचे

 संसारात रममान होत असतो ,भौतिक सुखाच्या पाठीमागे लागलेलो असतो तरीही संसारामध्ये दुःख हे मिळतच असते. सुखाच्या आशेने अनेक खटाटोप करत असतो, तरीसुद्धा त्याला दुःख हे मिळतच असते,  व्यवहार दुःखाचा म्हणजे संसार दुःखाचा आहे आणि फळ सुद्धा त्यातून दुःखाचे मिळत असते .


 2 ) व्यवहार दुःखाचा मात्र फळ सुखाचे 

यामध्ये काही काळ  हा कठीण असतो त्याचे जे फळ मिळते  ते मात्र सुखाचे असते. आईला बाळ होण्यासाठी नऊ महिने त्रासदायक यातना होत असतात .पण ,बाळाचे मूक पाहील्यानंतर तिला जो आनंद भेटतो जे सुख  असते ते खूप मोठे असते किंवा 100 यज्ञ करायचे  ठरवले तर ते करण्यासाठी अनेक कठीण प्रसंग येतात पण त्या यज्ञातून मिळणारे जे इंद्रपद असते जे सुख असतं ते अढळ असते.


3 ) व्यवहार सुखाचा फळ दुःखाचे

 मनुष्यप्राणी हा भौतिक सुखांमध्ये रममाण होतो. संसार करत असताना परमार्थ पण साधण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे संसाराबरोबर परमार्थ करण्यासाठी तो आटापिटा करीत असतो पण त्याचे वर्तन हे सदाचारी नसते, नीतिमत्तेला धरून नसते. त्याच्यामुळे त्याचे वरवरचे वागणे जरी चांगले असले ,पण त्याची नीतिमत्ता खोटी असेल तर त्याला दुःखच मिळत असते . व्यवहार सुखाचा वाटत असला तरी त्याचं वर्तन चांगले नसल्यामुळे तो सद्गृहस्थ नसल्यामुळे त्याच्या मनामध्ये धूर्तपणा असल्यामुळे दुःख भोगावे लागते.


 4 ) व्यवहार सुखाचा फळही सुखाचे

 संतांनी संसारात राहून परमार्थाचा व्यवहार केला त्यांचे आयुष्य  सदाचारी वृत्तीचे होते आचरण चांगले होते आणि आचरण चांगले असल्यामुळे परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायला अडचण आली नाही, म्हणजे त्यांची नीतिमत्ता चांगले होती. व्यवहारच त्यांचा सुखाचा होता आणि त्याच्यामुळे जीवन सुखाचे होते. म्हणजे त्याचे फळसुद्धा सुखाचे होते . हे संतांनाच लाभू शकते . तुमच्या आमच्या सारखे जीव सुखाचा आनंद घेऊ शकत नाहीत कारण की आपली नीतिमत्ता ही आपल्यालाच माहीत असते. आपण कोणत्या मार्गाने जातोय ,आपले सद्वर्तन आहे की नाही हे आपल्याला माहीत असते त्यामुळे आपण कोणत्या सुखामध्ये आहे हे ज्याने त्याने जाणून घेणे महत्वाचे आहे आहे.

 आपण सुखाचे असलेले महत्त्व पाहिले .सुख म्हणजेच काय हे समजले असेलच. सुख कशात असते हे काही लोक म्हणतात की, ते अंगातच सुख असते ,ते तर काही लोक म्हणतात त्याग न करता सुख उपभोगायचे असते प्रत्येकाचा विचार वेगवेगळला असतो . व्यक्ती तितक्या प्रकृती  नियमानुसार प्रत्येकाची जीवन जगण्याची कला वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या बुद्धीनुसार प्रत्येक जण विचार करत असतो ,प्रत्येक जण आपल्या सुखाचा मार्ग शोधत असतो.  

       सुख ही एकच गोष्ट आहे आणि ते मिळवण्यासाठी अनेक साधने आहेत आणि या साधनांचा उपयोग करुनही सुख मिळत नाही .परमार्थ साधण्यासाठी सांसारिक गोष्टींचा त्याग केलेला असतो पण त्यातून त्यांना दुःखाचा अनुभव न येता सुखाचा अनुभव येत असे असतो तर परमार्थामध्ये सुखाचा अनुभव आहे शाश्वत आहे सत्य आहे आणि तो चिरकाल निरंतर टिकणारा असा अनुभव फक्त परमार्थामध्ये आहे सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला परमार्थाच्या मार्गाने जावे लागत असते . मात्र आजही माहीत नाही की  मनुष्य मात्र आजही भौतिक सुखाच्या मागे लागलेला आहे. या सुखाच्या पाठीमागे लागून सात्विक सुख मात्र त्याने सोडून दिले आहे. 

      माणसाला सुखी व्हायचे असेल तर आपल्या भाषेत सांगायचे झाले तर गरिबांना आधार द्या ज्यांना गरज असेल त्यांना तशा पद्धतीचे जीवनमान द्या, संतांच्या वचनाप्रमाणे  इतरांकडून अपेक्षा ठेवू नका विषयवासनेमध्ये रमू नका, स्वार्थपणा सोडून द्या ,आपला हात मदतीचा ठेवा,  

 " देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे " यातच खरा आपला सुखाचा मार्ग आहे आणि तो आपण  अजमावला पाहिजे.   'पारमार्थिक शतकोटी ' ह.भ .प . यशवंत पाटील या पुस्तकातून सुखाचे संदर्भ घेतले आहेत .तुम्हीही जरुर वाचा .

आणखी वाचा

मित्र कसा असावा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area