Google ads

Ads Area

रामकृष्ण परमहंस जयंती ramkrushna paramhans jyanti mahiti

रामकृष्ण परमहंस जयंती  माहिती  ramkrushna paramhans jayanti mahiti 

रामकृष्ण परमहंस माहिती
रामकृष्ण परमहंस माहिती


रामकृष्ण परमहंस ( toc )

  रामकृष्ण परमहंस यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याची माहिती मिळवूया ! आपल्याला माहिती आहे की रामकृष्ण परमहंस म्हटले की स्वामी विवेकानंद यांचे गुरु एवढेच आपल्याला माहीत आहे. स्वामी विवेकानंद यांना त्यांनी दीक्षा दिली ज्ञान दिले मार्गदर्शन केले हे सगळे आपल्याला माहीत आहे, पण रामकृष्ण परमहंस यांचा इतिहास किंवा त्यांचे जे कार्य आहे ते मात्र आपण कधीच जाणून घेतले नाही. म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्याचा ज्ञानाचा आपण विचार करणार आहोत.


रामकृष्ण परमहंस यांचे बालपण ramkrushna yanche balpan

      रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव गदाधर चट्टोपाध्याय हे पश्चिम बंगालमधील कामारपुरकर या खेडेगावात त्यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1836 रोजी झाला. ते ब्राह्मण कुटुंबातील गरीब घराण्यात त्यांचा जन्म झाला होता.

 वडील - क्षुदीराम 

आई - चंद्रमणीदेवी. 

गदाधर हे त्यांचे चौथे अपत्य होते.

 परमहंस यांच्या जन्माची कथा gadadhar yanvhya jnmachi katha 

        त्याच्या जन्माची कथा अशी सांगितली जाते, त्यांचे वडील क्षुदीराम हे तीर्थयात्रा करण्यासाठी 'गया' या ठिकाणी गेले होते. गया या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना गदाधर विष्णूचे स्वप्नामध्ये दर्शन झाले होते आणि ते अत्यानंद होऊन घरी आल्यानंतर त्यानंतर पुत्र प्राप्त झाला त्या पुत्राचे नाव 'गदाधर' ठेवण्यात आले असे म्हटले जाते. रामकृष्ण परमहंस यांना लहानपणी 'गदा' या टोपण नावाने  बोलत होते.

परमहंस  यांची आवड gaddhar  yanchi aavad

गदाधार यांना लहानपणी मातीच्या चिखलापासून मुर्त्या बनवणे आवडत असे, म्हणजेच  त्यांचा या मूर्ती बनवण्यामध्ये हातखंडा होता .त्यांना शिक्षण घेण्यामध्ये अरुची जरी वाटत असली तरीसुद्धा त्यांना इतर ज्ञान घेण्यासाठी त्यांची जिज्ञासा वृत्ती भरपूर होती.त्यांच्या अंगी सेवावृती भाव भरपूर होती ते बंगाली भाषेत बोलत होते. त्यांना संस्कृत समजत होते पण संस्कृत लिहायला,वाचायला जमत नव्हते .ते स्वतः ब्राह्मण असून ब्राह्मणांनी ज्ञान द्यायचे असते ते पोट भरण्यासाठी केवळ नसावे म्हणून ते ब्राम्हणांचा उपहास करत होते म्हणजेच त्यांना संस्कृत समजत होते पण त्यांनी त्या संस्कृतचा उपयोग लोकांना पैसे देऊन ज्ञान देण्यासाठी केलेला नाही हे त्यांना मुळीच आवडत नव्हते.

 शिवाय त्यांना गायन, वादन, कथेचे निरुपण करण्यासाठी खूप आवडत होते त्यांना जे जे पुराणी आहेत त्यांच्याकडून कथा ऐकणे हे खूप आवडायचे .रामायण, महाभारत ,भागवत कथा त्यांच्याकडून ते ऐकत होते.

      त्यांच्या गावांमध्ये जे कोणी संन्यासी येत असतील त्यांची सेवा करून त्यांच्याकडून कथा ऐकत होते म्हणजेच त्यांना ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती, क्षमता प्रचंड होती हे आपल्याला दिसून येते.


अध्यात्म विषयावर आवड aadhyatmavishai aavad

       गदाधार हे लहान असतानाच त्यांना ब्रह्मज्ञानाचा अनुभव आला ते शेतात गेले असताना त्यांचे वय त्यावेळी पाच ते सात वर्षे असावे, वर आकाशाकडे पाहिले असता त्यांना काळे ढग आलेले दिसले त्याच्याभोवती पांढरे कडे असलेले दिसले त्यामुळे ते खूप मोहीत झाले आणि त्यांना ब्रह्मज्ञान झाले .अशा अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती असे वर्णन त्यांनी केलेले आहे. 

          तसेच एक वेळ महाशिवरात्रीला भगवान शंकराचे अभिनय करत असताना त्यांनाही असा ब्रह्मज्ञानाचा अनुभव आला. म्हणजे ते एकाग्र होत होते आणि त्यांची भावतन्मयता वाढत होती. अशा पद्धतीने त्यांना अध्यात्माचे ज्ञान हळूहळू वाढीस लागले होते.


घरची परिस्थिती gharachi  paristhiti 

        त्यांचे कुटुंब गरीब होते, घरात आर्थिक चणचण भासत होती, गदाधार लहान असतानाच त्यांचे वडील निर्वतले त्यांचा मोठा भाऊ रामकुमार यांच्यावर घर सांभाळण्याची जबाबदारी आली. त्याच्यामुळे घरात पैशाची अडचण निर्माण झाली वडील नसल्यामुळे त्यांचा वेळ आई जवळच जास्त जात असे. घरातील काम आणि देवाची पूजाअर्चा करण्यात त्यांचा दिवस जात असे पण घरामध्ये आर्थिक अडचण असल्यामुळे भाऊ रामकुमार हे कलकत्त्याला एका मंदिरात पुरोहिताचे काम करत होते. त्याच्यानंतर गदाधार त्यांचे सहकार्य म्हणून तेथे जाऊन राहिले.


    रामकृष्ण परमहंस  पुरोहिताचे काम ramkrushna yanchyakde purohitach 

         वडिलांच्या निधनानंतर भाऊ रामकुमार 1852 मध्ये दक्षिणेश्वर मंदिरात पुरोहिताचे काम करत होते. त्याचवेळेस त्यांचे सहकारी म्हणून हे गदाधार काम करत होते.

      1856 मध्ये रामकुमार यांचा मृत्यू झाला गदाधार त्या ठिकाणी पुजारी म्हणून काम करू लागले. त्यांना त्याच ठिकाणी वेगळी खोली देण्यात आली. त्यांचा बराच काळ मंदिरात जात होता. राणी रासमणी यांनी या दक्षिणेश्वर मंदिराची स्थापना केली होती. अस्पृश्य समाजातील धनिक जमीनदार यांची पत्नी होत्या. गदाधार यांचा कालीमातेच्या मंदिरात बराच वेळ जात असल्यामुळे किंवा त्यांची भक्ती भावनेत खूप आवड निर्माण झाल्यामुळे त्यांची भावतन्मयता वाढीस लागलेली पाहून राणी रासमणीचे जावई मथुराबाबू विश्वास यांनी 'रामकृष्ण' नाव ठेवले गेले. 

त्यांचे दुसरे गुरु तोतापुरी यांनीही ' रामकृष्ण ' असे नाव दिले आहे असेही म्हटले जाते.


 परमहंस कालीमातेचे भक्त  paramhans  kalimateche bhakt 

भावाच्या निधनानंतर ते त्याच ठिकाणी पुरोहिताचे काम करू लागले म्हणजे त्या मंदिरामध्ये पुजारी बनुन राहिले ते काली मातेच्या मंदिरात एवढा वेळ घालवत त्यांची साधना खूप वाढली होती.यांचा भाव वाढीस लागला होता, त्यांना आई विश्वजननी या भावाने देवीच्या दर्शनाची आस लागली. कालीमाता अन्नग्रहण करेन अशी त्यांची श्रद्धा होती, पण असे न झाल्यामुळे ते जोर-जोरात ओरडत होते. कधीतरी जंगलामध्ये फिरत असताना वस्त्रहीन अवस्थेमध्ये त्यांनी तपश्चर्या केली, साधना केली, लोक त्यांना वेडे म्हणत होते तर काही ईश्वराच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहेत असे म्हणत होते. 

     एक दिवस या कालिकामातेच्या मंदिरात देवीचे दर्शन झाले नाही तर मी प्राणत्याग  करेल असा त्यांचा अट्टाहास होता आणि त्याच वेळेस मंदिरात गाभारा उजळून निघाला. सगळीकडे उजेड वेगळाच निर्माण झाला त्यामुळे त्यांना अद्भूत दर्शन झाल्याने ते ज्ञानशून्य झाले असे म्हणू लागले आणि त्याच वेळेस त्यांनी आत्मसमर्पण कालिका मातेच्या ठिकाणी केले .म्हणजे सारे आयुष्य या कालीमातेच्या चरणी घालण्याचा त्यांचा निजध्यास होता.


 परमहंस  यांचा शारदादेवी यांच्याशी विवाह paramhans vivhah 

             कालिका मातेच्या मंदिरात त्यांना ब्रह्मज्ञानाची अनुभूती लाभल्यामुळे त्यांनी स्वतः आत्मसमर्पण करून घेतले. त्यांना भक्ती साधनेत वाहून घेण्यासाठी आता आनंद वाटू लागला. त्यामुळे  संसारात रमावे व वैवाहिक जीवन लाभावे या गोष्टीपासून दूर गेले होते .ते ध्यानावस्थेत राहत असे, लोक त्यांना वेडा म्हणू लागले यासाठी राणी रासमणी यांचे जावई मथुरबाबू यांनी त्यांचे ब्रह्मचर्य व्रत असल्याने त्यांना मानसिक रोग झाला आहे असं वाटत होते त्याच्यामुळे त्यांच्या गावात ही अशीच अफवा पसरली होती, म्हणून त्यांचे दुसरे भाऊ रामेश्वर व आई यांना वाटले की आपण याला संसारात रमवले तर या भक्तिमार्गातून तो वैवाहिक जीवनात अडकेल आणि त्याचे जीवन सुखकर होईल अशी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी त्याचा विवाह करावा असे ठरवले .गदाधर यांनीही विवाहास मान्यता दिली, त्यांनी विरोध केला नाही. 

        त्यांच्या गावाशेजारीच असणारे जयरामवाटी गाव होते .या गावातील रामचंद्र मुखोपाध्याय यांची मुलगी शारदा ही केवळ पाच वर्षाची असताना या मुलीशी गदाधर यांचा विवाह झाला. यावेळी गदाधर यांचे वय 23 वर्षाचे होते. त्यावेळी वयाचे काहीच बंधन नव्हते. त्यामुळे हे सगळं चालत होते त्यांनी विवाह केला असला तरी, वैवाहिक जीवन स्वीकारले नाही.

परमहंस यांची साधना paramhans yanchi  sadhana 


लग्नानंतर त्यांचे खरे जीवन सुखी व्हावे असे त्यांच्या घरातील लोकांना वाटत होते .परंतु तसे न करता त्यांनी अधिक साधनेमध्ये रममाण होण्यासाठी प्रयत्न करू लागले. आपले ज्ञान अजून वाढवावे यासाठी त्यांनी साधना करण्याचा प्रयत्न चालू केला.

          ते नेहमी ब्राह्मणविरोधी असल्याचा अनुभव देतात त्यांना जातिभेद नको होता म्हणून अस्पृश्य लोकांच्या हातून सुद्धा ते अन्नग्रहण करत होते .मंदिरात अस्पृश्य लोकांचे  सेवेकरी म्हणून नेमणूक करत होते. कधीकधी पैसे मातीच्या ढिगाऱ्याखाली सुद्धा पुरून ठेवत किंवा पाण्यात टाकून देत असे, लोक यांना त्यावेळी वेडे म्हणत होते त्यांची शरीररचना सुद्धा या साधनेसाठी साथ देत होती.

       त्यांचे शरीर एवढे संवेदनशील झाले होते की झोपेत त्यांना कोणी स्पर्श केला तरी सुद्धा त्यांचे शरीर आकुंचन पावत होते आणि त्यांना अत्यंत तीव्र संवेदना निर्माण होत होत्या याला कोणता उपाय करावा, काय करावे यासाठी अनेक प्रयत्न केले त्यांचा अध्यात्मिक भाव वाढत चाललेला होता डॉक्टरांना बोलल्यावर ते म्हणाले या अवस्थेला कोणत्याच औषधाचा गुण येणार नाही यांची जी वृत्ती झाली आहे ती अध्यात्मभावामुळे आहे.


 परमहंस तंत्रसाधनेत पारंगत paramhans tantrasadhanet  parangat 

         गदाधर यांची साधना वाढत गेल्यामुळे त्यांना अनेक त्रासातून जावं लागत होते म्हणून भैरवी ब्राह्मणे यांनी ही जी अवस्था आहे ती भावतन्मयता आहे भगवंताच्या दर्शनाची आस लागलेले आहे भगवंताच्या ज्ञानामध्ये तल्लीन होऊन गेलेले आहेत त्यामुळे ही अवस्था झाली आहे. हा त्यांचा वेडेपणा नसून अध्यात्मिक महाभाव त्याच्या अंगी निर्माण झाला आहे असे सांगितले. हे सांगत असताना त्यांनी राधा आणि कृष्ण हे जसे भावतन्मय झाले होते तसे हे सुद्धा भगवंताच्या तल्लीन होऊन गेलेले आहेत यासाठी त्यांनी उपाय तो सांगितला . तांत्रिक साधना सुरू करावी .

       तांत्रिक साधना त्यांनी चालू केल्या त्यावेळी त्यांच्या शारीरिक पीडा गेल्या ते शांत राहिले .त्यांनी अशा 64 साधना अभ्यासल्या, मंत्रसाधना  केली यामुळे त्यांचे चित्त शुद्ध झाले आणि आत्मनियंत्रण करायला शिकले. महत्त्वाचा जो मार्ग त्यांनी त्यांना सांगितला तो म्हणजे वामाचार ज्ञान मार्ग 


वामाचार ज्ञानमार्ग


हा ज्ञान मार्ग असा आहे की,मांस ,मत्स्यभक्षण मद्यपान,यौनाचार  हे या वामाचार ज्ञानामध्ये अंतर्भूत असतात स्वतः रामकृष्ण परमहंस हे सांगतात की त्यांनी हे शेवटचे जे दोन ज्ञान मार्ग आहे ते केले नाहीत पण मानस चिंतेतून त्यांनी वांच्छित फळ मिळवले होते. विवेकानंद यांची भेट झाली, त्यावेळेस वामाचार विषयी विचारले असता त्यांनी असे सांगितले की वामाचार ज्ञान मार्ग आहे पण ते इतरांना करू देत नव्हते. यांना म्हणत होते की हा मार्ग फार अवघड आहे, त्याच्यामध्ये जो पडला त्याचा तोल गेला म्हणजे त्याचे पतन झाल्याशिवाय राहत नाही म्हणून हा ज्ञानमार्ग जरी असला तरी ते इतरांना सांगत नव्हते.


वैष्णवीय भक्ती साधना

       या पंथात ईश्वराच्या प्रेमाविषयी पाच भावांचा उल्लेख केलेला आहे. शांत, दास्य ,सख्य, वात्सल्य ,मधुर यांचा अभ्यास केलेला आहे .त्यांच्या विवाहप्रसंगी कालीमातेचे दर्शन हे दास्यभावनेने केले. शिवाय त्यांनी स्वतः रामाची उपासना चालू केली. स्वतः हनुमान असे समजून हनुमानाप्रमाणे झाडावर राहणे, कंदमुळे खाणे याप्रमाणे राहत होते त्यांचा मणका यावेळी लवचीक झाला होता. त्याच्यामुळे ते झाडावर बसून राहत होते रामाची उपासना केल्यामुळे त्यांना सीता मातेचे दर्शन झाले होते नंतर त्यांनी कृष्णाची प्रेमिका राधिका समजून कृष्णाची उपासना केली आहे.


अद्वैत तत्वज्ञान  adauvt  tatttvadnyan 

            तोतापुरी यांच्याकडून वेदांत साधना शिकले . तोतापुरी हे फिरते म्हणजेच परिव्राजक ,फिरते वेदांतिक संन्यासी होते .त्यांच्याकडून 1864 मध्ये गदाधर यांनी संन्यास घेतला. हे तोतापुरी जटाधारी नागसंन्यासी होते. तोतापुरी ' नेती नेती ' या दृष्टिकोनातून तत्त्वज्ञान मांडत होते .त्यांना असं म्हणायचं होतं की ही सगळी माया आहे आहे  मोह आहे , मूर्तीपूजा करू नका म्हणजेच कर्मकांडाला थारा देऊ नका असे सांगत होते. 

         रामकृष्ण यांना संन्यास दीक्षा दिली त्यानंतर त्यांना अद्वैत तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले. तोतापुरी च्या मार्गदर्शनाखाली निर्विकल्प समाधी घेण्याचा आनंद गदाधर यांना आला. त्यासाठी तोतापुरी महाराज हे अकरा महिने परहंस यांच्या सान्निध्यात राहिले आणि त्यांना दीक्षा दिली आहे.


सर्वधर्म सहिष्णुता

मुस्लीम धर्म

        गदाधर हिंदू धर्माविषयी तत्त्वज्ञान मांडत असले तरी त्यांना इतर धर्माविषयी प्रेम होते .1866 मध्ये गोविंदराव या सुफी मनाच्या हिंदू गुरूने इस्लामचा परिचय घडवून  दिला .गदाधर अल्लाच्या नावाचा जप करू लागले, मुस्लिमयांची वस्त्रे परिधान करू लागले, दिवसातून पाच वेळा प्रार्थना करू लागले, एवढे मुस्लिम धर्माविषयी आकर्षित झाले की हिंदुधर्माच्या प्रतिमा सुद्धा पाहत नव्हते हिंदू धर्माप्रमाणे विचार करणे सोडून दिले होते. तीन दिवसात त्यांना दर्शन झाले की भारदस्त मेहेरनजर असलेले व पांढरी दाढी असलेले प्रेषितसारखे तेजस्वी व्यक्तिमत्व त्यांच्या शरीरात मिसळून गेले. 

 ख्रिश्चन धर्म

          ख्रिश्चन धर्मविषयी त्यांना आवड निर्माण झाली होती .त्यांच्या प्रथा पाळणे त्यांनी सुरू केले ,शंभूचरण माल्लिक त्यांचा भक्त बायबल वाचून दाखवत .यावेळी सुद्धा ते हिंदू धर्म देवांच्या प्रतिमा हे विसरुन गेले होते.

        त्यांच्या म्हणण्यानुसार ईश्वराचे दर्शन होऊ शकते पण सर्वधर्मसमान  हा त्यांच्या जीवनाचा महान उद्देश होता. म्हणजेच कोणत्याही धर्मात गेले तरी भावतन्मयता गुण असेल तर  आपल्यामध्ये कोणत्याही धर्मातील देवतेची पूजा केली तरी सुद्धा भावतन्मयता येऊ शकते हा महत्त्वाचा गुण त्यांच्याकडे असलेला दिसून येतो.


 परमहंस यांची शिष्यमंडळी

 शिष्य परिवारामध्ये स्वामी विवेकानंद हे अग्रगण्य होते.

 राखाल

 नित्यगोपाल दुर्गाचरण

भावनाथ 

भूपती

 असे त्यांचे शिष्य होते तर विवेकानंद यांनी " रामकृष्ण मिशनची "  स्थापना केली. विवेकानंद हे एकमेव असे महान तत्वज्ञानी त्यांचे शिष्य बनले. 


गुरू-शिष्याची भेट  guru  shishyanchi  bhet 

      विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांची भेट अशी झाली.  रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्राला भेटले आहेत

    1881 मध्ये एक असा प्रसंग होता की कलकत्त्यातील शिमला नावाच्या  मोहल्ल्यात सुरेंद्रनाथ त्यांचा जो मित्र होता त्या सुरेंद्रनाथ मित्राच्या घरी परमहंस यांना घरी आमंत्रण दिले होते .या आमंत्रणसाठी त्यांनी खूप मोठा उत्सव साजरा केला होता .या उत्सवात गायनाचा कार्यक्रम होणार होता. ऐन वेळी गायक आला नाही म्हणून त्यांच्या शेजारी असणारे नरेंद्र यांना बोलावले. गायन नरेंद्रनाथांनी चांगले केले यामुळे परमहंस संतुष्ट झाले. परमहंस आणि विवेकानंद यांची भेट पहिलीच होती परमहंस यांनी दक्षिणेश्वर येते येण्यास आमंत्रण दिले. नरेंद्रनाथ हे सुद्धा त्यांचा महिमा पाहून आकर्षित झाले. परमहंस यांनी नरेंद्रच्या अंगी असलेले गुण ओळखले होते .


           रामकृष्ण परमहंस हे शिक्षित नसले तरी लोकांची सेवा करणे त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेणे हे काम ते आवर्जून करत होते. त्यांच्या गावात मोठे विद्वज्जन ज्ञानी पंडित संन्याशी येत असत त्यावेळी ते त्यांची मनापासून सेवा करत होते आणि त्यांच्या कडून ज्ञान प्राप्त करून घेत होते त्यांनी जी कथा सांगितली ते त्यांचा प्रभाव यांच्यावर पडलेला दिसून येतो आणि त्यांचा प्रभाव आजही आपल्याला दिसून येतो म्हणजेच इंग्रज शिक्षणावर आणि बुद्धिजीवी वर्गावर यांचा प्रभाव असलेला दिसून येतो .त्यांच्या कार्याचा अभ्यास केला तर त्यांची भावतन्मयता हा गुण कसा आहे याची प्रचिती येऊ शकेल म्हणून त्यांची भावोत्कटता हा गुण आपल्याला ही कोणत्याही क्षेत्रांत उपयोगी पडू शकतो .

            

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area