Google ads

Ads Area

होळी आणि धुलीवंदन याची माहिती | holi information in marathi

होळी आणि धुलीवंदन याची माहिती | holi information in marathi

होळी धुलिवंदन सणाची माहिती
होळी धुलिवंदन सणाची माहिती

होळी आणि धुलिवंदन हे आपल्याला अधिकाधिक आनंद देणारे सण आहेत .होळीचा सण हा पाच दिवस चालत असतो त्यासाठी अगोदरच त्याची तयारी चालू असते पण काही दोनच दिवस मानत असतात ,तर काही पूर्ण पाच दिवस याची मजा घेत असतात .होळीच्या  सणानिमित्त सगळ्यांना वर्षाचा शेवटचा सण म्हणून हौस असते तर काहींना यानंतर नवीन वर्ष चालू होणार यासाठी नवा उत्साह असलेला दिसतो .यासाठी लहानापासून मोठ्यांपर्यंत या सणाची लगबग चालू असते .

होळी (toc)


होळीविषयी असणारी मतमतांतरे


होळी हा जो सण आहे तो फाल्गुन महिन्यातील वद्य पौर्णिमेला येत असतो या सणाविषयी अनेक आख्यायिका आहेत प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्या मनातील श्रद्धा ठेवून आपला सण साजरे करत असतात .कोणीही कोणतीही श्रद्धा ठेवत असले तरी होळी साजरी करायची पद्धत वेगळी नसते कारण होळी तर पेटवतच असतात मग त्यात काय दहन करायचे कोणती श्रध्दा ठेवून करायचे हे त्या त्या प्रदेशात ठरलेले असते .

होळीची आख्यायिका 

1)  भक्त प्रल्हाद याला अग्नीत टाकून संपवून टाकायचे असते त्यासाठी हिरण्यकश्यपू याची बहीण हुंठा हिला वर मिळालेला असतो की अग्निपासून संरक्षण होईल पण प्रल्हादाला घेऊन बसल्यावर हुंठा त्या अग्नीत भष्म झाली .महाबजेच याचा अर्थ असा की वाईट गोष्टी जळल्या तरचांगल्या गोष्टी शिल्लक राहिल्या .

     यातून असा निष्कर्ष निघतो की वाईटगोष्टी आहेत त्या सगळ्या होळीमध्ये दहन करायच्या तर काही ,आपल्यातील सुद्धा जे जे वाईट आहे त्या सुद्धा आपण त्यात टाकल्या पाहिजेत म्हणजेच या सणातून आपल्यातील जे वाईट कृत्य आहे ,विचार आहेत ते सगळे होळीमध्ये टाकून दिले पाहिजे .

2 ) दुसरी आख्यायिका अशी सांगता येईल की पुतना ही राक्षसीन हिने श्रीकृष्णाला संपवण्यासाठी आले होते पण श्रीकृष्णाने तिच्या दुधातून पंचतत्वे प्राशन करून तिला संपवले ते श्रीकृष्णाला मारण्यासाठी स्वतःच्या स्थान विष मध्ये विष घेऊन आलो ते पण श्रीकृष्णाने त्या पूर्ण पूतना राक्षस चॅनलला संपवून टाकले या होळीच्या दिवशी त्याला अग्नि दहा दिले असे आख्यायिका आहे

3)  तिसरी आख्यायिका अशी आहे की दक्षिण भारतात शंकराचे पार्वतीकडे ध्यान जावे म्हणून देवांनी कामदेवाला प्रवृत्त केले कामदेवांनी देवांच्या आज्ञेनुसार भगवान शंकराला पार्वतीचे स्मरण करून दिले त्यामुळे भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून कामदेवाला व मदनाला भस्म केले. कामदेवाची आठवण म्हणून या दिवशी कामदेवाचा पुतळा तयार करून तो जाळला जात .यातून एकच आपल्या लक्षात येते की हे सगळे उन्हाळ्याचे दिवस असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात आग लागण्याची शक्यता असते तो अग्नी शांत करण्यासाठी या दिवशी होळी पेटवली जाते . म्हणून या दिवसाला महत्त्व आहे म्हणून हा दिवस दक्षिण भारतात या पद्धतीने साजरा केला जातो होळी पेटवली जाते.

4)  आदिवासी भागात पावरा समाजात होळीला होलिका, कुली ,कुली असे म्हटले जाते पावरा समाजात होळी हा सण फाल्गुन महिन्यात शेतीचा हंगाम संपत आलेला असतो आणि नवा उत्साह घेऊन येत असतो त्यामुळे हा सण त्यांच्या साठी अधिक आनंद द्यायला येत असतो. नविन उत्साहाने आपण साजरा करतोय याचा आनंद त्यांना वाटत असतो.

अशा पद्धतीने अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे होळीचा सण श्रद्धेने साजरा केला जातो आपल्या महाराष्ट्रात हे सार्वजनिक ठिकाणी मंदिराच्या समोर होळी पेटवली जाते तर प्रत्येक घरापुढे छोटी होळी केली जाते. या होळीमध्ये आपल्या मनात  वाईट प्रवृत्ती ज्या असतील त्या सगळ्या अग्नीमध्ये दहन करून आपल्या कुटुंबाचासोबत आनंद साजरा करत असताना अत्यानंद होत असतो.

 या दिवशी   एक आठवडा अगोदरच तयारी होत असते सगळी मुले छोटी - छोटी मुलं आपले आठ दहा दिवस होळीची तयारी करत असतात रंग जरी नाही मिळाला तरी लहान लहान मुले एकमेकाला पाण्याने भिजवून काढतात तर काही फुगे बांधून ते एकमेकांच्या अंगावर फोडण्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणून लहान मुलाला म्हटले की त्यांना रंग लावण्यापेक्षा फुगे तयार करून ते एकमेकांना मारायचे हाच त्यांचा आनंद असतो. हातात कलर घेऊन तो दुसऱ्याला लावावा अशी त्यांची जास्त इच्छा नसते पण एकमेकांना पाण्याने रंगाने भिजवून काढणे का त्यांना आनंद असतो.

 होळी या सणाची सुरुवात होत असताना घरासमोर किंवा गल्लीत ,चौकात मंदिरासमोर होळी करायची ती जागा स्वच्छ केली जाते आणि त्या जागेवर शेणाने सारवून त्या ठिकाणी गौऱ्या, ऊस उभा केला जातो तर काही भागांमध्ये मोठमोठी झाडे उभी करून होळी पेटवली जाते .यासाठी  गावातील सर्व लोक आपापल्या परीने होळीसाठी लाकडे आणून देत असतात स्वतःच्याही घरी अशी होळी छोटीशी बनवले जाते या होळीला ' बोंब' ही मारली जाते अशी ही प्रथा आहे, फक्त होळी या दिवशीच लहान मुलं किंवा मोठी माणसे सुद्धा मोठ्याने बोंबलत असतात जर कधी मध्ये जर लहान मुलगा बोंबलला तर त्याला असं म्हणतात की शिमग्याला चुकला होता काय ? म्हणजेच वर्षात एकदाच बोंब मारायची असते अशी प्रथा आहे इतर वेळी कोणीही अशी बोंब मारत नाही मारली तर ते अशुभ मानली जाते बोंब मारणे म्हणजे काहीतरी विपरीत घडले, वाईट घडतय अशा समजुत असते त्यामुळे इतर वेळी जे बोंबलतात त्याला अनेकांचे बोलणं खावे लागते. या होळीमध्ये आपले दुष्कृत्य ग्रहण केल्याने आपणाला नवचेतना मिळत असते आणि आपण ताजेतवाने मनाने जीवन जगायला तयार होत असतो.

 या अग्नीत पुरणपोळीचा नैवेद्य होळीमध्ये टाकला जातो , नारळ त्याच्यामध्ये टाकून तो भाजून प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटला जातो .या होळीच्या  दुसऱ्या दिवशी पाणी टाकून त्यातील राख अंगाला किंवा कपाळावर लावतात . प्रत्येकाची जशी  श्रध्दा असेल तशा पद्धतीचे ही होळी साजरी केली जाते.सुख, समृद्धी, शांती मिळावी हीच अपेक्षा असते म्हणून या होळीच्या दिवशी आपले दुष्कृत्य इच्छा-आकांक्षा या सगळ्या अग्नीमध्ये दहन केल्याचा आनंद साजरा करून आपले सगळे विकार संपले आहेत असा विश्वास येऊन नवीन काहीतरी करण्याची उर्मी येत असते .

धुलिवंदन सणाची माहिती

धुलिवंदन माहिती (toc )

धुलीवंदन हा सण होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो याची अशी प्रथा समजली जाते की होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या होळीतील निखारे आहेत त्यावर पाणी शिंपडून ते अंगाला, कपाळाला लावतात. अंगाला लावून स्नान करावे असा नियम होता.

 आजकाल मात्र हे मागे पडत असून अनेक प्रकारचे रंग एकत्र करून ते लोकांना लावण्याची प्रथा आहे, त्यातून लोक एकमेकांना आनंदाने रंग लावतात आणि पुन्हा स्नान करून स्वच्छ, निर्मळ होतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ही धुळवड साजरी केली जात,  म्हणजेच एकमेकांना रंग लावायचं काम करतात.

त्या निमित्ताने सगळे लोक एकत्र येतात होळीचा पाच दिवसाचा सण असून या सणात अनेकांनी ने त्या माध्यमातून एकत्र येण्याची संधी मिळत असते

या सणात अनेक ठिकाणी डी.जेच्या संगीत गाण्यावर डान्स करून ही धुलीवंदन साजरी केली जाते. एकामेकावर पाणी शिंपडणे पाण्याने भिजवणे अनेक ठिकाणी मोठमोठे  बँलर उभे करुन उभे करून त्यात वेगवेगळ्या प्रकारचे रंग टाकले जातात. आणि काहींना त्या बॅलरमध्येच बडवून काढतात तर काही ठिकाणी फक्त कोरडी धुळवड साजरी केली जाते म्हणून पाण्याचा अपव्यय ही टळत असतो अशी एक नैसर्गिक भावना या पाठीमागे असते तर काही ठिकाणी पाणी भरपूर प्रमाणात असेल तर त्या पाण्याचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. धुळवड हा  सण वर्षातून एकदा येत असल्याने सगळीकडे अशी प्रथा आहे की या दिवशी जे मांसाहार करतात ते सगळे बोकडाचे, बकऱ्याचे किंवा कोंबड्याचे मटण घरी आणत असतात त्याचबरोबर दारू पिणे ही एक प्रथा होऊन गेली आहे फक्त याच दिवशी घरातील लोकांनी दारू पिली तरी त्यांना या दिवशी कोणी काही बोलत नाहीत. काही जण तर घरातील लोकांना उत्सुकतेने किंवा जबरदस्तीने एक तरी घोट द्यायला लावत असतात तर म्हणजेच या दिवशी दारू आणि मटण या दोन गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात ग्रामीण भागात धुळवड म्हणजेच रंगपंचमी खेळली जात नसून त्यादिवशी प्रत्येकाच्या घरात जे मांसाहार करतात त्यांच्या घरात मटणाचा बेत आणि त्याबरोबर दारू पिणे ही प्रथा असल्याने या दिवसाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area