सावित्रीबाई फुले मराठीत माहिती | savitribai phule marathit information
सावित्रीबाई फुले माहिती |
सावित्रीबाई फुले मराठीत माहिती ( toc)
सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेऊ शिक्ष णाचा पाया रचणाऱ्या ह्या महान व्यक्तिमत्व असणाऱ्या भारतातील महान पहिली स्त्री शिक्षिका म्हणून या कार्यास विनम्र अभिवादन !
सावित्रीबाई फुले या भारतासाठी पहिली स्त्री शिक्षिका आणि हे समाजसुधारक म्हणून लाभल्या म्हणूनच आजची स्त्री शिक्षित झाले आहे आणि याचा फायदा आजच्या स्त्रियांना होत आहे . त्यांनी खूप हालअपेष्टा सहन करून या स्त्रियांना शिक्षित करण्यासाठी आपले जीवन खर्च केले. भारतातील स्त्रीवादी चळवळीच्या प्रणेत्या मानल्या जातात सावित्रीबाई फुले यांचे पती महात्मा फुले यांनी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली.
सावित्रीबाई फुले यांचे जीवन
सावित्रीबाई फुले या 9 वर्षाच्या असताना त्यांचे लग्न महात्मा फुले यांच्याशी झाले त्यावेळी महात्मा फुले यांचे वय 12 वर्षांचे होते .त्यावेळेस त्यांचे लग्न झालेले होते त्यावेळी त्या शिकलेल्या नव्हत्या. सगळीकडे पुरुषप्रधान संस्कृती बघायला मिळत होती. यामुळे स्त्रियांना शिकवणे खूप अवघड होते. तरीही समाजाचा विरोध पत्करून महात्मा फुले यांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवले. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना समाजाकडून विरोध होत असतानाच स्वतःच्या घरातून सुद्धा त्यांना विरोध होत होता .त्यांच्या घरात परंपरा ,चालीरीती ज्या चालल्या होत्या त्या पाळण्यात त्यांच्या घरातीळ लोक आनंदात होते.
तरीही सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करायचे होते ,हा त्यांचा मानस होता .त्यासाठी त्यांना घरातून बाहेर काढले तरीही त्या यांनी गोष्टीची फिकीर केली नाही .शिक्षणाची आवड घरात आणि समाजात नसताना त्यांची अवहेलना होऊनही सावित्रीबाई यांनी आपले शिक्षण सोडले नाही. आपण समाजातील मुलींना शिकवले पाहिजे यासाठी त्यांचा अट्टाहास होता. एक तर स्वतःला शिकतानाच एवढा विरोध पत्करावा लागला तर दुसऱ्या मुलींना शिकवणे किती अवघड काम होते हे त्यांनी पूर्ण केले.
पुण्यातील भिडे वाडा या ठिकाणी 1848 रोजी पहिली मुलींची शाळा त्यांनी उभी केली समाजात कितीही विरोध असला तरी त्यांनी आपले कार्य जोमाने चालू ठेवले आपल्या घरापासून दूर अंतरावर असणाऱ्या शाळेत जाण्यासाठी लोकांचे शेण, माती, चिखल अशा गोष्टी त्यांनी झेलल्या . तरीही त्या आपल्या कर्तव्यायापासून कसल्याच डगमगल्या नाहीत. जे जे समोर आले त्या प्रसंगाला सामोरे गेल्या . पहिल्यांदा भिडे वाडा या ठिकाणी शाळा सुरू झाल्यानंतर पतीच्या मदतीने कोणाचे आर्थिक साहाय्य नसताना त्यांनी 1 जानेवारी 1848 ते 1852 पर्यंत मुलींच्या शिक्षणाकरता एकूण 18 शाळा स्थापन केल्या.
1849 रोजी पुणे येथील दुश्मनसे या मुस्लीम बांधवांच्या घरी मुस्लीम महिलांना आणि तेथील लहान मुलींना शिक्षण देण्यासाठी त्यांच्या वाड्यातच शाळा सुरू केली.
या कार्यास पाहून 16 नोव्हेंम्बर 1918 या दिवशी इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांचा चांगल्या प्रकारे सन्मान केला.
सावित्रीबाई फुले यांचे कार्य
सावित्रीबाई फुले आपल्या भारत देशातील प्रत्येक लोकांचे जीवनात बदललं पाहिजे यासाठी ते कष्ट करत होत्या . विधवा स्त्री यांची परिस्थिती बदलली पाहिजे, स्त्रीभ्रूण हत्या थांबली पाहिजे. तसेच बालकांच्या हत्या होतात म्हणून त्यांनी अशा हत्या थांबल्या पाहिजेत यासाठी त्यांनी आश्रम काढले .
दत्तक मुलगा यशवंत
सावित्रीबाई ह्या केवळ शिक्षिका म्हणून काम करत नव्हत्या तर त्यांनी समाजात ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला .अनिष्ट प्रथा बंद केल्या .
पतीच्या निधनानंतर काशीबाई नावाच्या गरोदर विधवा स्त्रीला आत्महत्या करण्यापासून थांबवून त्या महिलेला स्वतःच्या घरी आसरा दिला.त्या महिलेला जो मुलगा झाला तो यशवंत ह्यांनी दत्तक घेतला .तोच मुलगा शिकून डॉक्टर बनला .
अस्पृश्य समजल्या जाणाऱ्यांना आपलेसे केले सावित्रीबाई यांनी पतीच्या सोबतीने अनेक अनिष्ट प्रथा बंद केल्या असल्या तरी चांगली विधायक कामे केली आहेत .
1 ) बालहत्या प्रतिबंधक कायदा करण्यात आला
2) अनाथाश्रम उभे केले
3) विधवा स्त्रियांना आश्रय दिला
4) सत्यशोधक समाजाची स्थापना करुन त्याच्या प्रमुख म्हणून काम पाहिले
5) महात्मा फुले यांच्या कार्याला मोलाची साथ दिली
6) शूद्र समजल्या जाणाऱ्या लोकांना शोषणापासून मुक्तता करण्याचा प्रयत्न केला
तसेच समाजात वाईट प्रथा होत्या म्हणजेच सतीप्रथा,बालहत्या प्रतिबंध झाली पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.
सावित्रीबाई फुले यांचा शेवट
सावित्रीबाई यांनी मुलींना शिकविण्याचा जो ध्यास घेतला होता तो त्यांनी पूर्ण केला .समाजाला सुधारविण्यासाठी त्यांना होणारा त्रास त्यांनी सहजतेने स्वीकारला .आपले जीवन दुसऱ्यासाठी घालविले .
अशाच वेळी प्लेगची साथ आली होती पण त्यांनी आपली पर्वा न करता रुग्णांची सेवा करण्याची तयारी दाखविली .एका रुग्णाची सेवा करत असतानाच त्यांनाही याची बाधा होऊन 10 मार्च 1897 रोजी यांचे निधन झाले .
खालील माहिती वाचा
💐अपंग असूनही माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी एकमेव स्त्री
💐महिला दिनानिमित्त महिलांना आज समाजातील स्थान जाणून घ्या .
💐इंग्रजांविरुद्ध हातात तलवार घेऊन खंबीरपणे तोंड देणारी राणी लक्ष्मीबाई