Google ads

Ads Area

विज्ञान दिनाची माहिती व व्यंकट रमण यांचे कार्य vidnyan dinachi mahiti

  विज्ञान दिनाची माहिती| vidnyan din informatoin in marathi
व्यंकट रमण माहिती | vyankt raman mahiti

विज्ञान दिनाची माहिती
विज्ञान दिनाची माहिती


विज्ञान दिन माहिती ( toc )

आजचे युग हे विज्ञानाचे युग समजले जाते. विज्ञानाच्या युगात अनेक लहान मोठे बदल जे झाले ते विज्ञानाचे चमत्कार असे म्हणावे लागेल. सुरुवातीला सजीव सृष्टी निर्माण झाल्यापासून ते आत्तापर्यंत जे काही बदल झाले, जे काही आपल्याला नवनवीन दिसते ते सगळे विज्ञानाचे चमत्कार आहेत.  विज्ञान नसते तर या सगळ्या गोष्टी आपणास कधीच दिसल्या नसत्या. विज्ञान आहे म्हणून माणसाचे जीवन सुखकारक सोयीसुविधांनी आरामदायी झाले आहे. जग आपल्या जवळच आहे असं म्हणणे आपल्याला वावगे ठरणार नाही. जगात कुठे काय चाललेले आहे याचा आपल्याला घरात बसून सविस्तर आढावा मिळू शकतो .ज्ञानेश्वर महाराजांनी हेच म्हटलेलं होतं " हे विश्वची माझे घर " जरी याचा अर्थ काय काढला तरी आपले हे जगच म्हणजे आपलं घर होऊन बसलेले आहे म्हणजे जगातील प्रत्येक गोष्ट आपल्याला घरबसल्या सहजतेने मिळू शकते अशा या विज्ञानाची माहिती आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे.


 विज्ञान दिन का साजरा केला जातो |vidnyan din ka sajara kela jato


भारताचे महान विख्यात शास्त्रज्ञ डॉ.वसंतराव गोवारीकर हे " भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान "याचे ते सचिव होते .त्यांनी देशामध्ये विज्ञानाविषयी अनेक योजना आखल्या होत्या आणि त्यांनी यशस्वीही केल्या. आपल्या भारत देशामध्ये विज्ञानाचे वातावरण निर्माण करावे विज्ञान विज्ञानाविषयी  आवड निर्माण करावी ,यासाठी त्यांना विज्ञान या क्षेत्रामध्ये कार्य करण्याची आवड असूनही त्यांना विज्ञान दिन साजरा करावा असा मानस होता. यासाठी भारतात विज्ञान या क्षेत्रातील भौतिकशास्त्र विषयात जागतिक लेव्हलचा नोबेल पुरस्कार ज्यांना मिळाला आहे त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन किंवा त्यांच्या सन्मानार्थ हा विज्ञान दिन साजरा करावा अशी त्यांची इच्छा होती . 

     चंद्रशेखर वेंकट रमण हे भौतिकशास्त्र या विषयात नोबेल पारितोषिक विजेते होते. विज्ञानात एकमेव अशी व्यक्ती असल्याने त्यांच्या सन्मानार्थ विज्ञान दिन साजरा करावा असे ठरले. मग हा दिवस कोणता ठरवावा हे नक्की नव्हते. त्यांचा जन्म किंवा त्यांचा मृत्यू ही नाही तर त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी नेचर मासिकात "संशोधन लेख" ज्या दिवशी पाठवला तो दिवस म्हणजे विज्ञान दिवस करण्याचे ठरवले. 1930 रोजी त्यांना जरी नोबेल पुरस्कार भेटला असला तरी तो दिवस न ठरवता त्यांनी ज्या दिवशी नेचर मासिकांमध्ये " रामन इफेक्ट" या नावाने पाठविला तो दिवस हा विज्ञान दिन साजरा केला जातो.

 डॉक्टर सी व्ही रामन यांचे कार्य c v raman yanche karya

    यांना विज्ञान या विषयांमध्ये अधिक रुची होती.भौतिकशास्त्र विषयात ते कलकत्ता विद्यापीठात प्राध्यापक1917 ते 1933 पर्यंत त्यांनी प्राध्यापक म्हणून कार्य केले. 1947 रोजी बंगलोर या ठिकाणी रामन संस्थेचे संचालक झाले. त्यांनी अनेक संस्था आणि विद्यापीठ  उभारण्यासाठी आपले मोलाचे कार्य दिले आहे. त्यांचे हे सहकार्य पाहून भारत देशाने त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे . 

रामन इफेक्ट म्हणजे काय raman effect mhanje kay

म्हणजेच रामन परिणामाचा शोध हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे जेणेकरून त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि त्याच दिवसाचे महत्त्व म्हणून विज्ञान दिन साजरा केला जातो. हे " रामन परिणामाचा शोध " हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. प्रकाश किरण हे धुळकण नसलेला पारदर्शक म्हणजेच आरपार रासायनिक प्रक्रियेतून म्हणजेच त्याच्या सहयोगातून जात असतो त्यावेळी त्यामध्ये असणाऱ्या प्रकाशाचा थोडा का होईना अंश ही येणारी जी किरणे आहेत त्या किरणाच्या विरुद्ध दिशेला तयार होत असतात, तर काही प्रकाशकिरण हे सोडण्यात आलेली जी किरणे आहेत त्या प्रकाशाच्या किरणांहून वेगळ्या प्रकारे तरंगापेक्षा वेगळे असतात.  याचाच अर्थ लाईट जेव्हा वेगवेगळ्या माध्यमातून भ्रमण करत असते तेव्हा तिचा वेग आणि गुणांमध्ये बदल जाणवू लागतो .ही गोष्ट आपल्यासमोर म्हणजेच विज्ञानामध्ये खूप महत्त्वाची असलेली दिसते . असा  हा ' रामन परिणामाचा 'शोध  आहे म्हणजेच प्रकाशाचे वक्रीकरण याचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे. म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना 1954 मध्ये "भारतरत्न पुरस्कार" त्यांना बहाल करण्यात आला.


विज्ञान दिन साजरा करण्याचा उद्देश vudnyan din sajra karnyacha uddesh


       विज्ञान म्हणलं की सगळ्यांना अवघड विषय वाटतो ,पण आज जे शास्त्रज्ञ मोठमोठे शोध लावतात भूगर्भापासून ते अंतराळात जाण्यापर्यंत आणि अनेक मोठे शोध लावलेले आहेत. शास्त्रज्ञ यांनी कोणकोणते शोध लावले त्यांच्या कार्याचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे. विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण होणे लोकांना विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली पाहिजे. त्यांच्यामध्ये विज्ञान या विषयात रुची निर्माण करणे आणि नवीन नवीन शोध घेणे त्यांच्याविषयी लोकांना जागरूकता निर्माण करणे हा उद्देश त्याच्यामागे असणे गरजेचे आहे. विज्ञान दिवस म्हटलं की फक्त विज्ञान क्षेत्रातील लोकांनी यामध्ये सामील व्हावं असं नाही, कारण आपण बघतो की आपण साधा पेन घ्या त्यामधे सुद्धा विज्ञानामुळे प्रगती झालेली आहे. पहिले बोरू आणि टाक या माध्यमातून लिहिले जात होते .आज नवनवीन पेन आले नवीन कंपन्या तयार झाल्या हे विज्ञानाच्या आधारावर झाले. विज्ञान म्हणजे आपल्या भौतिक जीवनामध्ये जे काही बदल झाले ते सगळे विज्ञानाच्या आधारावर झालेले आहेत. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपले जीवन आरामदायी जीवन जगत आहोत हे महत्त्वाचे आहे. म्हणून विज्ञान साजरा करणे हे  कारण असल्याचेसांगता येते.


विज्ञान दिनाची थीम 

          प्रत्येक वर्षी विज्ञान दिन साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक  प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या संकल्पनेतून हा विज्ञान दिन साजरा केला जातो या 2022 च्या संकल्पनेत केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी या थीममध्ये जो विचार मांडला तो महत्त्वाचा आहे . "शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टिकोन" म्हणून हा दिवस साजरा करण्यात येणार आहे म्हणजेच जे शाश्वत असे भविष्य  टिकणार जे भविष्य आहे ते विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याकडे  जो आपला बघण्याचा दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे आणि हा बदल आपल्याला आवश्यक आहे. आपला भविष्यातील जो विज्ञानाविषयी दृष्टिकोण आहेत तो महत्त्वाचा आहे तो आपला शाश्वत असला पाहिजे .असा त्यांचा उद्देश असलेला दिसून येतो किंवा थीम ची संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे.


डॉ .सी. वी .रमण यांचे जीवन | c v raman yanche jivan 

  चंद्रशेखर वेंकट रामन यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1988 रोजी तामिळनाडू येथील तिरुचिरापल्ली येते तमीळ  कुटुंबामध्ये झाला .त्यांचे शिक्षण मद्रास म्हणजेच आत्ताचे चेन्नई या ठिकाणी झाला त्यांचे जीवन अतिशय उच्चशिक्षित अशा घराण्यात त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील प्राध्यापक होते. इंग्रजी शिकवणी हे त्यांच्या वडिलांकडून घेत होते .त्यांचे  घरउच्चशिक्षित असल्यामुळे त्यांचे जीवन अधिक सुखावह होते. लहानपणापासून  हे चतुर बुद्धिमत्तेचे हुशार होते. बी.ए  1905 मध्ये त्यांनी पूर्ण केले आणि ते सुवर्णपदक मिळवून त्यांनी पदवी मिळवली आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर "इंडियन फायनान्स सर्विस" मध्ये त्यांनी सी. ए.म्हणजेच अकाउंटटचे काम केले.

      त्यांना पहिल्यापासूनच विज्ञानाची आवड होती. त्यांचा संबंध  "इंडियन असोसिएशन फॉर दि अप्पलान्ससेस ऑफ  सायन्स" या संशोधन क्षेत्राशी आला हा संबंध दृढ करत त्यांनी स्वतःचे खाजगी शोध लावण्याची व्यंकट रमण यांना परवानगी मिळाली . आणि त्यातूनच  पुढे शास्त्रज्ञ बनण्याची यशस्वी वाटचाल झाली.  

     ती सत्यात उतरायला सुरुवात झाली. आणि त्यांनी ते जगासमोरही दाखवली आहे . रमण इफेक्ट म्हणजेच रमण परिणाम ,प्रभाव हा प्रयोग या होय. प्रयोगांमध्ये असे म्हटले आहे की 'प्रकाशाचे विकिरण' करणे हे या संशोधनाचे महत्त्वाचे माध्यम समजले जाते म्हणजेच  वीज जेव्हा वेगवेगळ्या माध्यमातून जात असते तेव्हा त्याचा जो वेग असतो त्या विभागाच्या गुणांमध्ये बदलू जाणवू लागतो. त्यांचे कार्य चांगले असल्याने त्यांची शास्त्रज्ञ म्हणून ख्याती जगासमोर आहे .

     1928 रोजी रमण इफेक्ट हा प्रभाव सगळ्या जगाला दाखवला त्यामुळे भारताची आणि स्वतःची प्रसिद्धी हा एक इतिहासामध्ये महत्त्वाचा दिवस म्हणून मानला जातो. त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळेच त्यांना नोबेल पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार,  शिवाय लेनीन शांतता पुरस्कारा प्राप्त केले आहे.

  महान शास्त्रज्ञाचा शेवट 

      त्यांचा मृत्यू 21 नोव्हेंबर 1970 रोजी त्यांना प्रयोगशाळेत अनेक वेळा आणि दिवस प्रयोगशाळेतच घालावे लागत होते. आणि या प्रयोगशाळेत वेळ घालवत असतानाच  त्यांना हृदयविकाराचा धक्का  बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. इन्स्टिट्यूट मध्ये ते प्रयोगशाळेत काम करत असतानाच त्यांचा वयाच्या 80 व्या वर्षी मृत्यू झाला. अशा या महान शास्त्रज्ञास विनम्र अभिवादन .

     त्यांच्या या कार्याचा आढावा घेत असता असा महान शास्त्रज्ञ भारतीय भौतिकशास्त्र या विषयातील एकमेव नोबेल पुरस्कार प्राप्त व्यक्ती त्यांनी आपल्या संशोधनाच्या आधारे भारताचे आणि शास्त्रामध्ये आपले नाव रोशन केले आहे. या महान कार्य करणाऱ्या सी वी रमन यांच्या कर्तुत्वाने त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर भारताने सुद्धा भारतरत्न पुरस्कार दिला आणि लेलीन शांतता पुरस्कारही त्यांना देण्यात आलेला आहे. 

          रमण इफेक्ट हा जो लेख आहे या संशोधन निबंधावर त्यांची ख्याती पसरली तो दिवस म्हणजेच  विज्ञान दिवस म्हणून डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी त्यांच्या कार्याला दाद दिलेली आहे .अशा महान शास्त्रज्ञांचे कार्य आपल्यासाठी प्रोत्साहन बनले पाहिजे आणि विज्ञान या विषयात आपली कुतूहलाची भावना निर्माण झाली पाहिजे. विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्याला प्रगतीपथावर कशा पद्धतीने घेऊन जाईल हे यातून आपण बोध घेऊन विज्ञान हे आपल्या जीवनाचे अविभाज्य अंग आहे आणि या माध्यमातूनच आपल्याला उत्तरोत्तर प्रगती साधता येणार आहे.

      विज्ञान आणि तंत्रज्ञान असल्याशिवाय आपल्याला कोणत्याच गोष्टी करता येत नाहीत कारण जे जे आपण करतो जे जे आपण करण्याचा प्रयत्न करत आहे ते सगळे विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्याशी निगडित आहे आणि हे सगळे खरे असले तरी मनुष्य हा विज्ञानाशिवाय राहू शकत नाही म्हणून आपल्याला आणि संपूर्ण भारतीय लोकांना विज्ञान दिवशी तरी आपल्या शास्त्रज्ञांचे कार्य स्मरणात यावे,  विज्ञानाविषयी चमत्कार असलेली जागरूकता हे मनामनामध्ये ठसलेली असावी हाच 'विज्ञान दिन 'या दिवसाचा उद्देश होईल .

आणखी वाचा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area