Google ads

Ads Area

मराठी शुद्धलेखनाचे नियम | Marathi shudha lekhanache Niyam

मराठी शुद्धलेखनाचे नियम |Marathi shudha lekhanache Niyam  


मराठी शुद्धलेखन

मराठी शुद्धलेखन




शुद्धलेखनाचे नियम( toc )

मराठी शुद्धलेखन  सर्वांसाठी उपयुक्त ते पण सोप्या शब्दांत मांडणे खूप गरजेचे आहे .मराठीचे सुद्धा प्रादेशिकतेनुसार अनेक प्रकार पडत असतात त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा भाषेवर प्रभाव पडत असतो .पुणेरी ,खान्देशी,कोकणी, वऱ्हाडी, या बोली भाषा जरी असल्या तरी त्यांच्या लिखाणांचा प्रभाव आपल्या लेखनात येतच असतो . तरी आपणाला प्रमाण भाषेत लिखाण करणे हे लक्षात आणून देणं महत्त्वाचे आहे.

बोली भाषा कितीही असल्या तरी आपल्याला प्रमाण भाषेचा वापर करणे गरजेचे असल्याने आपण शुद्धलेखनाचा आग्रह धरला पाहिजे त्यातून आपल्याला शुद्धलेखनाची सवय लागून गेली पाहिजे त्यासाठी शुद्धलेखनाचे नियम अभासणे गरजेचे आहे 

पली मराठी सोपी भाषा आहे "वळवेल तशी वळते" असे म्हणणे खूप सोपे आहे पण ती बोलताना सोपी आणि सोईची वाटत जरी असली तरी तिच्याविषयी आपल्याला कुतूहल जागृक होणे खूप महत्त्वाचं असते .

पल्याला मराठीत चांगली मार्क मिळाली जरी असली तरी त्याचे मराठीतील सगळेच्या सगळे नियम माहीत असतीलच असे काही नाही .एखादा मराठी साहित्याचा जाणकार असला तरी सुद्धा त्यास मराठीचे शुद्धलेखनाचे नियम माहीत असतील असे नाही .

आपण जे मराठी लिहितो ते मराठी जसे पुस्तकात दिलेले असते तसेच लक्षात ठेवून आपण त्या शब्दांना डोक्यात ,मनात पक्के करुन ठेवत असतो त्यामुळे आपले मराठी चांगले आहे अशी खात्री होते .त्यांचेही चुकीचे काहीच नसते कारण सगळेच्या सगळे शब्द बरोबर येत असतात .आपलं मराठी चांगले व्हावे वाटत असेल आणि मराठी आजच्या काळात जगते का मरते असे आपण अनेकदा ऐकलेले असते ,त्याची सुरुवात मात्र आपल्यापासून झाली पाहिजे 

चला तर मग आपण जाणून घेऊ या मराठी शुद्धलेखनाचे नियम..


राठी शुद्धलेखनाचे नियम  

मराठी लेखनाविषयी मराठी साहित्य मंडळाने १९६१ या सालात १४ नियमांना मान्यता दिली होती ,त्यानंतर ११  वर्षाने पुन्हा म्हणजेच १९७२ रोजी नियमांची भर घातली गेली .असे अठरा नियम आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचे आहे .

जही ह्या नियमांचा अभ्यास निम्मा सुद्धा विध्यार्थ्यांना पोहचत नाही त्यामुळे विद्यार्थी या नियमापासून वंचित राहत असतो ,हे सगळे टाळायचे असेल तर आणि मराठीला चांगले दिवस यायचे असतील असे वाटत असेल तर या नियमानुसार आपण लेखन करणे गरजेचे आहे . त्यातील आपण काही महत्त्वाचे नियम आपण बघणार आहोत .

 नियम


स्पष्टोउच्चारित अनुननासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा 

शब्दातील कोणत्याही अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्ट व खणखणीत होत असेल,तर शब्दातील अशा प्रत्येक अक्षरावर एक शीर्षबिंदू किंवा शिरोबिंदू द्यावा .


उदा . संत, पंत, तंत कंप ,पंच ,आंबा ,आनंद इ.

 असे शब्द अनुनासिक आहेत त्यांचा उच्चार नाकातून होत असतो म्हणून त्यावर अनुस्वार द्यावा .

 अर्थ स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर - सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते .

उदा

 सिद्धांत = सिद्धांतामध्ये  सिद्धान्त = प्रमाण ,निर्णय, सत्य

  वेदांत = वेदांमध्ये            वेदान्त = ब्रह्मज्ञान

  देहांत= देहांमध्ये              देहान्त = मृत्यू 

  सत्रांत = सत्रांमध्ये          सत्रान्त = सत्राचा शेवट

  वृत्तांत = वृत्तांमध्ये         वृत्तान्त = इतिहास ,बातमी

  शालांत = शाळांमध्ये      शालान्त = शाळेचा शेवट


नियम  2


य, र, ल, व ,श ,ष, स, ह  ह्यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू दयावा.

उदा .

संयम, संयुग, संरचना ,संवर्धन ,कंस ,सिंह ,संलग्न,अंश ,संशय ,दंष्ट्रा  इ .


नियम 3


 नामाच्या व सर्वनामांच्या आदरार्थी बहुवचनी समान्यरुपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा 

 उदा .

  शिक्षकांनी ,मुख्यमंत्र्यांनी ,पंतप्रधानांनी ,गांधीजींनी ,राज्यपालांनी ,वडिलांनी ,साहेबांनी ,आमदारांनी ,अध्यक्षांनी


नियम 4 


मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ- कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत .इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार लिहावा .

उदा. कवि = कवी                      

       बुद्धि  = बुद्धी

        गती  = गती

इतर  काही शब्दांच्या अंती येणारा इकार तसेच उकार दीर्घ लिहावा .

( अपवाद - आणि ,नि )

उदा . पती, पाटी ,जादू ,नदी ,गती ,संधी , सती 


नियम 5


 व्यक्तींची नावे,ग्रंथांची नावे,किंवा शीर्षके ह्यासारखी वेगवेगळ्या प्रकारची नावे मराठीत लिहिताना त्यांमध्येयेणाऱ्या संस्कृत शब्दांमधील शेवटचा इकार किंवा उकार दीर्घ लिहावा .

 उदा .

 व्यक्ती :  कवी ,हरी ,विष्णू ,

 ग्रंथ : राष्ट्रगुरु समर्थ रामदास,व्रतशिरोमणी,

 शीर्षके :  कृषी विकास मंडळ ,साहित्य संस्कृती मंडळ 

 ही संस्कृत शब्द असून ते ऱ्हस्व लिहितात परंतु मराठीच्या शैलीप्रमाणे आपण ते शब्द दीर्घ लिहितो .


नियम 6 


सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद ( पहिला शब्द ) तत्सम ऱ्हस्वान्त शब्द असेल ( म्हणजेच मुळात संस्कृतात ऱ्हस्वान्त असेल ) तर ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावे .दीर्घान्त असेल तर ते दीर्घान्त लिहावे .साधित शब्दांनाही हाच नियम लावावा .

उदा .

भीती + दायक = भीतिदायक 

बुद्धी + मान = बुद्धिमान

शक्ती + शाली= शक्तिशाली

वायू + रहित = वायुरहित


नियम 7


 मराठीमध्ये शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य ( म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा ) इकार किंवा ऱ्हस्व लिहावा.मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही .तत्सम शब्दांतील उपान्त्य इकार किंवा उकार मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ  लिहावा .

 उदा .अश्विनी ,नंदिनी ,नलिनी ,स्वामिनी,मालिनी, विदुषी ,ज्वालामुखी, चतुर्थी 


  नियम 8


अ-कारान्त शब्दांचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावेत.

उदा .नीट ,बीट ,वीट, खीर ,कठीण, गरीब 

        ऊठ ,गूळ ,दूध ,सूज ,माणूस ,बुरूज

 मात्र काही शब्द संस्कृत असूनही प्रत्येक शब्द अ-कारान्त आहे .अ-कारान्तपूर्वीचा इकार ,उकार ऱ्हस्व आहे.

 उदा .गणित ,जटिल ,दिन ,विष ,शिव ,हित ,सचिव 

       कुल ,गुण ,चतुर ,तरुण,मधुर ,शकुन ,सुख ,सुत


नियम 9


 मराठी शब्दांतील अनुस्वार,विसर्ग ,किंवा जोडाक्षर ह्यांच्या पूर्वीचे इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व लिहावेत .परंतु तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत .

( अपवाद : अतींद्रिय,रवींद्र )

अनुस्वार : भिंत ,नारिंगी ,गुंज ,भुंगा ,पिंड ,गोविंद ,                         चिंतन,तुडुंब ,कुटुंब ,पुंजका ,अरविंद, चुंबक 

विसर्ग :   छि:, थु:, निःपक्षपात, निःशस्त्र, चतुःसूत्री, दुःख,                दु:स्थिती

जोडाक्षर : पुस्तक, गुप्त , दुष्ट, शुद्ध, भिन्न, कित्येक , चित्र                        , मित्र 

परंतु तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत.

उदा .तीव्र ,दीप्ती ,नावीन्य ,फूत्कार,मूल्य ,शूद्र ,सूत्र


नियम 10

 रफारपूर्वीचे इकार किंवा उकार ऱ्हस्व असतात.

उदा .दुर्जन, चतुर्थी ,चतुर्भुज, दुर्भिक्ष, निर्दिष्ट ,निर्बंध ,उर्वरित,उर्वशी,अर्चित ,अर्जित ,उर्जित ,गर्भित ,चर्चित ,मूर्च्छित ,वर्धित ,शर्मिष्ठा,वर्धिष्णू,अर्बुद ,वर्जित ,वर्णित,गर्भित ,हर्षित,हार्दिक मार्मिक,सुपुर्द,भुर्रकन,दुर्बीण,दुर्मीळ,कारकिर्द

तर काही शब्द  किंवा दोन अक्षरी दीर्घ असतात .

उदा . जीर्ण - जीर्णोद्धार

         तीर्थ - तीर्थयात्रा,तीर्थाटन

         शीर्ष - शीर्षक,

         ऊर्जा - उर्जित

         पूर्व - पूर्वक

         मूर्च्छा - मूर्च्छित

          मूर्ध - मूर्धन्य

         ऊर्मी, कीर्ती पूर्ती, स्फूर्ती

        ऊर्मिला, घूर्णन, पूर्णिमा, मूर्तिमंत,

 शूर्पणखा,कर्पूर,शार्दूल,शार्दूलविक्रीडित, आशीर्वाद , कीर्तन ,दीर्घिका


वरीलप्रमाणे नियम हे जर व्यवस्थित अभ्यासले तर आपली मराठी भाषेविषयी अधिकाधिक आवड निर्माण होईल आणि त्यात जर रुची निर्माण झाली तर आपल्या सहजपणे ती लेखनात उतरली जाईल .अरुण फडके यांच्या शुद्धलेखन मार्गप्रदीप  या पुस्तकाचा अभ्यास केला तर आपली भाषा अधिक समृद्ध होण्यास मदत होईल .

चला तर मग या नियमांचा अभ्यास करुन आपली ज्ञानभाषा अधिक सोपी करुन शिकूया आणि इतरांनाही सांगूया. आपल्या मनात मराठी भाषेविषयी आपुलकी ,आत्मियता आहे ती अधिक वाढवूया ,आपल्याला ह्या शुद्धलेखनाची सवय झाली पाहिजे.


आणखी वाचा 

मराठी वर्णमाला 

विभक्ती व त्याचे प्रकार 

शब्दांच्या जाती 

मराठी समास व प्रकार 

सर्वनाम त्याचे प्रकार 

क्रियापद आणि त्याचे प्रकार 

मराठी भाषा गौरव दिन 

समानार्थी शब्द 

विरुद्धार्थी शब्द 

शिक्षक दिनाची माहिती 


           


















 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area