Google ads

Ads Area

संत गाडगे महाराज मराठी माहिती| sant gadage maharaj mahiti

संत गाडगे महाराज मराठी माहिती| sant gadage maharaj mahiti

गाडगे महाराज माहिती
गाडगे महाराज माहिती




गाडगे महाराज ( toc)

गाडगे महाराज म्हणजे आधुनिक काळातील माणसांत देव शोधणारे महान संत .

स्वच्छतेचे पुजारी, एक समाज सुधारक, सगळ्याप्रति सामाजिक न्याय यासाठी प्रसिद्ध असणारे गाडगे महाराज हे एक आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धा ,रूढी- परंपरा, गैरसमजुती, यांना छेद देत होते. माणसात देव आहे हे लोकांना पटवून देण्याचे काम गाडगे महाराज करत होते. अशा महान संताचे कार्य आपण पहाणार आहोत .

 गाडगे महाराज यांचे बालपण | Gadage maharaj yanche balpan

 त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी शेंडगाव या ठिकाणी झाला हे अमरावती जिल्ह्यातील छोटेसे गाव. एक महान संत म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांची आई मूर्तिजापूर येथील दापूरे गावातील .मामांकडे त्यांचे बालपण गेले मामाची शेती भरपूर असल्याने शेतीमध्ये कामधंदा करायला गुरे पालन , नांगर धरणे हे काम करावे लागत होते, काम करणे त्यांना खूप आवडायचे .

 नाव: डेबुजी झिंगराजी जानोरकर 

आईचे नाव -: सखुबाई 

वडील  झिंगराजी जानोरकर

वडील परीट म्हणून काम होते. दारूचे व्यसन त्यांना लागले होते आणि या दारूच्या पायी त्यांचा मृत्यू झाला. घरची परिस्थिती बेताची होती यामुळे त्यांना शेतातील काम करावे लागत होते.

संसारातून संन्यासी | sansaratun sanyasi

 त्यांचे लग्न 1892 रोजी झाले. त्यांना चार मुली झाल्या. त्यांचे संसारात मन लागत नसल्याने त्यांनी 01 फेब्रुवारी 1905 रोजी संसारातून संन्यास स्वीकारला आणि समाजाच्या उद्धारासाठी ते घरातून बाहेर पडले .

गाडगे महाराज यांचे कार्य| Gadage maharaj yanche karya

  जे लोक दीनदलित गरीब पीडित आहेत अशा लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष मदत हवी असेल त्यावेळेस स्वतःहून त्या ठिकाणी मदत करायला जात होते म्हणजे समाजकार्य करण्यासाठी त्यांचा हातखंडा होता. चारित्र्य आणि स्वच्छता हे खूप महत्त्वाचे गुण गाडगे महाराज यांच्याकडे होते आणि ते कीर्तनातून लोकांना सांगत होते. जे लोक दीन,दलित, गरीब, अनाथ, अपंग आहेत त्यांची सेवा करावी असा त्यांचा मानस होता. ज्यावेळेस त्यांना लोकांकडून देणगी मिळत होती .ती  देणगी दलित गरीब ,अनाथ, अपंगांची सेवा करण्यासाठी आश्रम काढले अनाथांसाठी अनाथालय काढले, धर्मशाळा आणि मुलांना शिक्षण देण्यासाठी शाळा उघडल्या. यांच्यातच देव आहे असं ते समजत होते त्यांच्यामध्ये राहत होते म्हणजेच दगडाच्या देवाला ते मानत नव्हते तर माणसांमधील जो देव आहे त्या देवाची भक्ती करा म्हणजे सध्या माणसांची भक्ती करावी असं ते लोकांना सांगत होते.

 गाडगे महाराजांचा वेश| Gadage maharaj yancha vesh

 गाडगे महाराज म्हणलं की आपल्याला लगेच स्वच्छतेचे पुजारी म्हणून लक्षात येतात.  हे गाडगे महाराज यांचा वेश साधाच ,डोक्यावर विस्कटलेले केस म्हणजे त्याला पण आपण झिंज्या किंवा टारलं म्हणतो .खापराच्या तुकड्याची टोपी होती, एका कानात कवडी तर दुसऱ्या कानात बांगडीची काच, एका हातात नेहमी झाडू असायचा, तर दुसऱ्या हातात मडके असायचे .असा त्यांचा वेश होता. 

कीर्तनात समाज प्रबोधन | kirtanatun samajprabodhan

कोणत्याही गावात गेले तरी ते गाव आधी स्वच्छ करायचे आणि मग नंतर त्याच गावात कीर्तन करायचे. एका दिवसापेक्षा दुसरा दिवस मुक्काम होत नसे. म्हणजे जास्त काळ  त्या गावांमध्ये राहत नव्हते. कीर्तनातून समाजप्रबोधन करीत होते . गाडगे महाराज हे जरी माणसात देव शोधणारे होते तरीसुद्धा त्यांची देवावर श्रद्धा होती ,अंधश्रद्धा नव्हती ,डोळस मनाने ते भक्ती करत होते. कीर्तनातून त्यांनी समाजप्रबोधन करण्याचे ठरवले. ते कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. व्यसन,अंधश्रद्धा यांच्या आहारी गेलेले आहेत, पशु पक्ष्यांचा बळी घेतात, हत्या करतात ,जातीभेद पाळतात,  स्पृश्य -अस्पृश्य मानतात ,चोरी करणे हे लोकांना आवडत होते ते चोरी करू नका,  धर्मभेद मानून आपली  हानी कशी होते हे समजून सांगत होते.  कर्ज घेऊन आपण कर्जामध्ये आपला नाश करून घेऊ नये अशा पद्धतीने कीर्तन होतं. त्यांनी माणसातच देव कसा आहे हे मात्र त्यांनी लोकांना पटवून सांगितले आणि लोकांना खरोखर ते पटत होते.

 गुरूंविषयी श्रद्धा| guruvishai shardha

 गाडगे महाराज हे तुकाराम महाराजांना गुरू मानत होते त्यांचे विचार आणि गाडगे महाराज यांचे विचारहोते ते अभंगाच्या माध्यमातून त्यांना जुळत होते. तुकाराम महाराज जसे भगवंताला मानत होते तशाच पद्धतीचे ते सुद्धा मानत होते म्हणून तुकाराम महाराजांना गुरु मानत होते. पण ते स्वतः असे म्हणत होते की ," मी कोणाचाही गुरू नाही आणि माझा शिष्य कोणी नाही " या पद्धतीने ते राहत होते म्हणजेच त्यांना स्वतःला गुरु म्हणून कोणी स्वीकारत असेल तर ते पटत नव्हते किंवा माझे शिष्य म्हणून लोकांकडून सेवा करून घेणे हे त्यांना रुचत नव्हते म्हणून या सगळ्या गोष्टींपासून ते लांब राहत होते .मात्र लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी खाली वाकत होते तेव्हा ते त्यांना खराट्याने त्यांना मारत होते, की असं पाया पडू नये या पद्धतीने  म्हणजे फक्त माणसाची सेवा करणे आवडत होते आणि तशाच पद्धतीने ते राहत होते. लोकांनी पाया पडावे, दर्शन घ्यावे असं सुद्धा त्यांच्या मनात येत नव्हते. 

महाराजांची शिकवण  Gadage marajanchi shikavan

अशी की सार्वजनिक हिताची जी कामे आहेत ते काम सगळ्यांनी करावेत. एखाद्याला मदत हवी असेल तर ती मदत त्याला द्यावी असा त्यांचा मानस होता त्यांनी जरी संसाराचा केला असला ,संन्यास स्वीकारला असला तरी ते एका जागी बसले नाहीत त्यांनी अनेक ठिकाणी भ्रमंती चालू ठेवली. तीर्थाटन केले ,वनवास स्वीकारला पण लोकसेवेचे व्रत त्यांनी कधीच सोडले नाही लोकांना ज्या ठिकाणी मदत हवी असेल त्या ठिकाणी त्यांनी तेथे जाऊन लोकांना मदत करण्याचे ठरवले होते आणि त्याच्या बदल्यात ते कोणत्याच प्रकारची अपेक्षा ठेवत नव्हते. अशा गाडगेबाबांना आचार्य अत्रे असे म्हणतात की एक महाराष्ट्रातील महत्त्वाचे समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ असलेले हे गाडगे महाराज आहेत .तसेच एके ठिकाणी म्हणतात, " सिंहाला पहावे वनात ,हत्तीला पहावे रानात आणि गाडगे बाबांना पहावे कीर्तनात " अशा ह्या महाराष्ट्रातील समाजवादाचे म्हणजे समाजाची सेवा करणारे एक महान विभूती म्हणून जन्माला आलेले आहेत अशा शब्दात आचार्य अत्रे यांनी त्यांचा गौरव केलेला आहे.

 गाडगे महाराजांचे भजन  | Gadage maharajanche bhajan

ज्या ज्या ठिकाणी ते जात होते त्या ठिकाणी लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा त्यांचा मानस होता आणि ते तशा पद्धतीने करतही होते. अगोदर स्वच्छ गाव करायचे आणि रात्रीच्या वेळेस किर्तनाला उभे राहायचे. कीर्तनातून लोकांच्या मुखातून "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला " अशा शब्दात नामस्मरण करून घेत होते म्हणजे त्यांना भक्तीचा मार्ग सुद्धा शिकवत होते. म्हणजे केवळ माणुसकीचे धडे न देता भक्तीच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.

 गाडगे महाराज यांचे प्रबोधनकाव्य /दशसुत्री काव्य  Gadage maharaj yanche prabodhan kavya

त्यांचे नेहमी विचार असे होते की ज्यांना काही भेटत नाही जे गरीब आहेत पीडित आहेत, अनाथ आहेत ,अपंग आहेत अशा लोकांना जे जे हवे आहे ते ते देण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांना हवी ती मदत आपण केली पाहिजे, म्हणून त्यांना ह्या 10 दशसूत्री आहेत ते त्यांचं काव्य आहे ते खूप आजही सगळ्यांना लागू होत आहे .लोकांनी एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

भुकेलेल्याला - अन्न

 तहानलेल्याला -  पाणी 

गरजू मुलांना - शिक्षणासाठी मदत

 बेघरांना - आसरा 

रोग्यांना -औषधोपचार

 बेकारांना - आसरा 

पशुपक्षी, मुक्या प्राण्यांना - अभय

 गरीब तरुण-तरुणींचे -  लग्न करून देणे 

गोरगरिबांना - शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे.

 अशा पद्धतीने त्यांनी आपले प्रबोधन काव्य रचले आहे . ह्या सगळ्या गोष्टी जर माणसांना कळाल्या तर तो माणूस आपले जीवन कार्य चांगल्या पद्धतीने जगू शकतो म्हणजे लोकसेवेसाठी त्यांनी आपल्या संसाराचा घराचा त्याग करून समाज कार्य करण्यासाठी त्यांनी या क्रियांचा वारंवार वापर केलेला दिसतो 

 गाडगे महाराज यांचे कार्य | Gadage maharaj yanche karya

1908 मध्ये त्यांनी पूर्णा नदीवर घाट बांधून लोकांसाठी तो उपयोगी की पडेल या विचारातून त्यांनी घाट बांधला .

 1925 मध्ये मुर्तीजापुर हे याठिकाणी गोरक्षणाचे काम केले तसेच त्या ठिकाणी शाळा आणि धर्मशाळा बांधल्या  आहेत. म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी हे उभे केले आहे.

 1917 मध्ये पंढरपूर या ठिकाणी चोखामेळा धर्मशाळा स्थापन केली आहे .

1952 मध्ये गाडगेबाबा मिशन महाराष्ट्रभर शिक्षण संस्था व धर्मशाळा बांधल्या आहेत . 

यातून यांच्या ह्या महत्त्वपूर्ण कामगिरीतून समाज उद्धार करणारे हे आधुनिक काळातील महान संत होऊन गेलेले दिसून येते.

  भेटीगाठी

गाडगे महाराज यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा गांधी यांच्याशी भेटी घेतल्या आहेत. आपल्या कार्याने ते अधिक प्रसिद्ध झालेले असताना किंवा किर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असताना त्यांना अनेक महान व्यक्तींनीही भेट दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  हे यांना गुरू मानत होते त्यांचे चांगले संबंध असलेले दिसून येतात कर्मवीर भाऊराव पाटील यांना सुद्धा त्यांनी शिक्षण कार्यामध्ये मदत केलेली दिसून येते महात्मा गांधी हे सुद्धा गाडगे महाराज यांना भेटलेले आहेत.

गाडगे महाराज हे माणसातच देव शोधणारे एक महान संत .समाज उद्धारासाठी त्यांनी आपल्या संसाराचा त्याग केला त्यांनी अनेकांना मदतिचा हात दिला पण कोणतीही अपेक्षा ठेवत नव्हते .आजही लोकांनी त्यांनी मांडलेले विचार अनुसरले तर आजचा समाज खरोखर माणसात देव शोधेल. आजची पिढी अशी आहे की स्वतःचा विचार करणारी आहे ,समाजाचे काही घेणंदेणं नाही अशाच विचारात असते .हे सगळे टाळायचे असेल तर संतांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गाने जाणे आवश्यक आहे .


आणखी वाचा

गाडगे महाराज यांचे प्रबोधन काव्य

छत्रपती शिवाजी महाराज माहिती


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area