Google ads

Ads Area

मराठी भाषा गौरव दिन marathi bhasha gaurav din

     मराठी भाषा गौरव दिन | marathi bhasha gaurav din

मराठी भाषा गौरव दिन
मराठी भाषा गौरव दिन


मराठी भाषा दिन( tocs)

   भाषा ही आपल्या सगळ्यांची आणि जिव्हाळ्याची भाषा आहे.  भाषा म्हणलं की प्रत्येकाला आपली वाटत असते ,मग ती कोणतीही असली तरी त्याबद्दल आदर असतोच मग आपल्या मराठी भाषेविषयी अभिमान बाळगणारे आणि मराठी दिवस साजरा केला जातो त्यामागे काहीतरी गूढ असणारच हे माहीत होण्यासाठी आपल्याला भाषेविषयी जाणून घेणं महत्त्वाचे आहे .

          मराठी बोलतोय हेच आपले भाग्य समजले पाहिजे .असा आपल्या आईविषयी जेवढं प्रेम असते तेवढं प्रेम आपल्या मातृभाषेविषयी असले पाहिजे .आपली मातृभाषा ही मराठी आहे त्याविषयी आपुलकी असलीच पाहिजे .आजच्या कलियुगात मराठी ही हद्दपार होते की काय असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो, पण तसे नाही.  जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत मराठीला चांगले दिवस येतील यात काही शंकाच नाही .
         त्यासाठी आपण मराठी आहोत याचाच अभिमान असला पाहिजे. ' मी मराठी ' या वाक्यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे आपल्या मराठी लोकांविषयी ,मराठी असलेले सगळे लोक यांच्याविषयी असणारा जिव्हाळा वाढीस लागला पाहिजे .


मराठी भाषा दिवस का साजरा केला जातो : 

marathi bhasha ka din asajra kela jato


     मराठी दिवस का साजरा केला जातो हे प्रथम पाहू या. मराठीतील कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर हे मराठीतील महत्त्वाचे लेखक व कवी,नाटककार होऊन गेले त्यांनी खूप विपुल साहित्य लिहिले आहे. 

            महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे त्यामुळे मराठी ही आपल्या माणसांची होईल मराठी रुजली गेली पाहिजे तिचे संवर्धन झाले पाहिजे ,असा मानस होता की  मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला अभिवादन  म्हणून त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी हा दिवस म्हणजे मराठी भाषा दिवस म्हणून गौरवण्यात आले आहे .

          मराठी भाषा गौरव दिन हा दिवस 21 जानेवारी 2013 महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे. तो दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला, पण त्या अगोदर 2010 मध्ये यांचा जन्म मराठी भाषा गौरव दिन म्हणून नमूद केलेले होते .ज्या वेळेस मराठी भाषा म्हणजेच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले . तेव्हापासून राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन असे साजरा केला जातो. त्यांनी महाराष्ट्राची भाषा अधिकृत भाषा असली पाहिजे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी "मराठी राजभाषा अधिनियम 1964 " या नियमानुसार सर्वप्रथम 11 जानेवारी 1965 रोजी प्रसिद्ध केले.

          हे अमलात आणण्यासाठी 1966 पासून सुरुवात झाली. वसंतराव नाईक यांचे विचार असे होते ते मराठी भाषाचे संवर्धन होण्यासाठी पहिल्यांदाच  "भाषा संचालनालयाची निर्मिती " करताना प्रादेशिक स्तरावर चार केंद्राची स्थापना करण्यात आली. राज्यातील शासन व्यवहार म्हणजेच राज्यकारभार मराठीतून चालणार असे अधिकृतपणे त्यांनी जाहीर केले. मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी हा दिवस मान्य करण्यात आला . आणि मराठी भाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा राजभाषा हे 1 मे रोजी आहे .

           या दिवसाचे स्वतंत्र असे महत्त्व आहे ते समजून आपण घेतले पाहिजे, तरच आपण मराठी राजभाषा दिन किंवा मराठी गौरव दिन हे पण विसरणार नाही हे आपण समजून घेतले पाहिजे . आणि इतरांनाही समजून दिले पाहिजे आजही मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन याच्यामध्ये थोडा गैरसमज असलेला दिसून येतो. तर 1 मे रोजी महाराष्ट्र दिन जो आहे तोच आपला मराठी राजभाषा दिन होय .

मराठी भाषा गौरव दिन आणि राजभाषा दिन यात फरक marathi bhasha gaurav din aani rajbhasa di yatil farak


           यातील फरक अगोदर स्पष्ट केले पाहिजे .तरच गौरव दिन म्हणायचे की राजभाषा दिन हे समजून घेणं महत्त्वाचे ठरेल .आज सगळीकडे राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो पण हे तसे नाही .
मराठी भाषा दिन मराठी भाषा आणि मराठी राजभाषा दिन हे वेगवेगळे आहेत हे समजून घेतले पाहिजे 1 मे रोजी मराठी राजभाषा दिन म्हणून राज्यभर साजरा केला जातो 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 

                 म्हणजेच मराठी भाषा बोलणारे यांचे राज्य स्थापन झाले मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आले त्यामुळे हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा मराठी भाषा दिवस भाषा दिवस साजरा करण्यासाठी राज्यातील प्रशासन धोरण राबवण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक स्तरावर 4 विभाग तयार करण्यात आले .स्थापन करण्यात आले नियम अधिनियम 1966 नुसार महाराष्ट्र राजभाषा मराठी असेल असे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घोषित केले त्यावेळेस संपूर्ण राज्यकारभार इंग्रजी भाषेतून चालत होता म्हणून मराठी अधिकृत भाषा असली पाहिजे असे त्याकाळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घोषित केले .मराठी भाषा जागतिक का मराठी भाषा दिन असे म्हटले जाते . 

 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज  kusumagraj dnyanpith purskarkarte

           यांचा जन्मदिवस जरी असला तरी तो मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो त्यांच्या योगदानास अभिवादन म्हणून 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र शासनाने 27 फेब्रुवारी हा गौरव दिन म्हणून साजरा केला जात आहे घोषित केले, तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली म्हणून 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो हे सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे .

       यात वेगळेपणा आहे तो आपल्याला समजला पाहिजे, तरच आपण मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी राजभाषा दिन हे आपण समजून घेणे योग्य ठरेल .

मराठी भाषा ( आपल्या भाषेचा इतिहास ) marathi bhashecha itihas

          आपल्याला माहीत असला पाहिजे कुठून कसाआले आणि कशा पद्धतीने त्याचा विकास होत गेला हेही आपण समजून घेतले पाहिजे .संस्कृतभाषा आपली मुळची भाषा आहे त्याच्यानंतर आपली भाषा आहे. भारताच्या ज्या महत्त्वाच्या भाषा म्हणजे अधिकृत 22 भाषा आहेत त्यापैकी आपली एक मराठी भाषा आहे .महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे.  अशी ही आपली भाषा मराठी बोलणारे भरपूर लोक आहेत जागतिक पातळीवर दहाव्या क्रमांकावर आपली मराठी भाषा बोलली जाते तर आपल्या भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर भाषा बोलली जाते .महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषेचे अधिकृत रूप आहे.

          ज्ञानेश्वर, मुकुंदराज ,चक्रधर स्वामी ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या मराठीला चांगले रूप दिलेले आहे. महाराष्ट्राची एक मराठी म्हणून वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. मराठी सर्वसामान्यांची झाली पाहिजे. असे आपण प्रयत्न करत असतो पण त्यासाठी काही प्रयत्न  आपल्याकडून करणं महत्वाचे आहे. 

         मराठी भाषा ही म्हणलं की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ते संस्कृतपासून निर्माण झाली आहे त्याच्यानंतर प्राकृत भाषा आणि त्यानंतर महाराष्ट्रीय भाषा या बोलीभाषेतून आपली मराठी भाषा निर्माण झाली आहे. यावरून सातवाहन साम्राज्याने प्रशासनात वापर केलेला आहे असे आपल्याला दिसून येते. संस्कृत भाषा आणि मराठीची भरभराट झालेली दिसते .संस्कृत शब्द मराठीत आजही जसेच्या तसे असल्याचे दिसून येतात. 

             मराठी भाषेत मुकुंदराज ,महानुभाव पंथ , वारकरी संप्रदाय (संत ज्ञानेश्वर ) यांनी मराठीत लिहिलेले साहित्य दर्जेदार आहे. याच काळात नामदेव महाराजांनी आपले विपुल साहित्य लिहिले गेले आणि मराठी आणि भागवत संप्रदायाची पताका ही पंजाबपर्यंत नेण्याचं काम नामदेव महाराजांनी केले. एकनाथ महाराजांनी आपल्या भागवत आणि भावार्थ रामायण या ग्रंथातून आपल्या मराठीत मोलाची भर घातलेली आहे. शिवाजी महाराज आणि संत तुकाराम आणि रामदास स्वामी यांचा काळ यांनीही लेखन केले .

 

मराठी भाषेत झालेले बदल  marathi bhashet jhalele badal

          मराठी भाषेचे वय सर्वसाधारणपणे 2500  पूर्वीचा मानला  जातो .माणसांमध्ये प्रगती होत गेली म्हणजेच विज्ञानाची प्रगती होत गेली तसतसे भाषेमध्ये सुद्धा बदल होत गेलेले आहेत त्याचा पुरावा आपण बघणार आहोत. सुरुवातीचा काळ म्हणजेच 

  • आद्यकाळ

इ स 1200 पूर्व काळ ,म्हणजेच हा काळ महानुभाव आणि वारकरी संप्रदाय यांच्या अगोदरचा काळ आहे .या काळातील मराठी लेखन हे ताम्रपट आणि शिलालेख यातून आढळतो .

  •  यादव काळ

इ स 1250 ते 1350 असा काळ समजला जातो .देवगिरीच्या जे राजे होते त्यांनी म्हणजेच यादवांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला . महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय यातील संतांनी भरपूर प्रमाणात काव्यलेखन केलेले दिसते .

  • बहामनी काळ 

इ स 1350 ते 1600 ह्या दरम्यानचा काळ आहे . यादव घराणे संपल्यावर हा काळ चालू होतो या काळात मुस्लीम आक्रमक यामुळे मराठी साहित्य निर्माण झालेले दिसत नाही .याच काळाला अंधारयुग असेही म्हटले जाते .फारसी भाषेचा प्रभाव होत असलेला दिसून येतो.अशा अंधारयुगातही संत एकनाथ महाराज,नृसिंह सरस्वती,भानुदास,जनार्धन स्वामी यांनी लेखन केले आहे. .

  •   शिवाजी महाराज यांचा काळ

यांचा काळ इ .स. 1600 ते 1700 असा आहे .या काळातच संत तुकाराम आणि रामदास स्वामी मुक्तेश्वर,रघुनाथ पंडित ,वामन पंडित यांनीही मराठीत रचना केलेली आहे .छत्रपती शिवाजी महाराजांनी या काळात मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आहे .

  • पेशवे काळ

1700 ते 1800 असा मानला जातो . शाहिरांनी बखर ,पोवाडा ,लावण्या रचलेल्या आहेत.

शाहीर आणि पंडितांना प्रोत्साहन देऊन त्यांनी लावण्या आणि पोवाडे रचलेले दिसतात . श्रीधर ,मोरोपंत ,होनाजी बाळा ,रामजोशी,सगनभाऊ यांनी काव्यलेखन केलेले आहे 

  • इंग्रज यांचा काळ

इ स 1818 म्हणजेच पेशवाई नष्ट झाली आणि इंग्रजी सत्ता आली तेव्हापासून आजपर्यंतहा काळ समजला जातो .कथा ,गद्य,नियतकालिके यांचे लेखन या काळात हाऊ लागले मुद्रणकला विकसित झाली .मेजर कँडी यांनी विरामचिन्हे बांधून दिली


  • स्वातंत्र्य नंतरचा काळ

सावरकरांनी भाषाशुद्धीची चळवळ राबवली .छबिलदास चळवळ याच काळात झाली अनेक नाटककार ,लेखक निर्माण झाले ,त्यांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याचा प्रयत्न केला .

  • विश्वकोश निर्मिती

1960 ला महाराधत राज्य सांस्कृतिक मंडळाची स्थापना झाल्यावर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोशाची निर्मिती केली .याच्याअगोदर केतकर यांनी मराठी ज्ञानकोश लिहिला त्यानंतर विश्वकोश निर्माण झाला .

    अशा पद्धतीने आपण मराठी भाषा दिनाविषयी माहिती पाहिली. आता तुम्हाला समजून आले असेलच की मराठी भाषा गौरव दिन आणि राजभाषा दिन यातील वेगळेपण समजले असेलच .

          कोणताही दिवस असला तरी आपण मराठी आहोत याची नेहमी जाणीव असू द्यावी नाहीतर इंगजीच्या काळात आपल्या मातृभाषेचा अनादर करु नये .आपली मराठी अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे .जास्तीत जास्त मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे .आपण नेहमी नवीन भाषेच्या झगमटात आपली मराठीची ठेवण विसरता कामा नये. आपण जे मोठे झालो ,उत्कर्ष साधला तो मराठीतूनच मग आताच असं का वाटू लागले आहे की इंगजीचा अट्टहास धरावा .जागतिक भाषा म्हणून त्याचा स्वीकार झाला पाहिजे पण आपल्या भाषेची सुद्धा तेवढीच तळमळ ,आवड ,ओढ असली पाहिजे .


आणखी वाचा

आंतरराष्ट्रीय योगा दिन माहिती

विज्ञान दिनाची माहिती

महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम

मराठी व्याकरण विरुद्धार्थी शब्द

पंडित नेहरु यांची माहिती

बुद्ध जयंती माहिती 

सावरकर यांची माहिती

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area