Google ads

Ads Area

ज्ञान कर्म भक्ती म्हणजे जीवन |Dnyan karma bhakti mhanje jivan | ज्ञान कर्म भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे जीवन

 ज्ञान कर्म भक्ती म्हणजे जीवन |Dnyan karma bhakti mhanje jivan | ज्ञान कर्म भक्ती यांचा  त्रिवेणी संगम  म्हणजे जीवन 


ज्ञान,कर्म,भक्ती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे जीवन.माणसाला जीवन जगत असताना तीन गोष्टींची खूप आवश्यकता असते. त्या तीन गोष्टी एकत्र जीवनात आल्या तर माणसाचे जीवन समृद्ध झाल्याशिवाय राहत नाही . 


      यांचा त्रिवेणी संगम म्हणजेच खरे जीवन होय. उदा.एखाद्या माणसाला खूप ज्ञान आहे पण व्यवहारात वागताना कोणत्याही गोष्टीची तमा बाळगत नाही,वडीलधाऱ्या मंडळींचा आदर करीत नसेल तर ते ज्ञान फुकाचे असते.

  भक्ती|Bhakti 

 तसेच एखाद्या व्यक्तीजवळ ज्ञान आहे तसेच त्याच्या हृदयात इतरांविषयी आदरभाव आहे,पण कोणाला मदत करायची म्हणलं की जीवावर येते किंवा हे सगळे असताना झोपून राहिला तर काहीच हाती येत नाही .

देवादिकांना भक्ती आवडत  असते त्यामुळे त्यांचे जीवन चांगले  जात असते. भक्तीमुळे अनेकांचे  जीवन समृद्ध झालेले  आपल्याला दिसून येत असते.  महाराष्ट्र ही संतांची  भूमी असून संतांनी आपल्याला भक्तीचा  महिमा सांगितला आहे. भक्ती  केली तरच आपल्याला ईश्वर प्राप्ती होत असते.

  कर्म |Karma 

दहावीत मुलगा आहे तो खूप हुशार आहे,त्याला खूप चांगले आकलन होते.कोणताही भाग त्याच्या तोंडपाठ आहे .अशावेळी तो जर अभ्यास न करता आळस करु लागला,झोपून राहू लागला तर त्याच्या पदरी निराशा येणार .

भक्ती कितीही केली तर कर्म चुकले  तर जीवनाचे  सारे गणितच  चुकले  जाते. म्हणून भक्ती बरोबर कर्माला महत्त्व प्राप्त झाले  आहे.आपल्या हातून कोणतेही वाईट कृत्य होता कामा नये यासाठी  आपल्याला ज्ञान आणि  भक्तीची  गरज असते.

ज्ञान |Dnyan 

त्याचे कर्म चांगले आहे,तो दयाभाव सगळ्यांना दाखवितो,पण कोणत्या वेळी कसे वागायचे ह्याचे ज्ञान नसेल तर काही उपयोग होत नाही 

 उदा.एखादा गुरासारखा काबाडकष्ट करीत असेल ,लोकांची मर्जी राखून सगळा व्यवहार करीत असेल तर त्याचेही गृहकार्य म्हणून जी जबाबदारी आहे त्याचा विसर पडून जातो लोक याचा गैरफायदा घेऊन जातात. ज्ञान,कर्म,भक्ती यांचा मेळ असेल तरच जीवन जगताना कोणत्याच प्रकारची नामुष्की ओढवणार नाही.

जीवन चांगले  हवे असेल तर या तिन्ही गोष्टी जीवनात असल्या पाहिजेत त्याशिवाय काहीच साध्य होणार नाही. नुसते ज्ञान असून उपयोग होत नाही तर त्यासोबत कर्म आणि  भक्तीची  जोड असावी लागते तर नुसती भक्ती नको आहे  त्याबरोबर कर्म आणि ज्ञान पाहिजे. कर्म असूनही चालत  नाही ज्ञान आणि भक्ती असावी लागते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area