गजानन महाराज मराठी माहिती | Gajanan maharaj marathit mahiti
अशी दंतकथा आहे की स्वामी समर्थ यांच्याकडे बालवयात गजानन महाराज त्या ठिकाणी राहिले होते त्यांचा अनुग्रह झाल्यानंतर ते शेगाव या ठिकाणी 23 फेब्रुवारी 1978 रोजी शेगाव येथे ते दृष्टीस पडले. गजानन महाराज एक महान संत होते ब्रह्म होते, परमहंस संन्यासी होते, जीवनमुक्त उद्धार करणारे होते, जास्त बोलत नसत पण आपल्या कृतीतून आपलं कार्य तेव्हा बोलतं ठेवत असत, विदेही स्थितित नेहमी जात असत , जीवनमुक्त राहणारे, भक्तांचा उद्धार करणारे असे महान संत म्हणजे गजानन महाराज होय .
गजानन महाराज यांची माहिती | gajanan maharaj mahiti
शेगाव या ठिकाणी 23 फेब्रुवारी रोजी 1878 रोजी दृष्टीस पडले असले तरी त्यावेळेस त्यांचे वय कोणी म्हणते 24 वर्षाचे होते तर कोण 30 वर्षाचे होते असे म्हणतात .वय कितीही असले तरी त्यांचा जीवन जगण्याचा जो मार्ग होता तो ब्रह्मस्थितीत असल्याचा अनुभव येतो .
ब्रह्म अवस्थेत राहत होते म्हणूनच वस्त्रहीन अवस्थेमध्ये राहत होते. त्यांना कोणत्या कपड्यांचा मोह नसायचा किंवा पायात कधी पादुका घातल्या नाहीत. नेहमी आनंदाने राहणारे असे विरक्त पुरुष हातात फक्त चिलीम असायची. यावरुन गजानन महाराज ओळखले जात असत ते नेहमी भक्तांचा उद्धार करण्यासाठी विचार करत असत त्यांचा मंत्र म्हणजे " गण गणात बोते" म्हणून त्यांना गिणगिनेबुवा, गजानन महाराज, गजानन बाबा ,अशी नावे होती. वऱ्हाडी भाषेतील भक्तमंडळी त्यांचे अनुयायी होते. 32 वर्षे शेगावला राहून त्यांनी आपले कार्य सिद्धीस नेले. गजानन महाराज नेहमी गोड बोलत होते .
स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यांच्यात साम्य असलेले दिसून येते. दोघेही स्वयंभू होते म्हणून दिगंबर अवस्थेत हे स्वामी समर्थ आणि गजानन महाराज हे एकच असावेत असा लोकांना समज होता.
लोकमान्य टिळक आणि गजानन महाराज |tilak & gajanan maharaj
गजानन महाराज यांना विठ्ठलाची आज्ञा | vitthal aadnya for gajanan maharaj
गजानन महाराज परमहंस संन्यासी पुरुष होते त्यावेळेस त्यांचे अवतार कार्य पूर्ण झाले त्यावेळेस हरी पाटील यांच्यासोबत पंढरपूरला गेले. त्यावेळेस पंढरपूर या ठिकाणी आपण समाधी घेऊ असा त्यांचा मानस होता त्यावेळेस विठ्ठलाने शेगाव या ठिकाणीच समाधी घ्यावी असे सांगितले. म्हणून पंढरपूर या ठिकाणी समाधी न घेता शेगाव या ठिकाणी ऋषिपंचमीला 08 सप्टेंबर 1910 रोजी समाधी घेतली.
गजानन महाराजांचे अवतार कार्य | gajanan maharajanche avatar karya
शेगाव या ठिकाणी देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर पत्रावळ्या होत्या त्या टाकून दिलेल्या होत्या उष्ट्या पत्रावळ्यावरील अन्न खात असताना गजानन महाराज दृष्टीस पडले हे एक दत्तसंप्रदायाचे महत्त्वाचे गुरु होते. भगवान गणेश यांचा अवतार मानला जातो ज्यावेळेस ते 23 तारखेला फेब्रुवारी महिन्यातील 1878 रोजी दिगंबर अवस्थेत दिसले असले तरी त्यांचा कार्यकाल पुढे चालू राहिला.
यावर दासगणू म्हणतात
कोण हा कोटीचा काहीच कळेना |ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे| साक्षात हे आहे परब्रह्ममूर्ती |आलीस प्रचिती बहुतांना|
अशा शब्दात दासगणू यांनी गजानन महाराज यांचे वर्णन केले आहे म्हणजेच कोण आहे, कुठून आले, कसे आले हे कायमच गूढ राहिले आहे . पण या मूर्तीत परब्रह्म आहे अशी प्रचिती सगळ्यांना आली. अशा पद्धतीने त्यांचे अवतार कार्य दिसून येते.
गजानन महाराज दंतकथा | gajanan maharaj dantkatha
स्वामी समर्थांकडे बाल दिगंबर म्हणून ते काही दिवस त्यांच्या वास्तव्यास होते समर्थ त्यांना त्यांच्या अवतार कार्याची अनुभूती दिली मग ते शेगावला आले अशी दंतकथा आहे.
गजानन महाराजांनी शरीरयष्टी | gajanan maharajanchi sharirarachna
गजानन महाराज यांचा देह उंचापुरा होता, म्हणजे ते सहा फूट उंचीचे, सडसडीत बांधा असलेले, तांबूस वर्ण , तुरळक दाढी आणि केस होते, वस्त्रविहीन शरीर गुडघ्यापर्यंत पोहोचणारे हात लांबलचक असे हात होते, पायात चप्पल नाही म्हणजे अनवाणी असायचे हातात चिलीम अशा पद्धतीची त्यांची शरीरयष्टी असायची.
गजानन महाराजांची भोजन व्यवस्था | gajanan maharanjanchi bhojan vyavastha
कोणाच्याही घरात ते लगबगीने जात आणि तेथे राहत किंवा पाण्याची घागर असेल त्यात स्वतःहून पाणी घेऊन पीत असत ज्या घरी जात त्या घर मालकाने भाकरी दिली तर खालली नाहीतर तसेच पुढे निघून जात,महाराज आवडीने मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर आणि झुणका-भाकर हे त्यांचे आवडीचे पदार्थ होते.
कोणाच्या घरी गोरगरिबांच्या घरी गेले तर त्या ठिकाणी पिठलं भाकरी हे जरी जेवण मिळाले तरी ते आवडीने खात होते म्हणून आजही आंबाड्याची भाजी भंडाऱ्याला प्रसाद म्हणून लोक आवडीने खात असत म्हणजेच त्यांच्या प्रकट दिनी दिवशी ज्या ज्या ठिकाणी भंडारा असेल त्या त्या ठिकाणी झुणका-भाकर हिरव्या मिरच्या आणि आंबाड्याची भाजी लोक प्रसाद म्हणून करत असत. म्हणजे हे गजानन महाराजांना आवडणारे खाद्यपदार्थ असल्याने त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ प्रसाद म्हणून देण्यात आणि खाण्यात लोकांना धन्यता वाटत असते .तसेच त्यांना चहा विषयी आवड असायची चांदीच्या वाडग्यात गरम गरम चहा पिण्यास त्यांना आवडत होते.
गजानन महाराजांचा उपदेश|gajanan maharajancha updesh
ज्ञान, कर्म, भक्तीयोग हे मार्ग जर अनुसरले तर प्रत्येक मनुष्याला आत्मज्ञान झाल्याशिवाय राहणार नाही असा उपदेश गजानन महाराज करत होते. या मार्गाने मनुष्याचा उद्धार होण्यास मदत होते. त्यांना दिखावटी ज्ञान नको आहे ज्यातून आत्मज्ञान प्राप्त होईल असे ज्ञान त्यांना महत्त्वाचे वाटत होते. म्हणून कर्म, भक्ती आणि योग मार्गाने आत्मज्ञान होते महत्त्वाचे आहे हे सांगत होते. तसेच गोविंदपंत टाकळीकर महाराज हे एक कीर्तनकार होते ,त्यांना त्यांनी पोटभऱ्या कीर्तनकार होऊ नको असे सांगितले यावरून त्यांच्या अशा विधानावरून असे लक्षात येते की नुसते ज्ञान पाजळत बसण्यापेक्षा ते लोकांच्या मनावर बिंबले पाहिजे .लोकांना पटले पाहिजे, आपल्या ज्ञानाचा उपयोग फक्त पोट भरण्यासाठी न करता लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे अशा मताचे गजानन महाराज यांनी खूप उपदेश केले.
गजानन महाराजांची भ्रमंती | gajanan maharajanchi bhramanti
गजानन महाराज हे शेगाव या ठिकाणी बत्तीस वर्षे जरी राहिले असले तरी अनवाणी शेगावच्या परिसरात फिरत असून अनेक ठिकाणी महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना भ्रमंती करावी लागली होती. दरवर्षी ते पंढरपूरला वारीला जात असत.
नाशिक त्रंबकेश्वर याठिकाणी जात, नीलंबिका डोंगर याठिकाणी जाऊन येत. तसेच ब्रह्मगिरी डोंगरावर जात , एवढ्या अवघड, कठीण असा जो डोंगर आहे ते सहजतेने चढून जात होते. त्याठिकाणी असलेले गहिनीनाथ गुफा व निवृत्तीनाथ महाराज मंदिर या ठिकाणी ते आवर्जून भेट देत होते. म्हणजेच नाथ संप्रदाय यांनी चमत्कार करून दाखवले किंवा केले ते त्याच पद्धतीचे चमत्कार गजानन महाराज यांनी करून दाखवले आहेत म्हणजे नाथ संप्रदायाशी त्यांच्या विचाराशी योग जुळून येत आहे असे दिसते.
गजाजन महाराजांची मंदिरे| gajanan maharajanchi temple
गजानन महाराज यांची मंदिरे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असलेले दिसून येतात 1967 पासून पालखीच्या माध्यमातून खेडोपाडी त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. पंढरपूरला देहू आणि आळंदी या ठिकाणच्या पालख्या जातात, तसेच शेगाव या ठिकाणची पालखी महत्त्वाची मानली जाते .या पालखीसोबत लाखो भक्त त्यांच्यासोबत असतात.
1908 रोजी त्यांची ओळख सर्वदूर पसरल्यानंतर त्यांनी गजानन महाराज संस्थान शेगावात प्रथम सुरू केले. त्या ठिकाणी नवीन ट्रस्ट स्थापन केले. त्यामुळे त्यांचा महिमा सगळ्या महाराष्ट्रभर पसरला गेला. लोक त्या ठिकाणी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणजेच अध्यात्मिक भौतिक या गोष्टीची गरज भागवण्यासाठी त्याठिकाणी येत होते. हे मंदिर गावाच्या मधोमध असून काळा पाषाणाने हे मंदिर बांधले आहे. समाधी ही मंदिराच्या गुहेत आहे, वरच्या बाजूस राम, लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती आहेत असे मंदिर त्याठिकाणी असलेले दिसते.
असे आपल्या साध्या वेशात राहणारे गजानन महाराज एक अलौकिक असे ब्रह्मतत्त्व असलेले महान विभूती होते .त्यांचे अनेक भक्त असलेले दिसून येतात .त्यांची विरक्ती भूमिका ही ब्रह्मतत्त्व असलेले दिसून येते .दिगंबर अवस्थेत असणारे महाराज भक्तांचा उद्धार करणारे महान संत होऊन गेले .त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन!