Google ads

Ads Area

.श्रीकृष्ण सरस्वती माहिती| shrikrushna sarasvati mahiti


श्रीकृष्ण सरस्वती माहिती| shrikrushna sarasvati mahiti

श्रीकृष्ण सरस्वती माहिती
                   श्रीकृष्ण सरस्वती माहिती

श्रीकृष्ण सरस्वती माहिती (toc )

श्रीकृष्ण सरस्वती जयंती निमित्ताने त्यांच्याविषयी माहिती जाणून घेणं महत्त्वाचे आहे .
कोण होऊन गेले हे श्रीकृष्ण सरस्वती त्यांची आज जयंती पण अनेकांना त्यांच्या कार्याचा म्हणजेच त्यांची सांप्रदायिक म्हणून ख्याती कशा पद्धतीने पसरली आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी आपन त्यांच्या कार्याची माहिती पाहूया .
           कोणत्याही काळात एखादा महात्मा जन्माला आला की त्यांच्या इतिहासाची माहिती आपल्याला असलीच पाहिजे ,श्रीकृष्ण सरस्वती महाराज यांच्या जीवनातील प्रसंग हे ज्या  काळात असले तरी त्यांचा उद्धेश हा जगतउद्धार करणे हाच असतो .सर्वसामान्य व्यक्तीसारखे जीवनमान जगत असले तरी त्यांच्या विचारांचा आणि भक्तीचा महिमा हा फार मोठा असतो.हे आपण अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि त्यांचे समकालीन स्वामी श्रीकृष्ण सरस्वती ह्यांच्या जीवनमानावरून आपणाला समजते.

श्रीकृष्ण सरस्वती यांचे बालपण | shrikrushna sarasvati balapan


 आई  -अन्नपूर्णा

 वडील - आप्पा भटजी
भारद्वाज ब्राह्मण असल्याने ते लोकांचे पंचांग चांगले बघत होते.
गुरु :स्वामी समर्थ अक्कलकोट
कार्यकाल : १८३६ ते १९०० असा .
संप्रदाय : दत्त संप्रदाय होता 

आप्पा भटजी आणि अन्नपूर्णा यांना लग्न झाल्यापासून बरीच वर्षे मूल झाले नाही .ते दोघे दत्त भक्त होते प्रत्येक महिन्याला पौर्णिमा आली की ते नरसोबाची वाडीला न चुकता जात .त्यांच्या पत्नीचा अट्टहास होता की घरात सगळे सुख आहे पण मूल नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली आणि म्हणाल्या की तुम्ही देवासमोर आपल्याला मूल होत नाही तर त्यांच्या कृपेने मूल होईल तरी तुम्ही त्यांना मूल होऊ दे असे देवासमोर बोला असं अन्नपूर्णा म्हणाल्या .
         आप्पा भटजी यांनी आपल्या पत्नीची ही इच्छा जास्त मनावर घेतली नाही .कित्येक दिवस गेले तेव्हा त्यांनी देवासमोर आपली इच्छा मांडली आणि त्या इच्छेनुसार त्या रात्री देव स्वप्नात येऊन असे म्हणाले की , "मीच तुझ्या पोटी जन्म घेणार आहे ".असे स्वप्नात येऊन सांगितल्यावर त्यांनी पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावर स्नानसंध्या केली आणि घरी गेल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला हा सगळा वृत्तांत सांगितला. पत्नी खूप खूष झाली .त्यानंतर तीन महिन्यांनी त्यांना समजले की अन्नपूर्णाच्या पोटात मूल वाढत आहे .
      त्यांना एक तेजस्वी रत्न प्राप्त झाले त्याचे नाव कृष्णा ठेवले तेच श्रीकृष्ण सरस्वती होय .
         
 

श्रीकृष्ण सरस्वती कुंभारस्वामी म्हणून ओळख :shrikrushna saraswati kumbharswami olakh


      कृष्णा हे मौजीबंधन होईपर्यंत काहीच बोलले नाहीत.नंतर तर ते कुलदैवत म्हणून खंडोबा या ठिकाणी गेले होते .त्यांच्या आज्ञाने ते अक्कलकोटचे स्वामी यांना भेटायला गेले . 
        तीन दिवस पायी प्रवास करुन त्यांनी अक्कलकोट गाठले आणि स्वामींना खूप आनंद झाला आणि त्यावेळी स्वामी म्हणाले की  " मी तुझीच वाट बघतोय " अशा प्रसंगी दोघांना अत्यानंद झाला .स्वामींनी कृष्णाला एका रानात घेऊन गेले तेथे त्यांनी कृष्णावर आपली कृपा केली .कृष्णा स्वामींचा तेजपुंज चेहरा ,त्यांच्याकडे असलेले सामर्थ्य यामुळे मोहीत झाला .त्यावेळी स्वामी म्हणाले " तू आणि मी एकच आहोत , आपण जगाच्या कल्याणासाठी आलो आहोत .लोकांमध्ये वेडे बनून राहायचे आणि आपली मर्यादा राखायची आपली नीतिमत्ता सोडायची नाही .आपला ज्यासाठी जन्म झाला आहे त्यासाठी आपला जो हेतू आहे तो साध्य करायचा .लोकांनी वेडे म्हणले तरी त्याचा विचार करायचा नाही ." अशा शब्दात स्वामींनी कृष्णाला सांगितले . जे जे भक्ती करतील त्यांना आलेल्या कठीण प्रसंगातून तारावे. 
      तीन दिवस त्यांच्या संवादाचा योग आलेला होता आता तू कोल्हापूर या ठिकाणी जाऊन कुंभार आळीत राहावे असे सांगितले . स्वामींनी श्रीगुरूकृष्ण असे नाव ठेवले .
 कोल्हापूर याठिकाणी जाऊन राममंदीर याठिकाणी राहिले नंतर फडणवीस यांच्या घरात राहिले.
    ताराबाई शिर्के दत्त भक्त होत्या. प्रत्येक पौर्णिमेला  नरसोबावाडीची वारी करत असत . एकदा स्वप्नात दृष्टांत दिला आणि बोलले "तुझ्या घरी येईल. " याप्रमाणे  ताराबाई शिर्के ह्या आपला घोड्याचा रथ घेऊन कृष्णाला आणण्यासाठी गेल्या .ह्या कुंभारआळीत रहात होत्या कृष्णा सुद्धा तेथेच राहिले म्हणून त्यांच्या गल्लीवरुन त्यांना कुंभारस्वामी स्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले होते .

 भगवंताचे कृपा कार्य :


 ज्यावेळी कृष्णा यांचा जन्म झाल्यापासून काहीच बोलले नव्हते मात्र , अनेक दिवसांनी बोलले कुलदैवत खंडोबा यांच्या दर्शनाची ओढ लागली होती आईची परवानगी घेऊन खंडोबाच्या दर्शनाला गेले खंडोबा प्रसन्न होऊन कृष्णाला सांगितले की अक्कलकोट या ठिकाणी जाऊन स्वामी समर्थ यांची भेट घ्यावी कृष्णाला अत्यानंद झाला. घरी आला, घरी आल्याचे पाहून आई वडील खूप आनंदी झाले पण पुन्हा स्वामींकडे जाणार म्हणून पुन्हा नाराज झाले आईच्या परवानगीने अक्कलकोट या ठिकाणी जाण्यास निघाले तीन दिवस पायी प्रवास करून त्यांनी स्वामींची भेट घेतली स्वामी कृष्णाला म्हणाले तू मी एकच आहोत तूच माझा अंश आहे अशा शब्दात त्यांनी कृष्णाला विचार सांगितला, त्यांनी मोलाचा सल्ला दिला की  आपण अवतार घेतला आहे तो पूर्ण करायला पाहिजे या जगाचा उद्धार करायचा. आपणाला लोकांनी वेडे म्हणावे तू इथून जा आणि कोल्हापूर या ठिकाणी करवीर नगरी येथे आपले वास्तव्य करा अशा पद्धतीने भगवंताची कृपा त्यांना झाली.

ताराबाई शिर्के यांची निष्ठा  tarabai shirke yanchi nishtha


ताराबाई शिंदे ह्या  दत्तभक्त होत्या.  प्रत्येक पौर्णिमेला नरसोबाची वाडी या ठिकाणी जात एक दिवस मुक्काम करून दुसऱ्या दिवशी येत होत्या एक दिवस त्यांना पोटशूळ झाले होते त्यावेळी त्यांच्या स्वप्नात दत्त त्यांनी मी कोल्हापुरातच आहे . मी येईन असे सांगितले ताराबाई शिर्के यांनी आपल्या सोबत घोडागाडी घेऊन कृष्णाकडे गेल्या त्या ठिकाणी कृष्णाला घेऊन आपल्याबरोबर आल्या. कृष्णा त्याठिकाणी जवळ जवळ पंचवीस-तीस वर्षे राहिला ती आळी म्हणजे कुंभारआळी होती. तिथेच  वेश्यावस्ती  होती ,त्या ठिकाणी कृष्णाने लोकांना भक्तिमार्ग शिकवला पण काही लोकांनी ताराबाईंच्या घरातुन त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला, पण कृष्णाने सांगितले की ताराबाई यांची हनुमान भक्ती खूप आहे या भक्तीतून मला बाहेर येता येत नाही भक्तीने मला जोडले आहे मला यातून सुटका करता येत नाही असा स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला तेव्हापासून ते कृष्णाला ताराबाईच्या घरातून हाकलण्याचा नाद सोडून दिला. कृष्णा ताराबाईंच्या घरी पंचवीस ते तीस वर्ष राहिले.


श्रीकृष्ण सरस्वतीचे वैराग्यमठ|shrikrushna sarasavatiche vairagyamath


कृष्णाचे अवतारकार्य संपल्यावर त्यांनी आपला देह 20 ऑगस्ट 1900 रोजी सोडला. वैराग्य मठात त्यांची समाधी आहे ,भक्तांच्या सोईसाठी तेथून जवळच दुसरी मठी तयार करण्यात आली ही गंगावेस या ठिकाणी आहे .वैराग्यमठी ही  चालत दहा मिनिटाच्या अंतरावर आहे त्यांचे शिष्य व्यास यांनी या दुसऱ्या मठाला स्थापना केले म्हणून या मठीला व्यासमठी असेही म्हटले जाते

 दत्तात्रय यांचे अवतार| dattatrya yanche avatar


दत्तात्रयांचे अवतार अनेक आहेत त्यापैकी लोकांमध्ये असा समज आहे म्हणजेच असे श्रद्धा आहे की दत्ताचे चार अवतार आहेत त्यांचा चौथा अवतार म्हणजे कृष्णा सरस्वती दत्त  महाराज होय)
1 श्रीपाद श्रीवल्लभ
2 )नृसिंह सरस्वती
3) स्वामी समर्थ अक्कलकोट 
4 )कृष्ण सरस्वती दत्त गुरु महाराज

श्रीकृष्ण सरस्वतींचा शिष्य परिवार  | shrikrushna sarasvatincha shishya parivar


कृष्णा सरस्वती यांचे अनेक भक्त निर्माण झाले त्यांच्या विचाराचा आणि सांप्रदायिकतेचा प्रसार  करीत . या शिष्य मंडळींनी त्यांच्या विचारांचा प्रसार केलेला आहे त्यापैकी त्यांचे शिष्य ...
कृष्णा लाड, 
वासुदेव दळवी, रामभाऊ 
रामभाऊ फारीक, 
महाद्वार वेणीमाधव (रांगोळी महाराज)  
 व्यास बाळकृष्ण
राशी घोडेकर, 
महादेव भट नामदेव महाराज 
आनंद सागर
 माधवराव टिकेकर 
यांनी संप्रदायाची दीक्षा घेतली.
 नानासाहेब गद्रे, नाना परांजपे ,ज्ञानेश्वर काटकर यांनी  स्वामींच्या संप्रदायाचा प्रसार करण्याचे कार्य केले.

कृष्णा सरस्वती महाराज यांचे मठ| shrikrushna sarasvatiche math


1) वैराग्यमठी कृष्णा तारा निवास दत्त गल्ली,कोल्हापूर. महाद्वाराजवळ, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर.
2) व्यासमठी गंगावेस कोल्हापूर, 
3) नामदेव महाराज मठी, शुक्रवार पेठ कोल्हापूर .
4) श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज मंदिर श्री जयसिंग पवार यांच्या घरी उत्तरेश्वर चौक कोल्हापूर .
5) स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा,रायगड, मुंबई .
6) श्रीकृष्ण सरस्वती सेवा मंडळ बद्रीनाथ अपार्टमेंट शिवाजीनगर दहिवली कर्जत रायगड.
7) श्रीकृष्ण सरस्वती सेवा मंडळ दगडी बंगल्यासमोर नेरळ, रायगड.

 श्रीकृष्ण सरस्वती यांचे कार्य खूप मोलाचे आहे .त्यांच्या कार्याचा सगळ्यांना परिचय होणं महत्त्वाचं आहे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा योग आला .
 आपल्या महाराष्ट्रात अनेक महात्मे होऊन गेले त्यांचा परिचय होणं महत्त्वाचे आहे . 
श्रीकृष्ण सरस्वती या महात्म्याने आपल्या शिष्यांना भक्ती मार्ग दाखविला त्यांचे आजही अनेक भक्त आहेत त्यांच्या कार्याचा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला जातो .दत्ताचे चौथे अवतार म्हणून यांचा उल्लेख केला जातो . तसेच स्वामी समर्थांचे शिष्य म्हणून त्यांचा उल्लेख आणि त्यांच्या विचाराचे कार्य श्रीकृष्ण सरस्वती यांनी पुढे चालविले .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area