छत्रपती शिवाजी महाराज मराठीत माहिती | chhatrapti shivaji maharaj mahiti
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जाणता राजाची माहिती जाणून घेऊया. जाणता राजा म्हटला की जनतेचा राजा असे ,त्यांच्याबद्दल असे उदगार निघतात शिवाजी महाराज यांची ख्याती संपूर्ण जगात पसरलेली आहे ,असे जरी असले तरी एक उत्तम द्रष्टा राजा, उत्तम व्यवस्थापक, कुशल संघटक, लष्करी व्यवस्था, चारित्र्यसंपन्न ,धाडसी ,उत्तम रणनीती ,सर्व धर्मसमभाव असे सगळे गुण असणारा राजा म्हणजे सगळ्यांचा राजा होय.
शिवाजी महाराज यांनी आपल्या नेतृत्वगुणात कुशल आणि दूरदृष्टी ठेवून असणारे राजे होते.अनेक राजे होऊन गेले पण शिवाजी महाराज हे सगळ्यांच्या मनावर राज्य करून गेले.
आज शिवाजी महाराज नसते तर आपल्या राज्यावर कोणते संकट आले असते याची कल्पनाच करवत नाही. महाराज होते म्हणून आजची स्त्री सुरक्षित आहे आणि आपणही धर्म संकटापासून सुरक्षित आहोत याची प्रचिती कायम लक्षात राहते.
शिवाजी महाराज होते म्हणून आज कुशल अभियंता, उत्तम व्यवस्थापक, उत्तम नियोजन, उत्तम नेतृत्वगुण स्थापत्यशास्त्र, आर्थिक नियोजन, दूरदृष्टी, युद्धकौशल्य या सगळ्या गुणांचा सगळ्या स्तरातील लोक आपल्या कामामध्ये वापर करत आहेत.
म्हणून त्यांचे शिवजयंतीनिमित्त रूप आठवावे आणि त्यांच्या काही गुणांचा आपल्यामध्ये अंगीकार व्हावा म्हणून आपण त्यांच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेत आहोत.
★◆●■★◆●◆★●◆★♀♂★●◆■■◆●■★■◆
शिवाजी महाराज यांचे बालपण shivaji maharajyanchebalpan
त्यांचा जन्म जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. त्यांच्या जन्माविषयी अनेक मत-मतांतरे असलेली दिसून येतात पण काही संशोधनानुसार 19 फेब्रुवारी 1930 हीच तारीख ग्राह्य मानली आहे .
त्यांचे बालपण जिजामातेच्या सानिध्यात गेले त्यांच्या आई रामायण व महाभारत व पौराणिक कथा सांगत असत शूरवीरांच्या गोष्टी ऐकत असतानाच त्यांच्यामध्ये वीरश्री अंगात घुसत असे .
लहानपणीच त्यांना कुस्ती खेळणे, भाला फेकणे,लपंडाव , दांडपट्टा चालवणे, किल्ले बनवणे यासारखे अनेक खेळ खेळत होते.
★◆★●◆★★◆●●■★●◆★★◆●●■★◆●■★■●●
महाराजांची वंशावळ shivaji maharajanchi vanshaval
- वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले
- आईचे नाव जिजाबाई जिजाबाई शहाजी भोसले
- शहाजीराजांना दोन पत्नी होत्या एक जिजाबाई, दुसरी तुकाई
- शिवाजीचा सावत्रभाऊ व्यंकोजी भोसले
- महाराजांना दोन मुलगे होते ,एक संभाजी महाराज दुसरे राजाराम महाराज
- सहा मुली होत्या
- =======★=====★======★=======★★
अष्टप्रधानमंडळ | ashtaprdhanmanda
इ .स .1676 रोजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता त्यासाठी आठ मंत्री नेमण्यात आले होते.
त्यांचे कर्मानुसार 30 विभाग करण्यात आले तर त्यांच्या मदतीसाठी 600 कर्मचारी काम करत होते.
राज्याभिषेकाच्या वेळी जे आठ मंत्री नेमण्यात आले होते त्यांच्या कर्तबगारीनुसार अधिकार बहाल केले होते.
1) मुख्य प्रधान - मोरोपंत पिंगळे
2) सेनापती- हंबीरराव मोहिते
3 ) अमात्य - रामचंद्र नीलकंठ पंडित
4 ) प्रधान - रघुनाथ पंडितराव
5 ) सचिव - अण्णाजी दत्तो पंडित
6 ) सुमंत - जनार्दन पंडित
7) मंत्री - दत्तो त्रिमल
8 ) न्यायाधीश - बाळाजी पंडित
यांची निवड त्यांच्या कामगिरीवरुन केली होती. या आठ जणांवर महत्त्वाची कामगिरी सोपविण्यात आली होती त्यांच्या अधिकाराखाली आपापल्या विभागाचे कामकाज करावे लागणार होते यासाठी 600 कर्मचारी निवडण्यात आले होते .
†***★★★★★*********★★★★********
शिवाजी महाराजांचे मावळे | shivaji महाराजांचे mavale
शिवाजी महाराजांचे मावळे हे अतिशय धाडसी, विश्वासू, काटक आणि सर्व धर्मातील असून कोणी कोणावर जातीपातीचे बंद लादत नव्हते. महाराज दुजाभाव करत नव्हते.
सगळे मावळे समान आहेत अशाच पद्धतीने त्यांच्याशी प्रेमाने वागत .मावळेही अतिशय शूरवीर होते ,त्यांना गनिमीकाव्याने लढण्याची असो किंवा हातघाईची लढाई असो किंवा अत्यंत कठीण प्रसंग उभा राहिलेला असो जीवाची बाजी करुन ते अतिशय दुर्गम अशा डोंगराळ भागातील एखादा किल्ला आपल्या ताब्यात घेण्यासाठी नेहमी सज्ज होते .
त्यामुळे महाराजांनीही कमी मावळे असूनही त्यांच्या स्वराज्य स्थापनेत सुमारे 400 किल्ले होते.
@★★★@@&&★★&#####@@@★★■■■∆∆∆
शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक| shivaji maharajanche margadarshk
महाराज नेहमी मोठ्यांचा आदर करत असत त्यामुळे स्वतःच्या निर्णयाबरोबरच मोठ्यांचा सल्ला ते आदराने स्वीकारत होते .
- आपल्या वडिलांकडून युद्धाचा अभ्यास युद्धकौशल्य, राज्यकारभार कसा पाहावा वडिलांकडून शिकायला मिळाले .
- दादाजी कोंडदेव यांनी न्याय व्यवस्था कशी करावी याचे मार्गदर्शन केले.
- त्यांच्या आईसाहेब जिजामाता यांनी शिस्तीचे धडे दिले. रामायण महाभारत सांगून त्यांच्यात वीरश्री निर्माण केली .
- संत रामदास स्वामी यांच्याकडून राज्यकारभार कसा पहावा हा गुण गुण आत्मसात केला ,
- संत तुकाराम महाराज यांच्याकडून समभाव हा गुण शिकायला मिळाला .
- ■★■★■★¥¥¥¥■★★●◆◆◆◆★★■■●■★
शिवाजी महाराजांचा गनिमी कावा | shivaji maharajancha ganimi kava
शिवाजी महाराज यांनी गनिमीकाव्यातून अनेक किल्ले आपल्या स्वराज्यात जोडले महाराजांकडे कमी सैनिक असूनही किल्ले जिंकणे अवघड काम होते.
त्यासाठी गनिमीकावा हेच त्यासाठी उत्तम माध्यम शिवाजी महाराजांनी निवडले होते त्यातच मावळे सुद्धा खूप तरबेज होते त्यामुळे हे सगळे शक्य झाले.
<>>>>>><<<≤★■★◆■★>>>>>><<<>>>><<>>
शिवाजी महाराजांचे गुप्तहेर | shivaji maharajanche guptaher
राज्यकारभार करण्यासाठी केवळ ताकद असून चालत नाही .सरळमार्गी असूनही चालत नाही त्यामुळे जिवास धोका पण होऊ शकतो म्हणून अनेक कामगिऱ्या पार पाडण्यासाठी गुप्तहेर आवश्यक असतात, त्यापैकी बहिर्जी नाईक हे शिवाजी महाराजांचे विश्वासू गुप्तहेर होते.
त्यांनी प्रसंगानुरूप अनेक कला आत्मसात करून दिल्लीपर्यंत आपले गुप्तहेर पसरवले होते .महाराज कोणत्या कुठे जाणार ,माघारी कसे येणार यासाठी जाण्याचा मार्ग ,बाहेर पडण्याचा मार्ग, याविषयी सगळ्या गोष्टींचा खडानखडा माहीत असलेले गुप्तहेर होते.
शिवाजी महाराजांचे आग्र्याहून सुटका याच माध्यमातून झाली. ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याला जायला निघाले त्यावेळी एक महिना अगोदर 300 ते 400 गुप्तहेर वेगवेगळ्या वेशांमध्ये त्या ठिकाणी पोहोचले होते.
सुरतेची लूट तेथील इत्यंभुत माहिती अगोदरच त्यांना समजत होती . याच्यात जर कोणी दगाबाजी केली तर त्यास कडेलोटाची शिक्षा दिली जात असे त्यामुळे अतिशय प्रामाणिक आणि विश्वासाने गुप्तहेर खाते चालत असे .
★■◆■★★◆◆■★■■■◆◆■★★★★◆★★★
शिवाजी महाराजांचे विश्वासू कार्यकर्ते| shivaji maharajanche vishvasu karyakrte
राजा कार्यकुशल असून उपयोग नसतो आपले सहकारी कार्यशील लागतात त्यांच्या पराक्रमामुळे महाराजांना स्वराज्य स्थापनेची इच्छा पूर्ण झाली. हे निष्ठावान कार्यकर्ते महाराजांना मिळाले म्हणूनच स्वराज्य स्थापनेची घडी पूर्ण झाली .
प्रत्येक प्रसंगी एखादा दुसरा कार्यकर्ता जीव गेला तरी त्याची पर्वा न करता आपल्या प्राणाची आहुती देण्यास सज्ज होते. अशा विश्वासू कार्यकर्त्यांमुळे महाराजांना अनेक मोहिमा सर करता आल्या. त्यांची नावे पुढीलप्रमाणे ....
- बाजीप्रभू देशपांडे
- बहिर्जी नाईक
- शिवा काशिद
- संताजी घोरपडे
- कोंडाजी फर्जंद
- कान्होजी जेधे
- येसाजी कंक
- प्रतापराव गुर्जर
- लायजी पाटील
- हिरोजी इंदलकर
- रामजी पांगेरा
- मुरारबाजी
- नेताजी पालकर
- सुर्यराव काकडे
- फिरंगोजी नरसाळा
- कांहोजी अँग्रे
इत्यादी निष्ठावान कार्यकर्ते शिवाजी महाराजांना मिळाले आणि स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवता आली.
$$$$$$■■□■■■■■■★★★★★●●●●●●●■■●◆★
शिवाजी महाराजांकडे असलेले किल्ले | maharajanche asale kille
शिवाजी महाराजांना आपल्या कारकिर्दीत जवळजवळ 400 गड किल्ले जिंकून घेतले होते आदिलशाही आणि निजामशाही यांचा नेहमी त्रास सर्वसामान्य जनतेला होत असल्याने जनता त्यांच्या त्रासास कंटाळली होती.
त्यामुळे शत्रूच्या ताब्यातील किल्ले आपल्या ताब्यात असणे महत्त्वाचे वाटत असल्याने त्यासाठी आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना पाठवून गनिमीकावा किंवा हातघाईची लढाई करुन किल्ले ताब्यात घेतले. शिवाजी महाराजांकडे महत्त्वाचे किल्ले जे होते त्यांची नावे पुढीलप्रमाणे ...
- शिवनेरी
- रायगड- राजधानी व शिवराज्याभिषेक
- राजगड
- तोरणा
- सिंहगड
- प्रतापगड
- मुरुड जंजिरा
- सिंधुदुर्ग
- तिकोना किल्ला
- राजमाची किल्ला
हे महत्वपूर्ण किल्ले महाराजांकडे होते.
★★★★★●◆◆★★★★★★★●◆■★●★★★★
शिवाजी महाराजांची गुणकौशल्ये shivaji महाराजांची gunkaushalye
1 ) आर्थिक नियोजन
महाराजांकडे महाराजांकडे असणाऱ्या महत्त्वाचा गुण म्हणजे आर्थिक नियोजन म्हणजेच नियोजन व्यवस्था हा गुण त्यांच्याकडे उत्तम होता.
कोणत्या प्रसंगी किती खर्च आणि पुढे किती शिल्लक राहील याचे नियोजन केलेले असायचे .
लढायला जाण्याच्या अगोदर सैन्याला चार महिन्याचा पगार अगोदरच दिला जात असे जेणेकरून काही बरेवाईट झाले तरी त्यांच्या कुटुंबाला आधार म्हणून दिले जात असे
2) युद्ध कौशल्य
सैन्यांचे संख्या मुबलक असून उपयोग नसतो थोडेच असले तरी युद्धकौशल्य माहीत असल्याशिवाय कोणताही किल्ला सर करता येत नाही.
हा गुण महाराजांकडे होता त्यांच्याकडे शिस्तबद्ध लष्कर होते त्यांनी केलेली रणनीती त्यांच्या मोहिमेस लाभदायी ठरत होती
3) न्यायव्यवस्था
शिवाजी महाराज समानतेची वागणूक देत असत. सगळ्यांना सारखाच न्याय दिला जात असे त्यामुळे सैन्यांमध्ये जीवाला जीव देणारे सैनिक महाराजांना मिळाले कोणी कोणावर अन्याय करणार नाही अशी शासनव्यवस्था दरबारात होती.
4 ) सर्वधर्मसमभाव
हा त्यांचा चांगला दृष्टीकोन होता. त्यांनी आपल्या कारकीर्दीत खूप मोठ्या मोहिमा केल्या आहेत त्यातून सहीसलामत बाहेर पडतील याची शाश्वती नसताना, तरीही त्यांच्याकडे असलेला संयम, चातुर्य, धाडस, दूरदृष्टी यामुळे कठीण प्रसंगातूनही निसटले.
त्यांच्या दरबारी सर्व जातीधर्माचे लोक होते .प्रत्येक व्यक्ती त्यांच्या मदतीला धावून आलेले दिसते ,यातूनच त्यांची सर्वधर्मसमभाव हा दृष्टिकोन असलेला दिसतो .
5 ) प्रसंगावधान
हा महाराजांचा महत्त्वाचा गुण होता . त्यांनी जीवाची बाजी करून कठीण प्रसंगाला तोंड दिले आणि त्यातून बाहेर पडलेही असे प्रसंग पाहू ...
- अफजल खानाचा वध हा प्रसंग खूप कठीण होता
- आग्र्याहून सुटका आहे मृत्यूच्या दाढेतून आपली सुटका करून घेतली
- सुरतेची लूट
- पन्हाळा गडाचा पराक्रम
- पुण्यात शाहिस्तेखानाची केलेली फजिती
हे सगळे प्रसंग करत असताना आपल्या जीवाचा ही विचार न करता मोठ्या धैर्याने सामोरे गेले.
6 ) चारित्र्यसंपन्न
महाराजांकडे हा खूप महत्त्वाचा गुण होता ज्याचे चारित्र्य निष्कलंक असते त्यांना कोणतीही गोष्ट अशक्य नसते हे महाराजांच्या उदाहरणावरून सांगता येते.
त्यांच्या राज्यकारभारात कोणत्याही स्त्रियांवर अन्याय होत नसे जर असे झाले तर कठोर शिक्षा दिली जात असे त्यामुळे त्यांचे राज्य सगळ्यांसाठी सुरक्षित होते. हे केवळ चारित्र्यसंपन्नच व्यक्ती करु शकते .
असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव म्हणून संपूर्ण जगात जयंती साजरी होणार आहे .जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्यातील एखादातरी गुण आत्मसात करावा .
महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि खरोखरच आपणाला एक आदर्श राजा ज्या मायभूमीत अवतरले त्याच मायभूमीत आपण जन्मलो याचा सार्थ अभिमान वाटला पाहिजे .
आपण त्यांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे. त्या विचारांना खतपाणी घातले पाहिजे .नवीन येणाऱ्या पिढीला हे विचार देणे गरचेचे आहे . अशा महान राजास अभिवादन !
आणखी माहिती बघा
जय भवानी !जय शिवाजी
स्तुत्य उपक्रम.... खुपच छान...
उत्तर द्याहटवाखूप छान
उत्तर द्याहटवा