Google ads

Ads Area

गुरूचे जीवनातील स्थान | guruche jivnatil sthan

            

गुरूचे जीवनातील स्थान  | guruche jivnatil sthan

गुरूंचे जीवनातील स्थान
गुरूंचे जीवनातील स्थान


गुरुचे महत्त्व (toc)

खूप मोलाचे असते . गुरु आपल्याला अंधकारमय जीवनातून ज्ञान काढून त्यांना सन्मार्गाला लावण्याचे काम करत असतात.गुरु नेहमी आपल्या भक्तांना घडविण्याचा प्रयत्न करत असतात .संस्कार देऊन नेहमी त्यांच्यावर आपल्या कृपेची छाया ठेवत असतात .
          
        गुरूंना आपल्या भारतीय परंपरेत खूप महत्त्वाचे स्थान असलेले दिसून येते .गुरु नेहमीच शिष्याला आपल्याकडून भरपूर देण्याचा प्रयत्न करत असतात .शिष्यही त्यांनाच सर्वश्रेष्ठ समजून त्यांच्यावर अपार प्रेमपूर्वक निष्ठा ठेवून त्यांना समाधानी ठेवत असतात .
          
          शिष्य केवळ गुरूंना खूष ठेवून त्यांच्याकडून दीक्षा घेतात असं काही नाही .त्यासाठी त्यांना कष्ट घ्यावे लागतात .गुरुदीक्षा घेण्यासाठी अनेक परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागत असतात .गुरु हे शिष्याचा अंदाज घेऊनच आपल्या दीक्षा देऊन गुरुदक्षिणा मागत असतात . हे सगळ्यांना माहीतच आहेच तरीही त्यांचे जीवनातील महत्त्व आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचे आहे 

 गुरुची  संकल्पना समजून घेऊ | guruchi sankalpana samjun gheu


            गुरू म्हणजे शिष्याच्या जीवनातील अंधकार म्हणजेच अज्ञान नष्ट करण्याचे काम गुरू करत असतात. शिष्याला घडवण्याचे काम हे गुरु करत असताना आपल्या सगळ्या इच्छा शिष्याला सांगत असून त्यांच्या इच्छा म्हणजे शिष्याने अपार श्रद्धा ठेवून एकनिष्ठेने विद्या शिकावी हाच त्यांचा उद्धेश असतो . हे शिष्याला मान्य झालेले असते .म्हणून ही दीक्षा घेण्यासाठी गुरुगृही जाऊन किंवा आश्रमात जाऊन घेण्याची प्रथा होती .हीच प्रथा अजूनही असलेली दिसते .
           आजच्या कलियुगात  गुरुशिष्य यांचे नाते आधुनिक काळातील असल्याने थोडा बदल झालेला दिसून येईल .शिक्षणाची माध्यमे बदललेली आहेत .ह्या बदलाचा विचार करता ,सगळयांना हवं तसं आणि कोणतेही शिक्षण घेता येऊ लागले आहे .
           गुरुंची जागा आता मास्तर त्यानंतर गुरुजी यांनी घेतली आहे. गुरुजी म्हणेपर्यंत ठीक होते आतातर सर ह्याच नावाने गुरूंना बोलविले जाते .काहींना तर सर न म्हणता  टीचर हा शब्द आलेला आहे .गुरु हा केवळ बोलण्यापुरताच शब्द राहिला आहे .म्हणजेच आताच्या मुलांना गुरु म्हणलं की कोणीतरी साधू ,ऋषी ज्यांनी भगवी कपडे परिधान केलेली आहेत असेच लोक म्हणजे गुरु होते . आज आम्ही शिकतो ते शिकविणारे गुरु नसून सर आहेत हीच संकल्पना त्यांच्या मनात पक्की बसली आहे .
  

 गुरुचे जीवनातील महत्त्व  | guruche jivnatil mahttva


          गुरु जर नसतील तरआपले जीवन हे गुरांसारखे होईल हे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे ,नाहीतर ही गुरुपरंपरा नष्ट होईल . गुरु हा आधुनिक काळातील असो किंवा प्राचीन काळातील, गुरु हा गुरु असतो. गुरुची संकल्पना ही जरी बदलली असली तरी आजच्या काळात गुरूंना खूप महत्त्व आहे. 
             आज  बदलत्या परिस्थितीनुसार आपण गुरूंना सर किंवा टीचर म्हणत असलो तरी ज्ञानदान करण्याचे काम सगळेच करत आहेत त्यामुळे गुरुचे महत्त्व कमी होत नाही. सर म्हणले तरी ते ज्ञान देतच असताJत म्हणून आपल्या जीवनात गुरूंना खूप महत्त्व असलेले दिसते त्याशिवाय आपण घडत नाही हे ज्यांना कळाले ते थोर पदी जाऊन पोहोचले. ज्यांना गुरुचे महत्व समजले नाही ते जीवनात भरकटलेले दिसत असतात. त्यांच्यावर जेवढी श्रद्धा ठेवू तेवढा आदर ठेवून त्यांची सेवा प्रेमाने करू तेवढी आपल्याला दीक्षा मिळत असते म्हणजेच हे सगळे गुरुंवर निष्ठा ठेवून आपण त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याचे काम करत असतो.
            आपल्या जीवनात पहिला गुरु म्हणून आईला श्रेय जाते त्यानंतर आपले शालेय जीवनातील शिक्षक हे आपले गुरु असतात त्यानंतर मित्रपरिवार आणि त्याच्याही नंतर समाजातील सर्व घटक हे काही ना काही तरी आपल्याला ज्ञान देण्याचे काम करत असतात म्हणून हे सगळे आपल्याला नकळतपणे घडवण्याचे काम करतात म्हणून हेच आपले खरे गुरु असतात.
             मग प्राचीन काळातील ऋषीमुनी यांनी जे ज्ञान दिले ते आजही आधुनिक काळात दिले जाते फक्त त्याचे स्वरूप बदलले आहे याचा मात्र आपण स्वीकार करणे गरजेचे आहे म्हणून आपल्या जीवनात गुरूंना खूप महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे.

  गुरुपरंपरा अशी होती | guruparmpra ashi hoti

         
             गुरुपरंपरा हे प्राचीन काळापासून आजपर्यंत चालूच आहे हे परंपरा आपण कशा पद्धतीने होती ते बघणार आहोत भगवंतांनी ज्यावेळी अवतार कार्य घेतले त्या त्या वेळी शिष्य म्हणून त्यांनी गुरूंची सेवा मनोभावे केली आणि आजही समाजाला आदर्श घालून दिला दिला की गुरुपरंपरा ही जपली पाहिजे आणि गुरूंवर जेवढी निष्ठा ठेवाल तेवढे ज्ञान मिळवण्याचा मार्ग सोपा होत जातो 
       गुरूंचा  कृपाशीर्वाद मिळणं खूप कठीण होत कठीण होते म्हणून एकनिष्ठेने गुरूंची सेवा करावी लागत आज मात्र गुरुंशिवाय प्रसारमाध्यमे ,डिजिटल इंडिया ,युट्युब ,गुगल हेच आपले गुरु असे मानणारे पिढी तयार झाली आहे शिक्षकांशिवाय त्यांना या माध्यमातून ज्ञान मिळवण्यासाठी अधिक आनंद वाटतो पण हे हे जरी खरे असले तरी शिक्षकांसमोर ज्ञान घेणे खूप दुर्लभ झाले आहे अशावेळी गुरूंचे महत्त्व जाणून घेऊन आपण गुरुपरंपरा जपली पाहिजे नवीन पिढीला गुरुपरंपरा समजून सांगितली पाहिजे, तरच त्यांच्याही मनात गुरूंविषयी आदर निर्माण होईल आता आपण गुरुपरंपरा बघणार आहोत.
 
1 ) मत्स्य  - संधाता
2 ) कच्छ  -सहजानंद
3) वराह -  कंकऋषी
4) नृसिंह - दुर्वास
5 ) वामन - ब्रह्मदेव 
6) परशुराम - शंकर 
7 ) राम - वसिष्ठ 
8 ) कृष्ण  संदिपनी

        या सगळ्या अवतार कार्यात भगवंताने गुरु का केले असावेत ते स्वतः भगवंताचे रूप असून तरीदेखील त्यांनी जगायला आदर्श घालून दिला आहे म्हणजेच आपल्या जीवनात गुरूंना खूप महत्वाचे स्थान असून त्याशिवाय आपला उद्धार होणार नाही त्यांनी स्वतः आत्मसात करून सगळ्या जगाला आदर्श घालून दिला.

       आणखी काही  गुरु आहेत त्यांनी शिष्य घडविण्याचे काम चांगले केले .

आदिनाथ गुरू सकळ सिद्धांचा 
मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य 
मच्छीन्द्राने बोध गोरक्षाची केला 
गोरक्ष वळला गहिनीप्रति 
 गहिनी प्रसादे निवृत्ती दातार
 ज्ञानदेवा सार चोजविले 

अशा पद्धतीने नाथ संप्रदायापासून गुरुपरंपरा चालत आलेली दिसते.

आदिनाथ म्हणजे भगवान शंकर होय तोच सगळ्या सृष्टीचा मूळ गुरु असून त्यापासून इतर शिष्यपरिवार तयार तयार झाला आहे नाथ संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय यांच्यात गुरुपरंपरा एकच आहे असे दिसते म्हणजेच शंकर हाच सगळ्यांचा आधीपासूनच गुरु आहे त्यानंतर अनेक शिष्यपरिवार उदयास आले संत मुक्ताबाई चांगदेव महाराजांच्या गुरु झाल्या,  ज्ञानदेवांचे शिष्य विसोबा खेचर  बनले, संत नामदेव हे विसोबा खेचरचे शिष्य बनले.

          तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे दोन गुरू मानले जातात संत तुकाराम आणि संत रामदास स्वामी हे दोन शिवाजी महाराज यांच्या समकालीन संत होते.

इंग्रजांच्या काळानंतर स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महात्मा फुले. महात्मा गांधी हेसुद्धा आदरणीय जे असतील त्यांना गुरु मानत होते त्यांच्यावर म्हणजेच त्यांच्या विचारांवर आचरणावर श्रद्धा ठेवून गुरुस्थानी त्यांनी ठेवले आहेत.

आधुनिक काळातील गुरुचे स्थान | aadhunik kalatil guruche sthan


        प्राचीन काळापासून ते आज पर्यंत अनेकांनी आपले गुरु मानले त्यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून त्याप्रमाणे त्यांचे विचार आचरणात आणण्याचा मनोमन प्रयत्न करून गुरूंचे महत्त्व समाजापुढे ठेवले आहेत आजही गुरूंना माननारे खूप सारे लोक आहेत म्हणून आजची पिढी जरी कितीही डिजिटल होऊद्या गुरूंना मानवंदना देणारे दिसून येतील प्रत्येक गुरुपौर्णिमेला लहान लहान मुलं सुद्धा आपल्या गुरूंना गुलाब पुष्प देऊन त्यांच्या चरणावर नतमस्तक होतात त्यामुळे आजही गुरूंचे महत्त्व समाजात असलेले दिसते.

आजच्या काळातील बदललेल्या गुरुविषयांच्या  संकल्पना 


        आज मात्र समाज गुरुंकडे आदर्श म्हणून जरी बघत असला तरी त्यांना काहीतरी दूषणं देण्याचेच काम काही लोक करतात . त्यामुळे गुरू  हा असाच असला पाहिजे यासाठी आग्रह धरतात नाहीतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन जे चांगले आहेत त्यांच्याकडून काही शिकायचे ठेवून त्यांनाच दोष देत बसतात .यांच्या अपेक्षा अशा असतात की ..

1) गुरु हा उत्तम ज्ञानी असावा 
2) जिज्ञासू असावा 
3) उत्तम मार्गदर्शक असावा 
4 ) ज्ञान, कर्म व भक्ती यांचा त्रिवेणी संगम जीवनात उतरविणारे असावेत 
5 ) प्रभावी नेतृत्वगुण 
6 ) उत्तम वक्ता 
7)  प्रसन्न व्यक्तिमत्त्व 
8)  संवेदनशील
9) जिव्हाळा,आपुलकी असलेले 
10 )समाजकार्य करण्याची तळमळ 
    
   हे सगळे गुण ज्याकडे असतील तर त्यांनाच गुरु म्हणून अधिकाधिक लोक मानत असतात .
       आजकाल कोणाकडेच सगळे गुण असतील असे नाही .एखाददुसरा गुणांचा उपयोग करुन समाजकार्य करण्याचा प्रयत्न गुरूजींनी करण्याचं ठरवले आहे. ज्यांचे उत्तम आचरण असते तोच खरा गुरु होय हे समजून घेत नाहीत ,वरवरचे चांगले दिसणारेच चांगला गुरु असा समज लहान बालकांवर होता कामा नये . .      
   
       श्रीगुरुसारीखा असता पाठीराखा 
इतरांची रेखा कोण करी 
राजयांची कांता भीक मांगे
 मनाचिया जोगे सिद्धी पाहे
 कल्पतरु जो कोणी बैसला 
काय उणे त्याला सांगे 
जो जे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो
 आता उद्गारलो गुरुकृपे 

  

            एवढी ताकद गुरुंवर विश्वास ठेवल्याने होत असते .गुरुंवर अढळ निष्ठा असेल तर  आपला उद्धार करण्याचे काम स्वतः करत असतात .आपले ते उत्तम मार्गदर्शक असतात . 
 
         समाजात कितीही बदल झाला तरी आपल्या मनातील गुरुंवर असलेली निष्ठा ढळू द्यायची नाही .त्यांचे आपल्या जीवनातील महत्त्व ओळखले पाहिजे ,जेवढी श्रद्धा ठेवू तेवढे समाधान आपल्याला मिळत असते .


हे ही आणखी वाचा


 गजानन महाराज यांची संपूर्ण माहिती 






👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏


   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area