नियतीचा खेळ| niyaticha khel
नियती म्हणलं की आपल्याला वेगळेच आठवते ते म्हणजे वेगवेगळे संदर्भ.आजकाल मनुष्य आपल्या कर्माला जेवढा घाबरत नाही तेवढा नियतीला घाबरतो .
नियती वेगळ्या अवस्थेत आणते | niyati veglya अवस्थेत aanate | नियति का अर्थ | niyati meaning | niyati joshi
नियती मनुष्याला जसा आहे त्याहीपेक्षा वेगळ्या अवस्थेत आणून सोडते,मग हे असं कसं झाले हेच म्हणायची वेळ येते त्याचाच भडिमार पिटत राहणं चालू असते .कधी कधी तर नियती भडिमार सुद्धा करु देत नाही ,त्यात मनुष्य पूर्ण खंगून जात असतो . आपल्या ध्यानात मनात काही नसताना अचानक असे घडत असल्याने माणसाला काही सुचेनासे होते. माणूस त्यापुढे हतबल होत असतो.
नियतीचा खेळ | niyaticha khel
स्वतःच्या कर्माचा बेजबाबदारपणाचा स्वतःला आणि दुसऱ्याला दोष देण्यातच आयुष्य खर्ची पाडत असतो. त्यामुळे जे काही सत्कर्म करायचे असते तेच मुळात होत नाही. हाच तर नियतीचा खेळ असतो . आपल्याला अनेक गोष्टी करावेसे वाटतात, पण त्या गोष्टी करत असताना त्या गोष्टी पर्यंत सुद्धा आपण जाऊ शकत नाही. एवढे नियती आपल्याला एखाद्या गोष्टीपासून दूर ठेवू शकते.
नियतीकडे दुर्लक्ष| niytikade duralaksh
लोकांना असा प्रश्न पडलेला असतो की नियती आम्ही मानत नाही ,आम्ही आमच्या परीने राहू अशाच अविर्भावात राहत असतात . आपणाला माहीत आहे की क्षणात कोणतीही गोष्ट होऊ शकते तर काही भाग्यात नसताना मिळत असते .
उदा .राजाचा रंक आणि रंकाचा राजा करण्याची ताकद नियतीला आहे .
यातून हे सांगता येते की मनुष्याने कोणत्याही गोष्टीचा अविर्भाव करू नये आज जो राजा आहे तर उद्या राजाच असेल असं सांगता येत नाही किंवा आज भिकारी आहे तो भिकारी म्हणूनच शेवटपर्यंत राहील असं काहीही सांगता येत नाही. म्हणून नियती कोणाला कोणत्या पदावर नेईल हे कोणालाच माहीत नाही ,म्हणून तिच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही.
नियती सहज करुन घेते | niyati sahaj krun ghete
" होत्याचं नव्हतं " झालं असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपण मात्र काहीतरी गमावलेले असते, हे सगळे नकळतपणे होत असते . ज्यावेळी आपल्या हातातून सगळं निघून गेलेले असते त्यावेळी मात्र पश्चाताप करण्याची वेळ येत असते ,हे असं कसं घडलं ,हे होईल, असं होईल म्हणून हे आपणाला त्याची जराही चाहूल नसते, पण हे होऊन जात असते .
अनेकदा असे होते की जी गोष्ट घडून गेल्यानंतर आपण त्या गोष्टी कडे बारकाईने बघतो, पण घटने अगोदर आपल्याला याची काहीही कल्पना नसते किंवा ते घडणार आहे त्याची जरासाही चाहूल मनाला लागत नाही.
नियतीला मंजूर तेच होते | niyatila manjur tech hote
नियतीला जे मंजूर आहे तशाच गोष्टी घडत असतात .त्याठिकाणी आपण कितीही काही करण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग होत नाही . जी गोष्ट होणार आहे ते होतच जाते त्याठिकाणी कोणीही घडवू शकत नाही असा हा नियतीचा खेळ असतो त्या ठिकाणी कुणाचेच काही चालत नाही.
उदा. एखादा मनुष्य रस्त्याने आपल्या बाजूने सरळ जात असताना अचानक झाडावरुन फांदी त्याच्या अंगावर पडून तो मरण पावतो ,लोक बोलायला मोकळे झाडाखालून जायचं कशाला,फांदी खाली पडताना आवाज झाला असेलच की किंवा अंदाज घेऊन चालायला हवे होते .मोबाईल कानात असेल म्हणून असं झाले असेल .
असे अनेक प्रश्न अनेकांना पडत असतात पण घटना घडत असताना ती आरडाओरडा करून येत नाही किंवा ती पूर्वकल्पना देत नाही. त्याच्यामुळे कोणीही त्याच्यावर काहीही बोलले तरी ती गोष्ट मात्र पुन्हा येऊ शकत नाही.जी झालेली घटना आहे त्यावरच आपण बोलू शकतो. तेव्हा हे असं व्हायला नको होतं असं झाले असते तर बरे झाले असते, असे आपण एवढेच बोलू शकतो, बाकी काहीही करू शकत नाही.
नियतीला अडवू शकत नाही | niyatila rokhu shakat nahi
असे अनेक प्रश्नांनी खैरात उठणार पण उपयोग काय ? नियतीला जे हवं ते झालं .त्यावर कितीही तज्ज्ञांच्या विचारांची भर पडली तरीही जी गोष्ट झाली त्याला कोणीच आडवू शकत नाही . जे झालेले आहे त्याला माघारी आणू शकत नाही . एखादी गोष्ट टाळण्यासाठी ना पैसा उपयोगी पडतो ना भौतिक सुविधा घटना घडायची आहे ती घटना घडतच राहते त्यावर कोणताही उपाय नाही.
नियती मुकं बनविते | niyati muka banvite
नियती असे करते की जे बाहेर बोलूही शकत नाही, आणि कोणाला दाखवण्याचीही हिम्मत होत नाही, अशा गोष्टी मात्र हळूवारपणे जपाव्या लागत असतात त्याचा बोलबाला कोणालाच कळता कामा नये अशीच घटना प्रत्येकाच्या घरात होत असते . घटना अशी असते की ते आपल्याशिवाय दुसऱ्याला कळताच कामा नये अशी घटना मनात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्या गोष्टी चव्हाट्यावर न आणता त्या गोष्टी दडपून कशा राहतील याकडे लक्ष असते त्यामुळे जीवनातील आनंदही निघून गेलेला असतो.
उदा.दोन भावांचे संसार खूप चांगले चालत असतात पण एखाद्याच्या मनात जर वासना निर्माण झाली असली आणि ती व्यक्त केली तर त्यातून ज्या घरात खेळीमेळीचे वातावरण असते त्याला गालबोट लागले जाते .दोन भाऊ कितीही जिवाभावाचे असले तरी त्या नात्यात दुरावा ठरलेला असतोच .
नियती सगळे संपविते | niyati sagale sampavite
हे असं कसं झालं म्हणून पश्चाताप सगळ्यांना होत असतो ,यातून कोणालाच समाधान होत नाही ज्याचे मन वासनेने भरलेले होते त्यालाही ह्याचा परिणाम भोगावा लागतो आणि त्याच्याही भावाभावात सलोख्याचे नाते असते ते संपुष्टात यायला सुरुवात होत असते ,याचा परिणाम एवढा वाढत जातो की एकमेकांची तोंड बघण्याची इच्छा होत नाही .
नियती माणसातून उठविते | niyati mansatun uthavite
घरात सगळे व्यवस्थित असले तरी मनाला झालेल्या जखमा मात्र कोणाला सांगू शकत नाहीत आणि बाहेरच्या लोकांना बोलू शकत नाहीत ,आलेला दिवस कसातरी ढकलत ढकलत नेत असतात .विश्वासाचे नाते म्हणून त्यात ओलावा काहीच राहिलेला नसतो वरवरचे नुसते नातेसंबंध सगळे बघत असतात पण तो कोरडा असतो .
नियती आनंद हिरावते | niyati aanand hiravate
असा हा नियतीचा खेळ कोणीही आडवू शकत नाही. आणि कोणीही काही करु शकत नाही ,उघड्या डोळ्यांनी असेल तशा अवस्थेत राहण्याची हिम्मत करावी लागते ,जीवन जगण्याचा सगळा आनंद हिरावून घेतलेला असतो .
niyati सुस्थितीत आणते | niyati susthitit aanate
नियतीचा खेळ आपण चुकवू शकत नाही पण भगवंताची भक्ती केली तर काहींना वाईट दिवसातून चांगले दिवस येत असतात .
त्याच्या कृपेने असं झाले नाही याची सारखी सारखी आठवण आपण करत असतो .म्हणून भगवतभक्तीत रंगून गेले तर आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सक्षम बनत असतो.
निष्कर्ष:
यावरुन आपल्या हे लक्षात आले असेलच की नियती ही कोणावर कोणती परिस्थिती येईल ते सांगता येत नाही .सगळे कसे व्यवस्थित चालले असताना अचानक कोणाची नजर लागावी अशी काहीतरी विपरीत घडले जाते ,हे सगळे सहज घडत असते कोणीही त्यावर विचार केलेला नसतो अचानक सगळ्या गोष्टी घडत असतात ,मग त्याविषयी कितीही हळहळ व्यक्त केली,त्रागा केला ,तरीही जे झालेल्या गोष्टी परत आणता येत नाहीत .
झालेल्या गोष्टीचा पश्चात्ताप करत करत उरलेल्या आयुष्यात दुःखाचे सावट आणून राहतात .डोक्याला हात लावून बसण्यापेक्षा जे झाले ते झालं असं म्हणून सगळ्या गोष्टींचा करता करविता भगवंत आहे हे सगळे त्याच्यावर सोपविले तर आणि तरच आपल्याला या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करायला तयार होऊ .करविता धनी वेगळाची असेच मानून जगायचे .
आणखी वाचा
छान लेख
उत्तर द्याहटवा