Google ads

Ads Area

मित्र म्हणजे जीवन | Friend is life | mitra mhanje jivan

मित्र म्हणजे जीवन |Firend is life| mitra mhanje jivan

मित्र म्हणजे जीवन
मित्र म्हणजे जीवन


मित्र म्हणजे जीवन( toc)

happy friendship day | friendship day 2022 | friendship logo | when is friendship day | 

आज frienship day सगळीकडे खूप शुभेच्छा यांचा वर्षाव चाललेला असतो ,पण आपण सगळे मित्र आहोत या भूमिकेतून आपणाला मित्र म्हणून जी कर्तव्ये असतात ती आपल्याला जमतात का ? काही मित्र असे असतात की फक्त बाहेरच काही असेल ती मैत्री ; काहींची अशी असते की बाहेर दाखवत नाहीत तर घरगुती संबंध असलेली अशी असते   काहींची दोन्हीही बाजू  भक्कमपणे सांभाळणारी असते .

मित्रहो हा जो लेख लिहीत आहे  तो असा आहे की समाजात असे चित्र दिसते की आपण काही मित्र  करतो पण त्यासाठी तो मित्र म्हणून आपला केवळ स्वार्थ साधत असतो .तर काही मित्र   आपली सगळी उणीव भरुन काढत असतो तर काहींचे अस्तित्वच मित्र बनत असतो तर काहींना मित्रांचे काही पडलेले नसते .  हा लेख आवर्जून सगळा वाचा खरंच विचार करायला लावणारा असा लेख आहे .

मित्राचे स्थान 

मित्र म्हणजे आपले जीवन ,श्वास असतो पण मित्राच्याही मनात अशाच पद्धतीचे स्थान असावे लागते नाहीतर ती मैत्री काहीच कामाची नसते .केली मैत्री तर दोघांनी करावी नाहीतर एक चांगली निभावत असताना दुसरा भलत्याच नादात असेल तर त्या मैत्रीत रस नसतो . दोघांचा जीव,ओढ ,काळजी तेवढाच एकमेकांवरती असावा लागतो .

मित्र म्हणजे अनेकांच्या अनेक समजुती असतात ,कोणी मित्र म्हणजे स्वार्थी भूमिका मांडतील तर कोणी लबाड असतात असं काहीतरी म्हणतील .जसा ज्यांना अनुभव आलेला असतो तसाच ते म्हणत असतील यात काही गैर नाहीच .

भगवंताने आपल्याला आईवडिलांसोबत मित्र अशी पुंजी दिलेली आहे की आपल्याला कोणतीही अडचण आली किंवा आपल्याला दुःख झाले तरी आपलं मन मोकळं करण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे मित्रच असतो .

 मग ,अशा मित्रात असते काय की त्याची उणीव भासली तर त्याला कोणत्याच विश्वात रमता येत नाही .

उदा .जिंदगी का नाम दोस्ती  या गाण्यावरून आपल्याला दोस्ती म्हणजेच जीवन आहे याचा अर्थ ज्याने मनापासून दोस्ती केली त्यालाच कळणार .

उदा .शोले या चित्रपटात जय आणि विरुची जोडी सगळ्यांना माहीतच आहे .त्यात आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या दोस्ताला सांभाळणे ह्यातच धन्यता मानत असतात .        

एवढी ओढ होण्यासाठी काहीतरी मैत्री म्हणून जपलेले नाते असते की त्याशिवाय आपल्याला कुठेच चैन पडत नाही .सोबत असताना कितीही कष्ट पडले तरी दोघांनी एकमेकांची घेतलेली काळजी ,सोबत विचारांची देवाणघेवाण यामुळे एकमेकांचा विश्वास वाढत असतो .

मित्र का असावा | mitra ka asava |  true friendship quotes | international friendship day | when is friendship day 2022 | short friendship quotes | friendship day 2023

 मित्राचे आपल्या जीवनातील स्थान खूप महत्त्वाचे असते  ,अशा मैत्रीत विश्वास तर असतो पण त्यासाठी आपण आपल्या जीवाची पर्वा न करुन एकमेकांची सोबत असावी असे मनापासून स्वीकारलेले  नाते असते.
आपल्याला आधार म्हणून त्याची सोबत खूप महत्त्वाची वाटत असते .आपले चुकते पाऊल जो मागे फिरवतो तो आपला मित्र असतो म्हणून मित्राची आवश्यकता असावी.


  मित्र कसा असावा | mitra ksa asava


 मित्र नेहमी आपला स्वार्थ न बघता एकमेकांना मदतीचा हात देणारा असावा . एकमेकांच्या घरातील दोघांना चांगले मित्र आहेत याचा विश्वास निर्माण झालेला असावा .कोणीही मैत्रिविषयी कोणतीच उणीव काढणार नाहीत अशा पद्धतीचा स्वभाव गुण असला तर घरातीलच एक घटक आहे अशा रीतीने त्यास सांभाळून घेतले पाहिजे .

आपल्या मुलाला बाहेर कुठे जायचे तर तो मित्र सोबत असेल तर कोणतीच काळजी वाटणार नाही ,याची खात्री सगळ्या घराला असणं महत्त्वाचं असते .


मित्र म्हणजे विश्वास | mitra mhanje vishvas

मैत्री करण्यात कोणत्याही वयाचे बंधन नसते .मैत्री कधीही कोणाशीही होऊ शकते .केवळ समवयस्क असेल तरच मैत्री होते असे नाही .आपले विचार जुळले की त्याठिकाणी मैत्री होत असतेच .त्यातच दोघांनाही मनमोकळं वाटत असले पाहिजे ,  

एकमेकांवर खूप विश्वास असला पाहिजे .त्याशिवाय ते नाते पुढे जात नाही. एकमेकांवर असा विश्वास पाहिजे की कोणताही कितीही कठीण प्रसंग असो किंवा कोणताही प्रसंग त्यातून निभावून निघणं ही खरी कसोटी असते .नाहीतर संधीसाधू तर चौकाचौकात मिळतातच  की ,विश्वासास तडा जाता कामा नये, हे जपणं म्हणजे आपल्या आईवडिलांचा संस्कारी पुत्र म्हणून मान्यता मिळतेच .


मित्राची नीतिमत्ता |mitrachi nitimatta


 मित्र म्हणून आपण एखाद्याला स्वीकारले तर त्यानेही आपले घर म्हणून राहणं खूप महत्त्वाचं असते .त्यातच खरा आनंद असतो .

  घरातील प्रत्येक व्यक्तींकडे भाऊ- बहिणीच्या नात्याने वावरणे खूप महत्त्वाचे असते .तेवढा विश्वास निर्माण करणे यासाठी स्वतःला खूप जपावं लागतं .अनेक प्रसंगातून तावूनसुलाखून निघावं लागते .तर आणि तरच मित्राची जाणीव असलेली दिसून येते . प्रत्येक गोष्ट ही समोरासमोर होत असली तर त्या मैत्रीत अधिकाधिक विश्वास वाढत जातो ,जर काहीतरी लपवून जर मैत्री करत असला तर ती मैत्री होत नाही 


 मैत्रीत संकुचितपणा नसावा| maitrit sankuchitpna nasava long distance friendship quotes | friendship quotes | happy friendship day

 मित्र जपताना  आपला स्वभाव  मनमोकळा असणं खूप महत्त्वाचं असते .

 मित्र जर आपला हातचा राखून राहत असेल तर ती मैत्री होत नाही .जेवढं शक्य असेल तेवढया पद्धतीने मित्राला जपणं महत्त्वाचं असते . प्रत्येक गोष्ट एकमेकांसमोर असल्या की त्यातील विश्वास वाढत जातो ,मित्रापासून काहीतरी लपवून जर अनेक गोष्टी करत असला तर तो मित्र बनू शकत नाही .प्रत्येक गोष्टीत सामील करुन घेणं त्यातच मैत्री अधिक घट्ट करणं होय .त्यातील आनंद हा वेगळाच असतो.


 मित्रात व्यवहार आड येऊ देऊ नये |mitrat vyavhar aad yayala nko

 मित्र करताना आपण जात ,धर्म,कुळ,वय,गरीब,श्रीमंत याचा कधीच विचार येता कामा नये .जर तसं मनात येत असेल तर वेळीच मैत्रीतून पायउतार होणं गरजेचं असते .
मित्र गरीब असला तर मदत करताना स्वतःला झळ बसणार आहे याची जाणीव होऊनही जी चांगल्या मनाने मित्रत्व जपतो तोच खरा मित्र .गरीब मित्राने सुद्धा आपल्याला मदतीचा हात दिला त्याचे उपकार कधीच विसरता कामा नये .वेळप्रसंगी त्याला ज्यावेळेस मदत हवी असेल त्यावेळी बिनधास्त जीवाची पर्वा न करता मदतीचा हात दयावा,कारण प्रसंग कोणावरही कधी कोणता येईल ते सांगता येत नाही .
मित्रात जर व्यवहार आडवा येत असेल तर या व्यवहारापासून दूर राहणं महत्त्वाचं ठरते.


खऱ्या मैत्रीत कोणीही आड आलेले चालत नाही 


जर आपण एखाद्याशी एकनिष्ठने मैत्री केली तर या मैत्रीत कोणी कोणाच्या आड येता कामा नये असे वाटत असते . आपला मित्र कोणाचा न होता तो आपलाच असावा असा अट्टाहास असतो .
दोघांपैकी एक जर जुनी मैत्री सोडून नवीनच मैत्री करायला लागला तर त्याच्यासारखे दुर्भाग्य मिळत नसते . मग या दोघांच्या मैत्रीत असणारा जिव्हाळा, ओढ, प्रेम ,आपुलकी हे सगळं कालबाह्य होत जाते . कारण जुनी मैत्री ही एकदम जीवापाड असते आणि त्यातीलच एखादा नवीन मैत्रीसाठी आसुसलेला असतो पहिल्याला दुर्लक्षित करत असतो .
अशा वेळेस पहिल्याची जी मासा तडपडल्यासारखी अवस्था असते ती अवस्था कोणत्याच सुखाने भरून निघत नाही. मग एखादा मित्र हा मित्राच्या नादाला लागला असेल तरीही त्याने जुन्या मित्राला विसरता कामा नये याचेही भान ठेवावे, नाहीतर जुना कायमचा सोडावा त्याला कोणत्याच पद्धतीने डळमळीत ठेवू नये असेही वागणे असावे .
शेवटी हे होणारच होते असे समजून सहन करण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसतो जरी मित्र आपला श्वास ,जीव, अस्तित्व,सर्वस्व असला तरीही तो दुर्लक्षित करत असला तर त्याच्यासारखे दुःख कोणतेच त्रासदायक नसते म्हणून मित्रात सुखापेक्षा दुःखच जास्त असते .


मित्र म्हणजे श्वास,जीव | mitra shwas,jiv


     मैत्री ज्याला कळली त्यानेच ती निभवावी नाहीतर एकमेकांची विचारपूस करणारे अनेक मित्र भेटतील पण लगेच मागे काहीतरी खिल्ली उडवतील असे मित्र काही कामाचे नसतात .
मित्राच्या पाठीमागे आपल्या समोर कोणी त्याच्याविषयी ब्र काढणार नाही एवढी ताकद आपल्या मैत्रीत असली पाहिजे

 मित्र म्हणजे आपल्यात ओतप्रोत ठासून भरलेले प्रेमाचं गाठोडं होय . ते कधीही उलगडले तरी त्यातून मित्राचा स्नेह उलगडत गेला पाहिजे .एकमेकांच्या सहवासाची आस लागली पाहिजे ,जीव आतुर झाला पाहिजे .
      सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत त्याच्याच स्मरणात आपला दिवस चांगला जात असतो ,मित्र म्हणजे आपले जीवन ,आपले सर्वस्व मानून जर मैत्री केली तर त्यातील जो आनंद असतो त्यापुढे दुनियेयील आनंद तुच्छ असतो.

  मित्र म्हणजेच जीवन असा जीवन जगण्याचा आनंद घेत असतो ,प्रत्येक कृतीत मित्र समोर असणारच. मित्राची ओढ असणे म्हणजे त्यात वियोग असला तरी  तो स्वर्गाहूनही आनंद देत असतो .त्यासाठी अशी मैत्री होणं हे भाग्यच असते ,त्यासाठी त्यात काहीही विघ्न आले तरी मैत्री ही मैत्रीच असू शकते. अशी मैत्री नंतरच्या आयुष्यात होत नाही. 

मैत्री म्हणजे त्याग| mitra mhanje tyag

मैत्री जपताना अनेक वेळा आपल्याला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो .आपल्या मित्राच्या आनंदात आपला आनंद मानणारा असावा,नाहीतर त्याचं हसू करणारा मित्र नको असतो.दोस्तीच्या दुनियेतील राजा असं म्हणून घ्यायचं असेल तर त्याला सगळ्याच गोष्टींचा त्याग महत्त्वाचा असतो . 

मित्राच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला वाईट नजरेने न बघणे हा मोठा त्याग असतो,भले अनेक प्रसंग आले तरी केसाने गळा कापण्याची वृत्ती अंगी बाळगू नये ,हा मोठा जीवनातील त्याग होय तर आणि तरच आपण मित्राच्या आणि माणसाच्या लायक आहोत.

 जवळचा मित्र मिळणे खूप कठीण असते,आणि मिळाला तर तो टिकवून  ठेवणे तेवढेच जिकिरीचे असते .मैत्री करत असताना अनेक अडचणी, समस्या, त्रास हे होणारच आहे हे समजून घेऊन आपण पूर्ण त्यात उतरले तर आणि तरच आपली मैत्री ही चांगली होऊ शकते .मैत्रीत विश्वास तर महत्त्वाचा आहेच पण त्याबरोबर त्यागाची भूमिकाही खूप महत्त्वाची आहे .हे जर नसेल तर आपण मित्र म्हणून घेऊ शकत नाही .

जगात अनेक मित्र असतात पण सांभाळणे खूप कठीण असते त्यासाठी आपल्याला खूप त्रासातून जावं लागते त्याची बाजू समजून घेताना ,आपली बाजू समजून देताना आपल्या जीवनाचा कस लागत असतो आणि तो लागत असताना जर आपण त्यातून निभावून निघालो तर आपली ही मैत्री एकदम चांगली असते त्या मित्राला तोडच नसते.

मित्र भरपूर असतात चहापाणी, नाष्टा हे दररोज करणारे ही मित्र म्हणतात पण त्याला त्याच्या पाठीमागे बोलणारे मित्र कधीच होत नसतात . विचाराला विचारसरणी आणि आपलं दुःख त्याला सांगायचे, त्याचे दुःख आपल्याला सांगणे म्हणजेच सुख दुःखामध्ये साथ देणारेच मित्रता असते नाहीतर नुसते भावनेअभावी केलेली उठाठेव असते.

मित्र करत असताना आपल्या अपेक्षा ,वासना या सगळ्या गोष्टींचा त्याग करणे महत्त्वाचे असते .कितीही कोणताही प्रसंग आला तरी त्यातून निभावून जाणे हीच खरी मित्रता .मित्राच्याच घरात आपुलकीचे नाते निर्माण करुन त्याच्याच पोटात खंजीर खुपसण्याचे काम जनावरेच करु शकतात .असे अनेक ठिकाणी बघायला मिळत असते .म्हणून मित्र बनवत असताना त्यागमय जीवनाला खूप महत्त्वाचे स्थान असते.


मित्र म्हणजे सर्वस्व | mitra mhanje sarvasav

मित्र हा साक्षात परमेश्वराचा अवतार जरी नसला तरी त्याच्या सहवासात देवाचाही विसर पडावा एवढी ताकद मैत्रीत असली पाहिजे ,पण मैत्री करीत असताना आपले कर्तव्य विसरता कामा नये नाहीतर याचीही जाणीव वेळोवेळी करुन देणारा मित्र असला तर तो आपला गुरू,मार्गदर्शक,भगवंतस्वरुप,नीतिमान असा असेल तर तो मित्र सर्वस्व बनतोच फक्त आपली तयारी पाहिजे की आपण त्याला कोणत्या स्थितीत पाहतो हे महत्त्वाचे आहे .नाहीतर आपण सर्वस्व मानायचो आणि तो धूर्तपणाने बघत असेल तर तो सर्वस्वी बनण्यासाठी लायक नाहीच .

खऱ्या मैत्रीत आनंदापेक्षा दुःख जास्त होते  | khari maitri dukha jast dete


हा वेगळा विचार मांडतोय कारण प्रत्यक्ष जर बघायचे तर खरी मैत्री असते त्यावेळी आपल्या नजरेआड मित्र होऊ नये अशी अपेक्षा असते .मग त्याच्या काळजीपोटी असेल किंवा त्याचा विरह सहन होत नसेल. याच्या अस्तित्वाला धक्का लागता कामा नये यासाठी केलेली काळजी ही त्रासदायक असते .

मनात त्याविषयी असलेली ओढ ,हुरहूर ही एक त्याची प्रतिष्ठा वाढावी म्हणून घेतलेली काळजी असेल किंवा माझ्या मित्राला कोणीही बोट करुन बोलणार नाही यासाठी घेत असलेली त्याची बाजू म्हणजे दोघांचा वैचारिक वाद अटळच असतो.
 वैचारिक वाद हा एकमेकांना भरपूर पिटाई करण्याचीही अपेक्षा असते पण त्यात खूप प्रेम असते .खूप लागले म्हणून त्याची काळजी घेणारा तोच मित्र असतो .त्या मारातून त्याने कोणतातरी धडा घ्यावा हीच अपेक्षा असते .मग दोन्हीमध्ये समझोता होऊन ' असं वागेल ' अशी बोलणी होतेच .पुनः पुन्हा असेच घडत गेले की असेच होते .कधीकधी हे वागणं बदलू शकत नाही म्हणून सोडून द्यावं लागत असते, त्यातून होणारा त्रास हा मैत्रिपेक्षा त्यास समजून घ्यायला जास्त त्रास होतो. मित्राची समाजात असलेली प्रतिष्ठा, मान, तत्त्वे, विचार,नीतिमत्ता कमी होता कामा नये यासाठी होणारी जीवाची घालमेल ही एखाद्या दुःखाच्या प्रसंगापेक्षा जास्त असते.

        मित्राचे चुकते पाऊल वेळीच सावध करुन स्थीर व्हावे यासाठी होणारी जी तगमग ही कोणताही आनंद हा ह्या प्रसंगाला तोंड देत असलेल्या मित्राला बाहेर काढण्यासाठी मनोमन त्याच्याच विचारात हरवून जाणे, म्हणजे कोणतेही सुख आनंद देतच नाही .पण हे कधी शक्य असेल जर मनापासून आपण मैत्री केली तरच हे दुःखही स्वर्गाहूनही श्रेष्ठ मानत असतो .मित्रासाठी तिष्ठत राहणे हीच खरी मैत्री होय .मग यात सुखापेक्षा दुःख कितीही वाट्याला आले तरी त्यात समाधानच मानून आपले जीवन जगत असतो .

 निष्कर्ष 


        आपल्या जीवनात मित्राचे स्थान खूप महत्त्वाचे असते ,ज्याला हे कळले तोच हे मित्राचे नाते चांगल्या रीतीने निभावू शकतो .हजारो मित्र सोबत असून काही उपयोग नसतो, त्यात जर आपुलकी नसेल तर सगळे शून्यवत असते ,पण एकच जीवापाड मैत्री जपणारा असला तर हजारो मित्रांना भारी असतो .
आपल्याला एकतरी मित्र असावा पण तोही त्याच भूमिकेत असला तर ती मैत्री सुखद आनंद देते .आपल्या जीवनातील मित्राचे स्थान सावलीप्रमाणे असावे कितीही काही केल्या ती टाळता येत नाही अशीच मैत्री असावी .

तुम्हीही एखाद्याला चांगला मित्र बनवा मग बघा त्या मैत्रीत आनंद हा असतोच पण दुःखही जास्त असते ,पण दुःख हे दुःख नसून एकमेकांची असलेली काळजी असते .मित्रात हरवून जाणे म्हणजेच खरी मित्रता होय .भले पुढचा मित्र आपल्याला मानो अगर न मानो त्यासाठी आपली ओढ कायमच असणं हीच खरी जीवनाची सार्थकता .

प्रत्येकाने अजमावून बघण्याची गरज आहे .हे माझे विचार मांडले आहेत .कोणाच्या मताशी जुळतीलच असे नाहीत ,पण एक मित्र म्हणून केलेला छोटासा प्रयत्न ! 

जे आहे ,जे होत आहे ते सगळे नियतीवर अवलंबून असते म्हणून कितीही काहीही केले तरी आपल्या हातात काही गोष्टी नसतात म्हणून हे सगळे नियतीवर अवलंबून असते .नियतीचा खेळ खूप वेगळा असतो वाचा 


आणखी वाचा

 -नियती कशी असते ,जे होत असते तो नियतीचा खेळ असतो

 - सुख कसे असते 

व्हॅलेंटाईन डे माहिती 





    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area