Google ads

Ads Area

विठ्ठल माझे दैवत |Vitthal majhe daivat

विठ्ठल माझे दैवत |Vitthal majhe daivat 


विठ्ठल हा सर्व भक्तांचा कैवारी आहे .तो सगळ्यांचा मायबाप आहे .म्हणून म्हणलं आहे

       विठू माझा लेकुरवाळा 
       संगे गोपालांचा मेळा
 

असा हा विठ्ठल म्हणजे मुक्तीदाता आहे .माझ्या विठ्ठलाची काय सांगू ख्याती आपले शब्द तोकडे पडतील एवढं वर्णन करुनही विठ्ठलाचे वर्णन होणार नाही .

विठ्ठल म्हणलं की आठवतो तो वारकरी ,ती पंढरी,तो संतसोहळा,वारी करणारे भाविक यांचा समुदाय .अशा विठ्ठलाला भेटण्यासाठी संतांच्या पालख्या लाखो वारकऱ्यांच्या संगतीने पंढरपूर याठिकाणी येतात .

भक्तांचा  उद्धार करणारा हा विठ्ठल म्हणजे सगळ्या वारकरी असो अगर नसो सगळ्या जणांचा  हा विठ्ठल आहे  म्हणून 'सकलांसी आहे  अधिकार ' असा हा विठ्ठल कोणालाही याठिकाणी यायला बंधन नाही.

भक्ती केली तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही याचे  एकमेव उदाहरण म्हणजे विठ्ठल होय. वारकरी संप्रदायात सर्वसामान्यांना सामावून घेण्याची  ताकद आहे  म्हणूनच  सगळ्या भक्तांना हवाहवासा वाटतो.

एखादा व्यक्ती वारकरी संप्रदायशी  कोणताही संबंध  नसला  तरीही त्याचे विठ्ठलाच्या महती विषयी खूप  चांगल्या प्रतिक्रिया असतात. वारकरी म्हणजे माणुसकीचा झरा असतो, यात कोणतीच  शंका  नाही.

असा हा पांडुरंग  परमात्मा हा भक्तांसाठी उभा  राहत  असतो, संतांनी भक्तीचा  महिमा हा सर्व जणांना घालून  दिला तोच आजही  कीर्तनकार समाजात रुजवत आहेत.

           ज्ञानदेवे रचिला पाया

           तुका झालासे कळस

संतांनी वारकरी संप्रदायाची महिमा गायली असून सर्वसामान्य माणसांना भक्ती पटवून दिली आहे .ज्ञानेश्वर महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आहे इमारतीचा  कळस  बनण्याचे  श्रेय तुकाराम महाराज यांना जाते.

आजही वारकरी संप्रदायविषयीं जिव्हाळा,आपुलकी श्रद्धा वाटत  असते.येथे  कोणतेच कोणालाही बंधन नसल्याने तो विठ्ठल म्हणजे आपला जीवाचा देव वाटत राहतो. कोणत्याही संप्रदायतील व्यक्तींना विठ्ठलाविषयी आस्था वाटत असते.

असा हा भक्तांचा आवडीचा विठ्ठल सगळ्या दुनियेचे ओझे  उतरत असतो.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area